Raina-Harbhajan Dance On Natu Natu Song: एसएस राजामौली यांचा ‘आरआरआर’ हा तेलगू चित्रपट हिट ठरला होता. आता या चित्रपटातील नाटू-नाटू गाण्याला ऑस्करमध्ये सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याचा पुरस्कार जिंकला आहे. या ऐतिहासिक कामगिरीमुळे सर्वत्र नाटू नाटू गाण्याची सुरु आहे. हे गाणे लोकांच्या ओठावर तर आहेच, पण क्रिकेटर्समध्ये या गाण्याची प्रचंड क्रेझ आहे. असेच काहीसे क्रेझ लेजेंड्स लीग क्रिकेट (LLC 2023) दरम्यान पाहायला मिळाली.

बुधवारी इंडिया महाराज आणि वर्ल्ड जायंट्स यांच्यात सामना पार पडला. या सामन्यादरम्यान दिग्गज क्रिकेटर सुरेश रैना आणि हरभजन सिंग नाटू नाटू गाण्यावर डान्स करताना दिसले. एलएलसीने या दोघांचा डान्स करताना व्हिडिओ ट्विट केला आहे. ज्यामध्ये दोघेही जबरदस्त डान्स करताना दिसत आहेत. दोघांची ही मस्ती आणि जुगलबंदी पाहून क्रिकेटप्रेमी खूश झाले आहेत.

LSG Coach justing langer reaction on Signing Rohit sharma in mega auction
IPL 2024: रोहित शर्माला मेगा लिलावात लखनौ खरेदी करणार? कोच जस्टिन लँगरची भन्नाट प्रतिक्रिया, VIDEO व्हायरल
The Kerala Story screening in church
‘लव्ह जिहाद’चं कारण देत विद्यार्थ्यांना दाखवला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट; केरळच्या चर्चमधला प्रकार!
IPL, GT vs PBKS Preity Zinta Post For Shashank Singh
“IPL लिलावाच्या वेळी झालेल्या चुकीच्या..”, शशांक सिंगबाबत वादावर प्रीती झिंटाने सोडलं मौन, म्हणाली, “आजचाच..”
juna furniture teaser released by salim khan
ज्येष्ठ नागरिकांचा सहानुभूतीने विचार करायला हवा

सुरेश रैनाची शानदार –

प्रथम फलंदाजी करताना इंडिया महाराजाजनी २० षटकात ९ गडी गमावून १३६ धावा केल्या. यावेळी सुरेश रैनाने शानदार फलंदाजी करताना ४१ चेंडूत ४९ धावा केल्या. त्याने आपल्या शानदार खेळीत २ चौकार आणि ३ षटकार ठोकले. त्याचवेळी मनविंदर बिस्लाने ३४ चेंडूत ३६ आणि इरफान पठाणने २० चेंडूत २५ धावा केल्या. त्याने एक चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने या धावा फटकावल्या.

ब्रेट लीची शानदार गोलंदाजी –

ब्रेट लीने वर्ल्ड जायंट्ससाठी शानदार गोलंदाजी केली. त्याने ३ षटकात १८ धावा देत ३ बळी घेतले. ख्रिस पोफूने ४ षटकांत २२ धावांत २ तर टिनो बेस्टने ४ षटकांत २७ धावांत २ विकेट घेतल्या.

हेही वाचा – IPL 2023: १६व्या हंगामासाठी सनरायझर्स हैदराबादची नवीन जर्सी लाँच; पाहा मजेदार VIDEO

वर्ल्ड जायंट्सचा ३ विकेट्सने विजय –

वर्ल्ड जायंट्सने १३७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना १८.४ षटकांत ७ बाद १३९ धावा केल्या. त्याचबरोबर हा सामना ३ विकेट्सने जिंकला. वर्ल्ड जायंट्स संघासाठी ख्रिस गेलने सर्वाधिक धावा केल्या. त्याने ४६ चेंडूत ९ चौकार आणि १ षटकार लगावत ५७ धावा केल्या. त्याचबरोबर शेन वॉटसननेही २६ धावांचे योगदान दिले. इंडिया महाराजाजकडून गोलंदाजी करताना युसूफ पठाणने सर्वाधिक विकेट्स घेतल्या. त्याने ४ षटकांत १४ धावा देताना २ विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर इतर गोलंदाजांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.