तामिळनाडू आणि अरुणाचल प्रदेश यांच्यात विजय हजारे ट्रॉफी सामना खेळला जात आहे. या सामन्यात नारायण जगदीसन आणि साई सुदर्सन या सलामीच्या जोडीने आश्चर्यकारक कामगिरी केली. तामिळनाडूच्या या सलामीच्या जोडीने लिस्ट ए क्रिकेटमध्ये आतापर्यंतची सर्वात मोठी भागीदारी करण्याचा विक्रम केला.

यादरम्यान त्यांनी व्हॅन विक आणि कॅमेरून डेलपोर्टचे रेकॉर्ड मागे टाकले. तामिळनाडूच्या दोन्ही सलामीवीरांनी धडाकेबाज शतके झळकावली. जगदीसन त्रिशतक झळकावण्यापासून हुकला. 277 धावा करून तो बाद झाला. तर सुदर्शनने १५४ धावांची खेळी केली. तामिळनाडू संघाने आपल्या डावात २ गडी गमावून ५०६ धावांची मोठी धावसंख्या उभारण्यात यश मिळविले.

Yashasvi Jaiswal is the first player to score two centuries in IPL before turning 23
IPL 2024: यशस्वीने एकाच शतकासह रचला इतिहास, आयपीएलमध्ये ही कामगिरी करणारा ठरला पहिला फलंदाज
IPL 2024 Lucknow Super Giants vs Chennai Super Kings Match Updates in Marathi
IPL 2024 : केएल राहुलने वर्षानुवर्षे धोनीच्या नावे असलेला मोठा विक्रम मोडला, ही कामगिरी करणारा पहिलाच खेळाडू
Shubman Gill Surpasses Virat Kohli and Sanju Samson in Unique Record
IPL 2024: शुबमन गिलने विराट-सॅमसनला मागे टाकत रचला इतिहास, आयपीएलमध्ये हा पराक्रम करणारा ठरला पहिला खेळाडू
Rohit sharma becomes first Indian player to win 250 T20
Rohit Sharma Records: रोहित शर्माच्या नावे अनोखा विक्रम, टी-२० मध्ये ही कामगिरी करणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला

पहिल्या विकेटसाठी ४१६ धावा जोडल्या –

बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या या सामन्यात अरुणाचल प्रदेशने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण केले. डावाची सुरुवात करण्यासाठी आलेल्या नारायण जगदीसन आणि साई सुदर्सन यांनी विरोधी गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. दोन्ही खेळाडूंनी आक्रमक फलंदाजी करताना शतके झळकावली. यादरम्यान सलामीच्या जोडीने ४१६ धावांची विक्रमी भागीदारी केली. याआधी लिस्ट ए क्रिकेटमध्ये ३६७ धावांची सर्वात मोठी सलामी भागीदारी करण्याचा विक्रम दक्षिण आफ्रिकेचे फलंदाज व्हॅन विक आणि कॅमेरून डेलपोर्ट यांच्या नावावर होता.

हेही वाचा – IND vs NZ 3rd T20: सामन्यापूर्वी न्यूझीलंडला मोठा धक्का; कर्णधार विल्यमसन बाहेर, ‘हा’ खेळाडू करणार नेतृत्व

या दोन्ही फलंदाजांनी २०१४ साली मोमेंटम वनडे कपमध्ये डॉल्फिनकडून खेळताना नाइट्सविरुद्ध हा विक्रम केला होता. याशिवाय, भारतीय जोडी ही जगातील पहिली जोडी आहे, ज्याने सर्व लिस्ट ए क्रिकेटमध्ये ४०० पेक्षा जास्त धावांची भागीदारी केली आहे. या बाबतीत त्यांनी ख्रिस गेल आणि मार्लन सॅम्युअल्स यांच्यातील ३७२ धावांच्या भागीदारीचा विक्रमही मोडला. गेल आणि सॅम्युअल्सने २०१५ मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध हा विक्रम केला होता.

जगदीसनने केली विराट कोहलीची बरोबरी –

विजय हजारे ट्रॉफीच्या एका मोसमात सर्वाधिक शतके ठोकणारा नारायण जगदीसन हा पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे. त्याने या वर्षात आतापर्यंत ५ शतके झळकावली आहेत. यापूर्वी विजय हजारे ट्रॉफीच्या एका मोसमात विराट कोहली, पृथ्वी शॉ, ऋतुराज गायकवाड आणि देवदत्त पडिक्कल यांनी ४-४ शतके झळकावली होती.