* क्रिकेट विश्वातल्या गमती-जमती
वेस्टइंडिज विरुद्ध बांगलादेश, २०१२ सालचा सहारा करंडक मालिकेतील हा अंतिम सामना बांगलादेश संघाला चिरंतर लक्षात राहण्याजोगाच झाला होता. सामन्यात बांगलादेश संघ मजबूत स्थितीत होता. वेस्टइंडिज संघाच्या २१७ धावांचा पाठलाग करताना सामन्याच्या अखेरीस बांगलादेश संघाला ३९ चेंडूत अवघ्या दोन धावांची गरज होती. बांगलादेश संघाच्या आठ विकेट्सही पडल्या होत्या. त्यात बांगलादेशच्या फलंदाजाने ‘लेग स्वेअर’ फटका मारून एक धाव घेतली. आता बांगलादेशची धावसंख्या २१७ झाली. बांगलादेशच्या विजयावर शिक्कामोतर्ब होण्यासाठी केवळ एका धावेची गरज होती. स्टेडियमवर बांगलादेश क्रिकेट रसिकांचा एकच जल्लोष सुरू होता. त्यात बांगलादेश खेळाडूंच्या चेहऱयावरही विजयाच्या आनंदाची झलक पहायला मिळत होती.
पुढच्या चेंडूवर फटका लगावत शेवटची धाव घेण्यासाठी बांगलादेशचे दोन्ही फलंदाज पुढे सरसावले खरे. पण, सामना जिंकण्याचा जल्लोष करण्याच्या नादात त्यातील एका फलंदाजाने धाव पूर्ण केली नाही. हे वेस्टइंडिजने हेरले आणि फलंदाजाला धावचित केले.
त्यामुळे  बांगलादेश संघाला विजयी जल्लोष बाजूला ठेवून पुन्हा एक धाव घेण्यासाठी पुढच्या चेंडूला सामोरे जावे लागले. अर्थात बांगलादेश सामन्यात मजबूत स्थितीत असल्यामुळे सामना त्यांनीच जिंकला पण, सरते शेवटी क्रिकेट विश्वातली एक अनोखी गम्मत क्रिकेट रसिकांच्या आठवणीत राहील अशी घडली.