scorecardresearch

IND vs AUS: इयान हिलीच्या ‘अयोग्य खेळपट्टी’ टिप्पणीचा खरपूस समाचार घेत व्यंकटेश प्रसादने दाखवला आरसा; म्हणाला, ‘२०१८-१९ मध्ये ऑस्ट्रेलियात…’

IND vs AUS Test Series: ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज खेळाडू इयान हिलीने अलीकडेच भारतीय खेळपट्ट्यांवर भाष्य केले आहे. ज्यावरुन आता बरीच चर्चा होत आहे. दरम्यान व्यंकटेश प्रसादने आपल्या ट्विटच्या माध्यमातून हिलीला चोख प्रत्युत्तर दिले.

Venkatesh Prasad took a dig at Ian Healy's
व्यंकटेश प्रसाद (फोटो- इंडियन एक्सप्रेस)

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ९ फेब्रुवारीपासून चार कसोटी सामन्यांची बॉर्डर-गावसकर करंडक स्पर्धा सुरू होत आहे. ऑस्ट्रेलियन संघ २०१७ नंतर प्रथमच भारतात कसोटी मालिका खेळणार आहे. २००४ पासून ऑस्ट्रेलियाने भारतात एकही कसोटी मालिका जिंकलेली नाही. आता ही पराजयाची मालिका खंडित करण्यासाठी ऑस्ट्रेलिया संघ सज्ज झाला आहे. अशात इयान हिलीने भारतातील खेळपट्ट्यांबाबत जे वक्तव्य केले, त्याला माजी क्रिकेटपटू व्यंकटेश प्रसाद यांनी ट्विट करुन प्रत्युत्तर दिले आहे.

भारतातील फिरकी ट्रॅकमुळे ऑस्ट्रेलियाचे माजी दिग्गज क्रिकेटपटू चिंतेत आहेत. माजी कांगारू दिग्गज यष्टिरक्षक इयान हिलीने अलीकडेच म्हटले होते की ऑस्ट्रेलियाला ‘योग्य खेळपट्टी’ दिल्यास जिंकण्याची चांगली संधी आहे, परंतु ‘अयोग्य खेळपट्टी’वर भारतीय संघाचा वरचष्मा असेल. यावर आता माजी क्रिकेटपटू वेंकटेश प्रसाद यांनी ट्विट करुन प्रत्युत्तर दिले आहे.

हिलीच्या या टिप्पणीवर बरीच चर्चा होत आहे. क्रिकेट तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, घरच्या संघाने स्वतःच्या आवडीनुसार खेळपट्टी तयार करणे पूर्णपणे योग्य आहे, ज्यामध्ये काहीही अयोग्य नाही. टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक जॉनी राईटपासून ते रविचंद्रन अश्विनपर्यंत सर्वांनी हिलीच्या विधानावर आक्षेप घेतला आहे.

हेही वाचा – Shaheen Ansha Wedding: ‘आमचा संस्मरणीय दिवस खराब करू नका…’; लग्नानंतर भडकलेल्या शाहीन आफ्रिदीचे ट्विटरवर आवाहन

त्याचवेळी, आता भारताचा माजी गोलंदाज व्यंकटेश प्रेसादनेही हिलीची खरडपट्टी करताना चोख प्रत्युत्तर दिले आहे. त्याने आपल्या अधिकृत ट्विटरवर लिहिले, “त्यामुळे २०१८-१९ आणि २०२०-२१ मध्ये मायदेशात भारताविरुद्धच्या कसोटी मालिका पराभवासाठी ऑस्ट्रेलियाने अयोग्य खेळपट्टी तयार केली होती.”

विशेष म्हणजे, भारताने २०१८-१९ मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर चार कसोटी सामन्यांची मालिका २-१ ने जिंकली, जी ऐतिहासिक होती. एक सामना अनिर्णित राहिला. ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर ७१ वर्षात भारताचा हा पहिला कसोटी मालिका विजय ठरला.

हेही वाचा – Saqib Mahmood Post: ‘जिहादी’ म्हटल्यावर संतापला इंग्लंडचा वेगवान गोलंदाज; ट्रोलरला म्हणाला…, फोटो होतोय व्हायरल

या मालिकेत पुजाराची बॅट जबरदस्त तळपली होती. त्याने एकूण ५२१ धावा केल्या. तो प्लेअर ऑफ द सिरीज म्हणून निवडला गेला. त्याचवेळी टीम इंडियाने २०२०-२१ मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर चार कसोटी सामन्यांची मालिका २-१ ने जिंकली होती. मालिकेतील एक सामना अनिर्णित राहिला होता.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-02-2023 at 15:45 IST