scorecardresearch

Video: सुर्यकुमार यादवने मारलेला Shot of The Match पाहिलात का? ऑस्ट्रेलियन डगआऊटमधूनही मिळाली दाद

सामनावीर ठरलेल्या सुर्यकुमारने पाच चौकार आणि पाच षटकार लगावले. याच फटक्यांपैकी सर्वात सुंदर फटका ठरला तो हाच षटकार.

Video: सुर्यकुमार यादवने मारलेला Shot of The Match पाहिलात का? ऑस्ट्रेलियन डगआऊटमधूनही मिळाली दाद
हा व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे

भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्धची तीन सामन्यांची टी-२० मालिका २-१ च्या फरकाने जिंकली. मालिका १-१ च्या बरोबरीत असताना हैदराबादमध्ये झालेला अंतिम सामना भारताने सहा गडी राखून जिंकला. विराट कोहली आणि सूर्यकुमार यादवने केलेल्या सुरेख फलंदाजीच्या जोरावर भारताने हा सामना जिंकला. या विजयामुळे भारतीय संघातील मधल्या फळीतील फलंदाजांना सूर गवसल्याचं चित्र दिसून आलं. विशेष म्हणजे सुर्यकुमार यादवने झंझावाती अर्धशतक ठोकले. अवघ्या २९ झेंडूंमध्ये अर्धशतक झळकावणाऱ्या सुर्यकुमारने क्रिकेटमधील बरेच सुरेख फटके लगावत प्रेक्षकांच्या डोळ्यांचं पारणं फेडलं. मात्र यापैकी एक षटका पाहून तर समालोचकांनीही या फटक्याला शॉर्ट ऑफ द मॅच म्हटलं.

नक्की पाहा >> Viral Video: पंड्याने विजयी चौकार लगावल्यानंतर पायऱ्यांवर बसून सामना पाहणाऱ्या विराट आणि रोहितने काय केलं पाहिलं का?

३६ चेंडूंत ६९ धावा करताना सुर्यकुमारने तुफान फटकेबाजी केली. सामनावीर ठरलेल्या सुर्यकुमारने पाच चौकार आणि पाच षटकार लगावले. याच फटक्यांपैकी सर्वात सुंदर फटका ठरला तो डीप एक्स्ट्रा कव्हरवरुन लागवलेला षटकार. हा षटकार सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. सुर्यकुमार फॉर्ममध्ये असल्याचा हा षटकार पुरावा असल्याचं त्याचं चाहते सांगताना दिसत आहेत.

नक्की पाहा >> Video: बॉल लागण्याआधीच कार्तिकच्या हाताने स्टंम्प उडाला तरी मॅक्सवेल धावबाद कारण…; पाहा ‘तो’ नाट्यमय क्षण

सामन्यातील दहावं षटकामध्ये डॅनियल सॅम्स गोलंदाजी करत होता. सॅम्सने टाकलेला चेंडू सुर्यकुमारने क्रीजमधून चार पावलं पुढे येत थेट डीप एक्स्ट्रा कव्हरवरुन सीमेपार धाडला. हा षटकार पाहून समालोचकही आश्चर्यचकित झाले. त्यांनी या षटकाराला शॉट ऑफ द मॅच असं म्हणत सुर्यकुमारचं कौतुक केलं.

नक्की पाहा >> Ind vs Aus: अक्षरने स्वत:च्याच गोलंदाजीवर पकडला ‘वेड’ लावणारा कॅच; तुफान फॉर्ममधील वेडच्या विकेटचा Video पाहाच

१)

२)

३)

नक्की वाचा >> Ind vs Aus: भारतीय गोलंदाजांना कुटणाऱ्या ग्रीनबद्दल जाफरचं मोठं भाकित; Meme शेअर करत म्हणाला, “IPL संघ…”

समालोचकच काय तर ऑस्ट्रेलियन डगआऊटमध्ये बसलेल्या ऑस्ट्रेलियन खेळाडूही हा फटका पाहून हसताना दिसले. त्यांनी स्मितहास्याच्या माध्यमातून या षटकाराला अनोखी दाद दिली. सुर्यकुमारच्या अनेक चाहत्यांनी सोशल मीडियावरुन हा व्हिडीओ शेअर केला आहे.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या