John Cena among the umpires in the cricket ground: कुस्तीचा दिग्गज जॉन सीना जगभरात खूप आवडतो. आता त्याची क्रेझ क्रिकेटची मैदानावर उपस्थित अंपायरमध्येही दिसून आली, जेव्हा अंपायर मैदानावरच जॉन सीनाची ॲक्शन करताना दिसले. कुस्तीच्या दिग्गजाच्या ॲक्शनमध्ये अंपायरने गोलंदाजाची अपील फेटाळून लावली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

हा व्हायरल व्हिडीओ सध्या खेळल्या जात असलेल्या कॅरेबियन प्रीमियर लीगच्या क्वालिफायर-एकचा आहे. या स्पर्धेतील पहिला क्वालिफायर सामना गयाना ॲमेझॉन वॉरियर्स आणि त्रिनबागो नाइट रायडर्स यांच्यात खेळला गेला. गयाना ॲमेझॉन वॉरियर्सचे नेतृत्व दक्षिण आफ्रिकेचा माजी खेळाडू इम्रान ताहिर करत आहे, ज्याने या सामन्यात अंपायरकडे एलबीडब्ल्यूसाठी अपील केली होती. यानंतर अंपायर्सने जॉन सीनाची ॲक्शन करत ताहिरची अपील फेटाळली. खरं, तर अंपायरला त्या ॲक्शनमधून सांगायचे होते की, त्याला काहीही दिसले नाही.

व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे, चेंडू फेकल्यानंतर ताहिर जवळजवळ अंपायरच्या समोर आडवा येतो. ज्यामुळे अंपायर एलबीडब्ल्यू पाहण्यात पूर्णपणे अपयशी ठरला. मात्र, अंपायरचा निर्णय पाहून ताहिर लगेच डीआरएसकडे वळतो, ज्यामुळे त्याला विकेट मिळते. अशाप्रकारे जॉन सीनाची झलक क्रिकेटच्या मैदानावरील अंपायरमध्ये पाहायला मिळते.

हेही वाचा – World Cup 2023: ‘मी कुलदीप यादवची निवड करु शकत नाही, कारण तो…’; पीसीबीचे निवडकर्ता इंझमाम-उल-हकचं मोठं वक्तव्य

इम्रान ताहिरच्या संघाने गमावला सामना –

या सामन्यात त्रिनबागो नाईट रायडर्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना इम्रान ताहिरच्या नेतृत्वाखाली गयाना ॲमेझॉन वॉरियर्सने २० षटकांत ७ गडी गमावून १६६ धावा केल्या. प्रत्युत्तरात त्रिनबागो नाईट रायडर्सने धावांचा पाठलाग करताना १८.१ षटकांत ३ गडी राखून लक्ष्य गाठले. चॅडविक वॉल्टनने नाबाद राहताना संघासाठी ८० धावांची शानदार खेळी खेळली. वॉल्टनने या खेळीत ६ चौकार आणि ४ षटकार मारले.

Story img Loader