Video : भरपूर झोप, लुडो आणि घरकामात मदत; पाहा मराळमोळ्या स्मृती मंधानाचं क्वारंटाइन शेड्युल

स्मृती सध्या सांगलीतल्या घरात परिवारासोबत

सध्या संपूर्ण देशभरात करोना विषाणूने थैमान घातला आहे. महत्वाच्या शहरात करोना बाधित रुग्ण सापडत आहेत. परिस्थितीचं गांभीर्य ओळखत बीसीसीआयने आपल्या सर्व क्रीडा स्पर्धा रद्द केल्या आहेत. २९ मार्चपासून सुरु होणाऱ्या आयपीएलवरही टांगती तलवार आहेच. भारतीय संघाचे खेळाडू सध्या घरात बसून आपल्या परिवारासोबत वेळ घालवण्याचा प्रयत्न करत आहेत. भारतीय महिला संघाची क्रिकेटपटू स्मृती मंधानाने सध्या आपलं क्वारंटाइन शेड्युल सगळ्यांशी शेअर केलं आहे.

स्मृती सध्या आपल्या सांगलीतल्या घरात आहे. या काळात ती स्वतःला तंदुरुस्त ठेवण्याकडे विशेष लक्ष देत आहे. याशिवाय घरकामात आईला मदत, लुडो खेळणं आणि भावासोबत दंगामस्ती असा स्मृतीचा दिनक्रम सुरु आहे.

काही दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदी यांनी देशात लॉकडाउनची घोषणा केली होती. त्याच्या एक दिवस आधी स्मृती मुंबईवरुन आपल्या सांगलीतल्या घरी आली होती. खबरदारीचा उपाय म्हणून तिने स्वतःला या काळात क्वारंटाइन केलं होतं…मात्र तिला कसलाही धोका नसल्याचं सांगली महापालिकेच्या आरोग्य विभागाने स्पष्ट केलं.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Video watch how smriti mandha keeping herself fit during quarantine period psd

Next Story
हॉकीबाबतचा फैसला ३ नोव्हेंबरला
ताज्या बातम्या