विदर्भचा सलग दुसरा विजय

यष्टीरक्षक बी. जे. वॉटलिंगने विक्रमाची बरोबरी करणारा नववा झेल घेण्याची किमया साधली

रवीकुमार ठाकूर याची प्रभावी गोलंदाजी व फैज फाजल याचे शानदार अर्धशतक यामुळेच विदर्भ संघास हजारे चषक क्रिकेट स्पर्धेत बडोद्यावर सात गडी राखून मात करता आली.

आक्रमक फटकेबाजीबाबत ख्यातनाम असलेले अंबाती रायुडु व युसुफ पठाण हे मातब्बर फलंदाज असतानाही बडोदा संघाचा डाव ४६ षटकांमध्ये १७३ धावांमध्ये आटोपला. विदर्भ संघाच्या ठाकूर याने चार गडी बाद करीत त्यांच्या फलंदाजांवर अंकुश ठेवला. विजयासाठी १७४ धावांचे ध्येय विदर्भ संघाने ४२ षटकांत व तीन गडय़ांच्या मोबदल्यात पार केले. त्याचे श्रेय फाजलने केलेल्या तडाखेबाज ८९ धावांना द्यावे लागेल. विदर्भ संघाचा हा लागोपाठ दुसरा विजय आहे.
संक्षिप्त धावफलक-बडोदा ४६ षटकांत सर्वबाद १७३ (अंबाती रायुडु ४०, युसुफ पठाण ३२, रवीकुमार ठाकूर ४/२७, रवी जांगिड २/१५, रजनीश गुरबानी २/४७) पराभूत वि. विदर्भ ४२ षटकांत ३ बाद १७४ (फैज फाजल ८९, एस.बद्रीनाथ नाबाद ४७ ).

न्यूझीलंडची विजयाकडे कूच
वृत्तसंस्था, डय़ुनेडिन
यष्टीरक्षक बी. जे. वॉटलिंगने विक्रमाची बरोबरी करणारा नववा झेल घेण्याची किमया साधली, त्यामुळे न्यूझीलंडने पहिल्या कसोटीतील विजयाकडे आशादायी वाटचाल केली आहे. चौथ्या दिवसअखेर श्रीलंकेची दुसऱ्या डावात ३ बाद १०९ अशी अवस्था झाली असून, विजयासाठी त्यांना अखेरच्या दिवशी २९६ धावा काढाव्या लागणार आहेत.
न्यूझीलंडने टॉम लॅथमचे (१०९) नाबाद शतक आणि केन विल्यम्सनचे (७१) अर्धशतक या बळावर ३ बाद २६७ धावसंख्येवर दुसरा डाव घोषित केला. लॅथम आणि विल्यम्सन यांनी दुसऱ्या विकेटसाठी १४१ धावांची भागीदारी केली. ब्रॅडम मॅक्क्युलमने नाबाद १७ धावांची खेळी साकारताना दोन षटकार ठोकले. मॅक्क्युलमने या षटकारानिशी अ‍ॅडम गिलख्रिस्टच्या कसोटी कारकीर्दीतील सर्वाधिक १०० षटकारांच्या विक्रमाची बरोबरी साधली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Vidarbha win twice

ताज्या बातम्या