Viral Video of Angry Carlos Braithwaite: टी-२० विश्वचषक २०१६ चा चॅम्पियन वेस्ट इंडिजचा हिरो अष्टपैलू कार्लोस ब्रॅथवेट मॅक्स६० कॅरिबियन लीगमध्ये खेळत आहे. न्यूयॉर्क स्ट्रायकर्स वि कॅरेबियन टायगर्स सामन्यात फलंदाजी करताना स्वस्तात बाद झाला. या सामन्यात तो ७ धावांवर खेळत असताना वादग्रस्तपणे आऊट झाल्याने त्याने संयम गमावला आणि रागाच्या भरात त्याने मैदानात बॅटने आपलं हेल्मेट बाऊंड्रीरेषेपार उडवून दिलं. सोशल मीडियावर समोर आलेल्या एका व्हिडिओमध्ये अष्टपैलू खेळाडू पूर्ण ताकदीने बॅटने हेल्मेट मारताना दिसत आहे.

हेही वाचा – WI vs SA: पुन्हा जिंकता जिंकता हरली दक्षिण आफ्रिका, अखेरच्या ५ षटकांत वेस्ट इंडिजने पालटला सामना, २० धावांत ७ विकेट…

MS Dhoni enjoying riding a bike in Ranchi after his holiday in America video gone viral
MS Dhoni : अमेरिकेतून परतल्यानंतर धोनीने बाईकवरुन फार्महाऊसमध्ये मारला फेरफटका, VIDEO व्हायरल
bigg boss 18 advocate Gunaratna sadavarte entry with pet donkey max in salman khan show watch promo
Bigg Boss 18 : गुणरत्न सदावर्तेंची शोमध्ये एन्ट्री,…
ENG vs AUS Liam Livingstone smashed 28 runs in a over of Mitchell Starc video viral
IPL मध्ये एका हंगामात २४ कोटी कमावणाऱ्या मिचेल स्टार्कच्या गोलंदाजीच्या ठिकऱ्या; लिव्हिंगस्टोनने ६ चेंडूत चोपल्या २८ धावा
Elon Musk Giorgia Meloni dating rumours
एलॉन मस्क जॉर्जिया मेलोनीला ‘डेट’ करतायत? स्वतः मस्क यांनी व्हायरल फोटोवर दिली प्रतिक्रिया
Virat Kohli draw Puma Cat sketch video viral
विराट कोहलीचे ‘ड्रॉइंग’ लहान मुलांपेक्षा वाईट आहे का? मांजराचा ‘स्केच’ काढतानाचा VIDEO व्हायरल
Hardik Pandya Met Agastya After Divorce
Hardik Pandya With Agastya : घटस्फोटानंतर हार्दिक पंड्या पहिल्यांदाच भेटला लेकाला, अगस्त्यच्या भेटीचा गोड VIDEO व्हायरल!
CPL 2024 Imad Wasim and Kieron Pollard fight with the umpire
CPL 2024 : आऊट झाल्यानंतर पाकिस्तानी खेळाडूने अंपायरशी घातला वाद, निर्णय बदलल्याने पोलार्डही संतापला, VIDEO व्हायरल
Hyundai Venue Adventure Edition launch
Hyundai : शार्क-फिन अँटेना, डॅशकॅमसह बरीच फीचर्स; मार्केटमध्ये येतेय नवी SUV; किंमत फक्त…

VIDEO: आऊट झाल्यानंतर भडकला कार्लाेस ब्रेथवेट

उत्तुंग षटकार मारण्यासाठी प्रसिद्ध असलेला ब्रॅथवेट डावाच्या ९व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर आऊट झाल्याने नाराज होता. आयर्लंड आणि ग्रँड केमन जग्वार्सचा वेगवान गोलंदाज जोश लिटलने शॉर्ट-पिच चेंडू टाकला आणि ब्रॅथवेटच्या खांद्यावर आदळल्यानंतर तो स्टंपच्या मागे बेन डंककडे गेला आणि कीपरने सोपा झेल घेतला. त्यामुळे ब्रेथवेट स्वस्तात बाद झाल्याने त्याला पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले.

हेही वाचा – PAK vs BAN: शकिब अल हसनने रागाच्या भरात मोहम्मद रिझवानला फेकून मारला चेंडू, पंचांनीही घेतला आक्षेप; पाहा VIDEO

अंपायरला वाटले की चेंडू ब्रॅथवेटच्या ग्लोव्हजला लागला आणि यष्टिरक्षकाकडे गेला, त्यामुळे त्याला आऊट देण्यात आले. या निर्णयावर ब्रॅथवेट खूश नव्हता. तो डगआऊटच्या दिशेने परत जात होता. तितक्यात त्याने डगआऊटपासून थोड लांब असताना आपलं हेल्मेट काढलं आणि बॅटने ते एखादा चेंडू मारतात त्याप्रमाणे उडवलं. हेल्मेट थेट बाऊंड्री रेषेबाहेर जाऊन पडलं आणि त्याचे काही भाग तुटून उडाले. ब्रॅथवेट हेल्मेटने मारत असताना समोर असलेला खेळाडूही लांब गेला तर तिथे उपस्थित असलेल्या सपोर्ट स्टाफला बाजूला व्हावे लागले. त्याचा हा व्हीडिओ चांगलाच व्हायरल होते आहे.

हेही वाचा – PAK vs BAN: पाकिस्तानचा घरच्या मैदानावर लाजिरवाणा पराभव, कसोटी क्रिकेटच्या इतिहासात बांगलादेशने पहिल्यांदा मिळवला विजय

न्यूयॉर्क स्ट्रायकर्सने निर्धारित दहा षटकांत १०४ धावा केल्या आणि ग्रँड केमन जग्वार्सचा 8 धावांनी पराभव केला. स्ट्रायकर्सचा फायनलमध्ये कॅरेबियन टायगर्सकडून ५६ धावांनी पराभव झाला. १२६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना संघाला ६९ धावाच करता आल्या. कर्णधार थिसारा परेराने ११ चेंडूत २ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने २५ धावा केल्या, पण टायगर्सने चेंडूनेही कमाल केली. श्रीलंकेचा निवृत्त क्रिकेटर सुरंगा लकमलने १.१ षटकात ९ धावा देत ३ विकेट घेतले.