scorecardresearch

Video: IND vs PAK आधी ‘मारो मुझे मारो फेम’ मोमीन साकिबने केला खोडकर सवाल; इरफान पठाणने उत्तर देताच..

Asia Cup IND vs PAK Video: भारत विरुद्ध पाकिस्तान सामना असेल आणि मारो मुझे मोमीन साकिबची आठवण येणार नाही हे अशक्यच आहे.

Asia Cup IND vs PAK Video
Asia Cup IND vs PAK Video (फोटो: इंस्टाग्राम/Momin Saqib)

Asia Cup IND vs PAK Video: भारत विरुद्ध पाकिस्तान सामना असेल आणि मारो मुझे मोमीन साकिबची आठवण येणार नाही हे अशक्यच आहे. यंदाच्या आशिया चषक सामन्यात सुद्धा पाकिस्तानला पाठिंबा देण्यासाठी मोमीन प्रेक्षकांमध्ये पाहायला मिळतोय. २८ ऑगस्टला पहिल्यांदा भारत विरुद्ध पाकिस्तान सामना झाल्यावर मोमीनने विराट कोहलीची भेट घेतली होती आणि आज ४ सप्टेंबरला पुन्हा एकदा हे दोन कट्टर प्रतिस्पर्धी आमने सामने येणार असताना मोमीन व इरफान पठाण यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आशिया चषकादरम्यान स्टेडियममध्ये इरफानसोबतच्या भेटीचा व्हिडिओ मोमीनने स्वतःच इंस्टाग्रामवर शेअर केला आणि त्याला कॅप्शन दिले, “भारताचा आतापर्यंतचा सर्वोत्तम स्विंग गोलंदाज इरफान पठाणला भेटून आनंद झाला. असे म्हणताना पुन्हा एकदा पंगा घेत मोमीनने इरफान भाई, तुम्ही मान्य करा अथवा करू नका पण आशिया चषक आमचाच आहे असेही म्हंटले आहे.

व्हिडिओमध्येआपण पाहू शकता की. मोमीन इरफानला स्टँडमध्ये भेटल्यावर त्याने आधी विचारपूस केली आणि, “तुम्ही २००६ मध्ये पाकिस्तानविरुद्ध जबरदस्त खेळला होतात असे म्हणत इरफानचे कौतुकही केले. यानंतर मोमीनने त्वरीत भारत-पाकिस्तान सामन्याकडे विषय वळवून “रविवार बद्दल तुम्हाला काय वाटतंय? असे विचारले. रविवारी म्हणजेच ४ सप्टेंबरला भारत- पाकिस्तान पुन्हा एकदा आशिया चषकात आमने सामने येणार आहेत.

यावर इरफानने पुन्हा तेच होणार असे उत्तर दिले तर यावर मोमीनने सुद्धा फिरकी घेत मागच्या वर्षी जे झाले तेच का? असा सवाल केला. मागच्या वर्षी म्हणजेच २०२१ मध्ये उबे येथे झालेल्या विश्वचषकात टीम इंडियाचा पाकिस्तानी संघाने पराभव केला होता. मोमीनच्या प्रश्नावर इरफानने मजेशीर उत्तर देताना, नाही रे ते एकदाच झालं, पुन्हा पुन्हा थोडी होणार आहे आणि आता आमच्या टीमच्या मुलांचा पण फॉर्म परत आलाय” असे म्हंटले.

(स्त्रीलंपट देशाची शान काय वाढवणार? मोहम्मद शमीच्या पत्नीची टीका; हार्दिक पंड्याचा फोटो शेअर करत म्हणाली…)

मारो मुझे मारो फेम मोमीन साकिब इंस्टाग्राम

भारत विरुद्ध पाकिस्तानच्या पहिल्या सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तानवर पाचच गाडी राखून मात केली होती. हार्दिक पांड्याच्या अभूतपूर्व अष्टपैलू खेळामुळे भारताला गेल्या रविवारी पाकिस्तानविरुद्धच्या विश्वचषकात झालेल्या पराभवाचा बदला घेता आला होता. मागच्या सामन्यात नसीम शाहने त्याच्या अभूतपूर्व गोलंदाजीने पाकिस्तानला काही आशा निर्माण केल्या होत्या, परंतु हार्दिकच्या खेळीने दुबईच्या अटीतटीच्या सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली होती.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 04-09-2022 at 15:33 IST

संबंधित बातम्या