विजय हजारे क्रिकेट स्पर्धेला आजपासून प्रारंभ

स्थानिक क्रिकेटमध्ये मानाचे स्थान असलेल्या विजय हजारे करंडक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेला बुधवारपासून प्रारंभ होणार आहे. एकूण ३८ संघांत होणाऱ्या या स्पर्धेत युवा ताऱ्यांना ‘आयपीएल’ लिलावापूर्वी संघमालकांचे लक्ष वेधण्याची सुवर्णसंधी आहे. त्यामुळे राहुल चहर, हर्षल पटेल, आवेश खान, अथर्व अंकोलेकर यांच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष असेल.

ऋतुराजकडे महाराष्ट्राचे नेतृत्व

उदयोन्मुख फलंदाज ऋतुराज गायकवाडकडे विजय हजारे स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे नेतृत्व सोपवण्यात आले असून राहुल त्रिपाठी उपकर्णधारपद सांभाळणार आहे. महाराष्ट्राची बुधवारी सलामीच्या लढतीत मध्य प्रदेशशी गाठ पडणार आहे.

’ महाराष्ट्राचा संघ : ऋतुराज गायकवाड (कर्णधार), राहुल त्रिपाठी, यश नाहर, नौशाद शेख, अझिम काझी, अंकित बावणे, शाम्सशुझमा काझी, मुकेश चौधरी, प्रदीप दाढे, मनोज इंगळे, आशय पालकर, दिव्यांग हिंगणेकर, जगदीश झोपे, स्वप्निल फुलपागर, अवधूत दांडेकर, तरणजित सिंग ढिल्लोन, सिद्धेश वीर, यश क्षीरसागर, पवन शहा, धनराज परदेशी.