IND vs NZ 3rd T20I: Ishan's ‘this’ action and Prithvi Shaw disappointed BCCI released video on reaching Ahmedabad | Loksatta

IND vs NZ 3rd T20I: इशानची ‘ती’ एक कृती अन् पृथ्वी शॉ झाला निराश, अहमदाबादला पोहचताच BCCIने Video केला जाहीर

India vs New Zealand: भारत- न्यूझीलंड यांच्यातील तिसरा टी२० सामना खेळला जाणार असून संघ अहमदाबादला पोहचला आहे. पण त्याच दरम्यान इशान किशन आणि पृथ्वी शॉ यांच्यातील व्हिडिओ व्हायरल झाला.

IND vs NZ 3rd T20I: Ishan's ‘this’ action and Prithvi Shaw disappointed BCCI released video on reaching Ahmedabad
सौजन्य- बीसीसीआय (ट्विटर)

India vs New Zealand: लखनऊच्या अवघड खेळपट्टीवर मालिका बरोबरीत मिळविल्यानंतर निर्णायक सामन्यासाठी हार्दिक पांड्या आणि कंपनी अहमदाबादला पोहोचली आहे. अहमदाबादला पोहोचलेल्या भारतीय संघाचे खेळाडू रिसेप्शनदरम्यान खूप मस्ती करताना कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. हा सामना बुधवार, १ फेब्रुवारी रोजी होणार आहे. रविवारी खेळवण्यात आलेला मालिकेतील दुसरा सामना कमी धावसंख्येचा झाला असला तरी तो खूपच रोमांचक होता. सुरुवातीला १०० धावांचा पाठलाग करणे खूप सोपे वाटले, परंतु न्यूझीलंडच्या फिरकीपटूंनी भारतीय फलंदाजांना या धावांपर्यंत मजल मारणे कठीण केले. मात्र, कर्णधार हार्दिक पांड्या आणि उपकर्णधार सूर्यकुमार यादव यांनी अखेर विजय मिळवला.

सोमवारी भारतीय क्रिकेट संघ तिसऱ्या आणि अंतिम टी२० सामन्यासाठी अहमदाबादला पोहोचला. येथे संघातील खेळाडूंचे हॉटेलमध्ये पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. दरम्यान, रिसेप्शनदरम्यान इशान किशन पृथ्वी शॉला खूप त्रास देताना दिसला. रिसेप्शनदरम्यान इशान पृथ्वी शॉची टोपी खेचण्याचा वारंवार प्रयत्न करत होता, पण त्याची ही युक्ती फसली.

पृथ्वी शॉने इशान किशनला तसे करण्यापासून रोखले. टीम इंडियाच्या अहमदाबादमध्ये आगमन आणि स्वागताचा हा व्हिडिओ बीसीसीआयने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये इशान किशन आणि पृथ्वी शॉ यांच्यातील हा चेष्टा-मस्करी आणि मजेशीर भांडणे पाहता येतील. इशान किशन आणि पृथ्वी शॉची ही स्टाईल चाहत्यांनाही पसंत पडत आहे.

विस्फोटक सलामीवीर फलंदाज

पृथ्वी शॉ उत्कृष्ट फॉर्ममध्ये धावत आहे. तो स्फोटक फलंदाजीत माहिर आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याने रणजी ट्रॉफीमध्ये ३७९ धावा केल्या आहेत, जी रणजी ट्रॉफीच्या इतिहासातील दुसरी सर्वोत्तम धावसंख्या आहे. त्याने टीम इंडियासाठी आधीच सलामीवीर म्हणून फलंदाजी केली आहे. त्याच्याकडे अफाट अनुभव आहे, जो भारतासाठी उपयुक्त ठरू शकतो.

हेही वाचा: IND vs AUS Test series: भारत दौरा सुरू होण्यापूर्वी कांगारूंची आरडाओरडा! विश्वास नाही म्हणून सराव सामना…, लावला अजब तर्क

दुसऱ्या टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यात भारताने न्यूझीलंडवर सहा गडी राखून शानदार विजय नोंदवला असला तरी कर्णधार हार्दिक पंड्याने लखनौच्या खेळपट्टीवर टीका केली. त्याने ही खेळपट्टी आश्चर्यकारक आणि टी२० क्रिकेटसाठी योग्य नसल्याचे वर्णन केले. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडचा संघ आठ विकेट्सवर केवळ ९९ धावाच करू शकला, तर फिरकीला अनुकूल खेळपट्टीवर लक्ष्याचा पाठलाग करताना भारतालाही अनेक अडचणी आल्या.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 31-01-2023 at 16:17 IST
Next Story
IND vs AUS Test series: भारत दौरा सुरू होण्यापूर्वी कांगारूंची आरडाओरड! विश्वास नाही म्हणून सराव सामना…, लावला अजब तर्क