VIDEO : भारताच्या महिला कर्णधाराची अवाक करणारी जादू

एकाच दिवसात व्हिडीओला अडीच लाखांहून अधिक व्ह्यूज

करोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे जगभरात भीतीचे वातावरण आहे. सुमारे दोन लाखांहून अधिक लोकांना करोना व्हायरसचा फटका बसला आहे. प्रत्येक देश आपापल्या परीने या व्हायरसशी झुंज देत आहे. विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. डॉक्टर आणि रूग्णालयातील इतर सहकाऱ्यांच्या अथक परिश्रमामुळे जवळपास ७८ हजार लोक करोनातून पूर्णपणे बरे झाले असल्याची माहिती आहे. त्यामुळे योग्य ती काळजी आणि उपचार घेतल्यास हा आजार बरा होऊ शकतो, यावर साऱ्यांचा विश्वास असून भारतातही याबाबत जनजागृती केली जात आहे. करोनाचा फटका क्रीडा विश्वालाही बसला असून बहुतांश क्रीडास्पर्धा रद्द झाल्या आहेत.

भारतात धर्म मानल्या जाणाऱ्या क्रिकेटच्या स्पर्धादेखील काही काळ स्थगित करण्यात आल्या असून IPL चे आयोजन लांबणीवर ढकलण्यात आले आहे. करोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सर्व क्रिकेटपटू चाहत्यांना घरी बसण्याचे आणि सावधनता बाळगण्याचा सल्ला देत आहेत. या दरम्यान, काही क्रिकेटपटू सोशल मीडियावर व्हिडीओ बनवण्यात व्यस्त आहेत. भारताचा फिरकीपटू युझवेंद्र चहल यात आघाडीवर आहे. त्याच्या पाठोपाठ भारतीय महिला क्रिकेटपटू वेदा कृष्णमूर्ती हिनेदेखील डान्सचा व्हिडीओ केला होता. त्यानंतर आता भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर हिचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

 

View this post on Instagram

 

Mirror, mirror on the wall, who the realest of them all.

A post shared by Harmanpreet Kaur (@imharmanpreet_kaur) on

भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर ही जादूगार झालेली पाहायला मिळत आहे. हरमनप्रीतने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यात तिने एक अजब गजब अशी जादू दाखवली आहे. सारेच तिची जादू पाहून थक्क झाले आहेत.

यापूर्वी भारताचा फलंदाज श्रेयस अय्यरनेही असाच एक जादूगारीचा व्हिडीओ पोस्ट केला होता.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Video of women indian team captain harmanpreet turns into magician vjb

Next Story
ऑलिम्पिक पदकात पुण्याचाही वाटा -सायना
ताज्या बातम्या