scorecardresearch

Premium

IND vs AUS WTC Final: अंपायरने शुबमन गिलची विकेट ढापली! ट्रॉफी जिंकण्यासाठी कांगारूंचा रडीचा डाव, VIDEO व्हायरल

IND vs AUS: डब्ल्यूटीसी स्पर्धेचा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात खेळला जात आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पहिल्या आणि दुसऱ्या डावांच्या जोरावर भारतासमोर ४४४ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. या दरम्यान शुबमन गिलचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

India vs Australia, WTC 2023 fina
शुबमन गिल (फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Shubman Gill being wrongly dismissed by the third umpire: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२३ चा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात खेळला जात आहे. या सामन्यातील पहिल्या डावात ऑस्ट्रेलिया संघाने ४६९ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारतीय संघाला आपल्या पहिल्या डावात २९६ धावांपर्यंतच मजल मारता आली. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात ८ बाद २७० धावांवर आपला डाव घोषित केला. तसेच भारतीय संघाला ४४४ धावांचे लक्ष्य दिले आहे. या धावांचा पाठलाग करताना शुबमन गिलला चुकीच्या पद्धतीने बाद दिल्याने वाद निर्माण झाला. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर होत आहे.

भारताला पहिला झटका ४१ धावांवर बसला. स्कॉट बोलँडने शुबमन गिलला कॅमेरून ग्रीनकडे झेलबाद केले. मात्र, ग्रीनच्या झेलावरून वाद सुरू झाला. खरं तर, स्लिपमध्ये झेल घेत असताना, चेंडू ग्रीनच्या हातात अडकला आणि तो जमिनीवर घासला, पण तिसऱ्या अंपायरने त्याला आऊट दिले. समालोचन करताना दीप दासगुप्ता आणि हरभजन सिंगही शुबमन नाबाद असल्याचे म्हटले. त्यानंतर चाहतेही खूप संतापलेले दिसत होते.

Gutami sai mrunmayi
गौतमी देशपांडे ‘या’ लोकप्रिय अभिनेत्याला करतेय डेट? सई ताम्हणकरच्या कमेंटवर उत्तर देत मृण्मयी म्हणाली…
gang rape
संतापजनक: मध्यरात्री घरात घुसून विवाहितेवर गँगरेप; काही तासांतच जोडप्याने उचललं टोकाचं पाऊल
couple Kulhad Pizza Couple Private MMS Leak
कुल्हड पिझ्झा कपलचा प्रायव्हेट व्हिडीओ लीक? सेहज अरोराने दिलं स्पष्टीकरण, म्हणाला ‘माझी चूक…’
Ajit Pawar on Sharad Pawar Praful Patel Photo
पक्षातील बंडखोरीनंतरही शरद पवार आणि प्रफुल्ल पटेलांचा एकत्र फोटो, चर्चांना उधाण, अजित पवार म्हणाले…

त्याच वेळी, रोहित शर्मा आणि खुद्द शुबमन यांना आऊट घोषित केल्याबद्दल विश्वास बसत नव्हता. शुबमनला १९ चेंडूत १८ धावा करता आल्या. सध्या रोहित शर्मा २२ धावा करून क्रीजवर आहे. शुभमन आऊट होताच चहाची वेळ जाहीर झाली. भारताला अजून ४०३ धावांची गरज आहे. तसंच आधुनिक तंत्रज्ञान असतानाही थर्ड अंपायरने व्हिडीओ झूम आणि फ्रिझ केला नाही. त्यामुळे टीम इंडियाच्या चाहत्यांसह समालोचकांनी नाराजी व्यक्त केली. गिलला अंपायरने बाद दिल्यानंतर रोहित शर्माने अंपायरशी चर्चा केली. पंरतु, त्यानंतरही गिलला बाद देण्यात आलं आण टीम इंडियाला पहिला धक्का बसला.

हेही वाचा – IND vs AUS WTC Final: ऑस्ट्रेलियन चाहत्यांनी ‘इंडिया जीतेगा’च्या दिल्या घोषणा, सोशल मीडियावर VIDEO होतोय तुफान व्हायरल

ऑस्ट्रेलियाने डाव घोषित केला –

ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात हेड आणि स्मिथच्या शतकाच्या जोरावर १२१.३ षटकांत सर्वबाद ४६९ धावा केल्या होत्या. यानंतर प्रत्युत्तरात भारतीय संघाने अजिंक्य रहाणे आणि शार्दुल ठाकुरच्या अर्धशतकांच्या जोरावर ६९.४ षटकांत सर्वबाद २९६ धावा केल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाने अॅलेक्स कॅरीच्या अर्धशतकाच्या जोरावर ८४.३ षटकांत ८ बाद २७० धावांवर डाव घोषित केला. तसेच भारतीय संघासमोर ४४४ धावांचे लक्ष्य ठेवले.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 10-06-2023 at 20:07 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×