scorecardresearch

Premium

MS Dhoni: माहीचा नवा लूक! महेंद्र सिंग धोनीच्या पोनी-टेल हेअरस्टाइलचा VIDEO होतोय तुफान व्हायरल

Pony-Tail Hairstyle: माजी भारतीय कर्णधार महेंद्र सिंग धोनीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एमएस धोनीच्या पोनी-टेल हेअरस्टाइलमध्ये दिसत आहे.

of MS Dhoni's new look Video Viral
माहीचा नवा लूक (फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

MS Dhoni in Pony-Tail hairstyle Video Viral: एमएस धोनी कुठेही गेला तरी, तो चाहत्यांपासून लपून राहू शकत नाही. कारण त्याच्या चाहत्यांची संघ्या जगभरात मोठ्या प्रमाणात पसरली आहे. आयपीएल व्यतिरिक्त कोणतेही क्रिकेट खेळत नसतानाही, सीएसकेचा कर्णधार जेव्हाही सार्वजनिक ठिकाणी दिसतो. तेव्हा चाहते सेल्फीसाठी हजर होतात. आता धोनीचा असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये धोनीचा नवीन लूक चाहत्यापासून लपून राहिला नाही. कारण चाहत्यांची नेहमीच त्याच्यावर बारीक नजर ठेवतात.

नुकत्याच व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये, पाच वेळा आयपीएल विजेता कर्णधार पोनीटेल हेअरस्टाइलमध्ये दिसला आहे. व्हिडीओमध्ये धोनी बसमधून उतरत असताना त्याच्यासोबत बॉडीगार्ड होते. टक्कल करण्यापासून ते मोहॉक करण्यापर्यंत, धोनीने गेल्या काही वर्षांत अनेक केशरचना केल्या आहेत. माही शेवटचा आयपीएल २०२३ च्या फायनलमध्ये खेळताना दिसला होता, जिथे त्याने सीएसकेला पाचव्यांदा विजेतेपद मिळवून दिले.

MS Dhoni dancing in front of Sakshi
MS Dhoni: माहीने ‘देसी बॉयज’मधील ‘झक मार के’ गाण्यावर साक्षीसमोर धरला ठेका, मजेशीर डान्सचा VIDEO होतोय व्हायरल
Mahendra Singh Dhoni Fitness Appreciated By Fans
MS Dhoni: महेंद्रसिंग धोनीने टेनिस कोर्टवर दाखवली आपली जादू , केली जोरदार फटकेबाजी, पाहा VIDEO
Very few people like you Gambhir's birthday post for Naveen-ul-Haq who will clash with Kohli
Naveen-ul-Haq: विराट कोहलीशी भिडणाऱ्या नवीन-उल-हकच्या वाढदिवशी गंभीरची पोस्ट व्हायरल; म्हणाला, “आपके जैसे बहुत कम लोग…”
IND vs SL Rohit Sharma Catch Video Vira;
IND vs SL: हिटमॅनने डायव्हिंग करत एका हाताने घेतला शानदार झेल, रोहितच्या शर्माच्या कॅचचा VIDEO सोशल मीडियावर व्हायरल

माहीचा नवा लूक –

एमएस धोनीने २००७ मध्ये भारताचे कर्णधारपद स्वीकारले आणि पहिल्याच वर्षी टी-२० विश्वचषक जिंकण्यात यशस्वी ठरला. गंभीर आणि धोनी यांनी मिळून टीम इंडियासाठी आयसीसी विश्वचषक २०११ चे विजेतेपद पटकावले होते. या दोघांनी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात शानदार अर्धशतके झळकावली. धोनीने नाबाद ९१ धावा केल्या होत्या, तर गंभीरने ९७ धावांची मॅचविनिंग इनिंग खेळली होती.

हेही वाचा – MS Dhoni: ‘मला वाटत नाही…’; माहीच्या नेतृत्वाबद्दल गंभीरचं पुन्हा एकदा विश्वचषकापूर्वी मोठं वक्तव्य, पाहा VIDEO

महेंद्र सिंग धोनीच्या नेतृत्वाखाली, भारताने ३ आयसीसी विजेतेपद जिंकले, ज्यात एकदिवसीय विश्वचषक, टी-२० विश्वचषक आणि चॅम्पियन्स ट्रॉफीचाही समावेश आहे. २०१९ चा विश्वचषक धोनीचा शेवटचा होता, त्यानंतर त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून कायमचा निरोप घेतला.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Video of ms dhonis new look in pony tail hairstyle is viral on social media vbm

First published on: 30-09-2023 at 13:24 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×