तामिळनाडूने विजय हजारे ट्रॉफीमध्ये विक्रमांची रांग लावली आहे. बेंगळुरू येथे सोमवारी झालेल्या अरुणाचल प्रदेश विरुद्धच्या सामन्यात तामिळनाडूने ५० षटकात २ बाद ५०६ धावा केल्या. ‘लिस्ट-ए’ क्रिकेटमधील ही सर्वोच्च धावसंख्या आहे. तामिळनाडूकडून नारायण जगदीशनने जबरदस्त फलंदाजी केली. त्याने २७७ धावांची खेळी खेळली. यामध्ये त्याने २५ चौकार आणि १५ षटकार लगावले.

तामिळनाडूची ‘लिस्ट-ए’ क्रिकेटमधील ही सर्वोच्च धावसंख्या आहे. यापूर्वी हा विक्रम इंग्लंडच्या नावावर होता. नेदरलँड्सविरुद्धच्या वनडेत इंग्लंडने ४९८ धावा केल्या होत्या. मात्र, तामिळनाडूने इंग्लंडला मागे टाकले. तामिळनाडूचा फलंदाज जगदीसनने देखील अनेक विक्रमांची रांग लावली आहे. त्याने लिस्ट-ए क्रिकेटमध्ये सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या नोंदवली. या बाबतीत जगदीशनने सरेच्या अॅलेक्स ब्राउनला मागे सोडले आहे. ब्राऊनने २००२ मध्ये ओव्हलवर ग्लॅमॉर्गनविरुद्ध २६८ धावा केल्या होत्या.

Delhi Capitals vs Gujarat Titans Match Highlights in Marathi
GT vs DC : दिल्लीचा IPL मधील सर्वात मोठा विजय, घरच्या मैदानावर गुजरातचा ६ विकेट्सनी उडवला धुव्वा
IPL 2024 Mumbai Indians vs Chennai Super Kings Match Updates in Marathi
MI vs CSK: आयपीएल २०२४ मध्ये ऋतु’राज’, मुंबईविरूद्ध विस्फोटक फलंदाजीसह ‘हा’ विक्रम करणारा पहिला भारतीय खेळाडू
IPL 2024 RR vs PBKS Match Updates in marathi
PBKS vs RR : युजवेंद्र चहलला इतिहास रचण्याची सुवर्णसंधी! IPL मध्ये ‘ही’ कामगिरी करणारा ठरणार पहिलाच गोलंदाज
Yuzvendra Chahal become third highest wicket taker for Rajasthan Royals
IPL 2024 : युजवेंद्र चहलने मोडला शेन वॉर्नचा विक्रम, राजस्थानसाठी ‘हा’ पराक्रम करणारा ठरला तिसरा गोलंदाज

जगदीसन आणि साई सुदर्शन यांनी पहिल्या विकेटसाठी ३८.३ षटकांत ४१६ धावांची भागीदारी केली. लिस्ट-ए क्रिकेटच्या इतिहासातील ही सर्वात मोठी भागीदारी आहे. १०२ चेंडूत १५४ धावा करून सुदर्सन बाद झाला. आपल्या खेळीत त्याने १९ चौकार आणि २ षटकार मारले. जगदीसनचे हे सलग पाचवे शतक ठरले. लिस्ट-ए क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच खेळाडू आहे. त्याने या बाबतीत श्रीलंकेच्या कुमार संगकाराला मागे टाकले.

संगकाराने वनडेमध्ये सलग चार शतके झळकावली होती. याशिवाय सलग पाच शतके झळकावून जगदीसनने पृथ्वी शॉ, ऋतुराज गायकवाड आणि देवदत्त पडिक्कल या खेळाडूंना मागे टाकले आहे. या सर्वांनी सलग चार शतके झळकावली आहेत.त्याचबरोबर विराट कोहलीच्या विक्रमाची बरोबरी केली. लिस्ट-ए क्रिकेटमध्ये एकदिवसीय आणि विविध देशांतर्गत स्पर्धांचा समावेश होतो.

हेही वाचा – Vijay Hazare Trophy 2022: जगदीसन आणि सुदर्सनने रचला इतिहास; ‘ही’ कामगिरी करणारी ठरली जगातील पहिली जोडी

लिस्ट ए क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्या –

नारायण जगदीसन – २७७(१४१)
अॅलिस्टर ब्राउन – २६८(१६०)
रोहित शर्मा – २६४ (१७३)
डार्सी शॉर्ट – २५७(१४०)
शिखर धवन – २४८(१५०)

विजय हजारे ट्रॉफीच्या एका मोसमात सर्वाधिक शतके –

नारायण जगदीसन – ५* (२०२२)
विराट कोहली – ४ (२००८–०९)
पृथ्वी शॉ – ४ (२०२०-२१)
ऋतुराज गायकवाड – ४ (२०२१-२२)
देवदत्त पडिक्कल – ४ (२०२०-२१)