KS Bharat taking an amazing catch of David Warner: लंडनमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांत डब्ल्यूटीसीचा फायनल सामना खेळला जात आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाची सुरुवात चांगली झाली आहे. ऑस्ट्रेलियाची दुसरी विकेट डेव्हिड वॉर्नरच्या रूपाने पडली. शार्दुल ठाकूरने त्याला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. वॉर्नरचा केएस भरतने अप्रतिम झेल टिपला. हा झेल खूप कठीण होता. यासाठी सोशल मीडियावर भरतचे खूप कौतुक होत आहे. त्याचबरोबर त्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

खरं तर, ऑस्ट्रेलियन डावात शार्दुल ठाकूर भारताकडून २२ वे षटक टाकण्यासाठी आला होता. या षटकातील चौथ्या चेंडूवर वॉर्नर झेलबाद झाला. त्याने मारलेला चेंडू यष्टीरक्षकापासून थोड्याच अंतरावर पडणार होता. परंतु हे पाहून भरतने हवेत उडी मारून अवघड झेल घेतला. भरतच्या या झेलचे कौतुक होत आहे. भरतच्या झेलने टीम इंडियाचा मोठा धोका टळला. तसेच डेव्हिड वॉर्नरचे अर्धशतकही हुकले. ४३ धावांवर खेळत असलेल्या वार्नरला शार्दुल आणि भरतने तंबूचा रस्ता दाखवला.

Double MA and PhD Lady Selling tea on road
MA, Ph.D ची डिग्री असूनही विकतेय रस्त्यावर चहा, महिलेनी सांगितले कारण, VIDEO Viral
Virat-Gautham interaction video goes viral
KKR vs RCB : भाईचारा ऑन टॉप! विराट-गंभीर एकमेकांशी संवाद साधतानाचा नवीन VIDEO व्हायरल
a young boy denied entry to bank of India branch for wearing shorts video goes viral
Nagpur Video: हा कोणता नियम! शॉर्ट पॅन्टमुळे बँकेत No Entry; नागपूरच्या तरुणाचा व्हिडीओ होतोय व्हायरल..
young Man takes selfie with leopard
Video : “डर के आगे जीत है..” शेतकरी तरुणाने घेतली चक्क चित्ताबरोबर सेल्फी, शेतातील व्हिडीओ होतोय व्हायरल

केएस भरतचे अनेक व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत. त्याचेही कौतुक होत आहे. वृत्त लिहेपर्यंत ऑस्ट्रेलियाने ३६ षटकांत ३ गडी गमावून १२५ धावा केल्या होत्या. स्टीव्ह स्मिथ १९ आणि ट्रॅव्हिस हेड ३२ धावांवर खेळत होते. तत्पूर्वी, मार्नस लबुशेन २६ धावा करून बाद झाला. उस्मान ख्वाजाला खातेही उघडता आले नाही. वॉर्नरने ४३ धावांचे योगदान दिले. भारताकडून उमेश यादव वगळता सर्व गोलंदाजांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन –

भारत: रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, श्रीकर भरत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, उमेश यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज.

हेही वाचा – IND vs AUS WTC Final 2023: “जडेजापेक्षा अश्विन डावखुऱ्या…”, भारताच्या प्लेइंग इलेव्हनवरुन रिकी पाँटिगची रोहित शर्मावर टीका

ऑस्ट्रेलिया: डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, कॅमेरॉन ग्रीन, अ‍ॅलेक्स कॅरी (यष्टीरक्षक), पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन, स्कॉट बोलँड.