Pakistan Sarfaraz Ahmed Shocking Revelation: पाकिस्तानचा अनुभवी यष्टिरक्षक-फलंदाज सरफराज अहमदने कसोटी क्रिकेटमध्ये शानदार पुनरागमन केले. सरफराजने सोमवारी न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्याच्या पहिल्या डावात ८६ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. इतकंच नव्हे तर कर्णधार बाबर आझमच्या साथीने १९६ धावांची भागीदारी करून पाकिस्तानला संकटातून बाहेर काढले. यजमानांनी अखेरीस कराचीमध्ये 438 धावा केल्या, ज्यात बाबरने अभूतपूर्व १६१ धावा केल्या तर आगा सलमाननेही (१०३) धावा केल्या.

कसोटीच्या पहिल्या दिवशी शानदार खेळी केल्यानंतर, सरफराजने मैदानावर येण्याआधीचा आपला अनुभव शेअर केला आहे. पहिल्या सत्राच्या शेवटी फक्त तीन चेंडू बाकी असताना सरफराज अहमद बाबरच्या समोर मैदानावर आला. दुसऱ्याच चेंडूवर त्याने चौकारही मारला पण सरफराज सत्र संपवून जेव्हा ड्रेसिंग रूममध्ये पोहोचला तेव्हा तो इतका हादरला होता की इतर खेळाडूंना त्याला शांत करावे लागले. याविषयी सांगताना सरफराज म्हणाला की, जेव्हा मी पहिले तीन बॉल खेळलो तेव्हा जर कोणी माझ्या हृदयाचे ठोके मोजले असते तर कदाचित मोजायला आणलेला मॉनिटरच फुटला असता.

Confirmed Rohit Sharma does not stay with Mumbai Indians team in Mumbai
रोहित शर्माने सांगितलं मुंबई इंडियन्सच्या संघासह न राहण्याचं कारण; म्हणाला, “आता माझ्या हातात तर..”
IPL 2024 Punjab Kings vs Mumbai Indians Match Updates in Marathi
IPL 2024: बुमराहला षटकार मारल्यावर आशुतोष शर्माचा आनंद गगनात मावेना! सामन्यानंतर म्हणाला….
Case against five persons in case of death of worker due to crane hook falling on head
पुणे : डोक्यात क्रेनचा हुक पडून कामगाराच्या मृत्यूप्रकरणी पाचजणांविरुद्ध गुन्हा
Mathisha Pathirana taking an amazing catch of David Warner
CSK vs DC : मथीशा पाथिरानाने वॉर्नरचा घेतला एका हाताने अप्रतिम झेल, धोनीसह संपूर्ण स्टेडियम झाले चकीत, पाहा VIDEO

सरफराज म्हणाला की, “मी पुन्हा पदार्पण करत होती आणि ते ही अशा वेळी जेव्हा स्थिती खूपच बिकट होती. खरं तर, जेव्हा मी दुपारच्या जेवणासाठी परत आलो तेव्हा माझ्या टीमला कळले की मी कोणत्या परिस्थितीतून जात आहे, माझं हृदय खूप जोरात धडकत होतं. यावेळी बाबरनेही मला खूप शांत करण्याचा प्रयत्न केला”.

हे ही वाचा<< Flashback 2022: भारतीय महिला क्रिकेट संघाने तीनपैकी दोन स्पर्धेत फडकवला तिरंगा, पाहा कामगिरी

दरम्यान, बाबर आझमने मला खूप विश्वास दिला त्याने गरज असताना एका अनुभवी खेळाडूची भूमिका बजावली मला त्याची गरज होती. जेव्हा ब्रेकनंतर मैदानात उतरलो तेव्हा खरोखरच मॅच खेळलो असे वाटले, असेही सरफराजने सांगितले.