Mumbai vs Uttarakhand, Delhi vs Gujarat Vijay Hazare Trophy 2025-26 2nd Round Today Match Live Cricket Score Updates: विजय हजारे ट्रॉफी २०२५-२६ च्या दुसऱ्या फेरीचे सामने आज २६ डिसेंबरला खेळवले जात आहे. अनुभवी भारतीय क्रिकेटपटू रोहित शर्मा आणि विराट कोहली पुन्हा एकदा मुंबई आणि दिल्लीसाठी मैदानावर उतरणार आहेत. अनेक वर्षांनंतर लिस्ट ए क्रिकेटमध्ये आपापल्या संघांचे प्रतिनिधित्व करणारे रोहित आणि विराट यांनी देशांतर्गत क्रिकेटमध्ये धमाकेदार पुनरागमन केलं आणि मंगळवारी स्पर्धेच्या पहिल्या फेरीत प्रत्येकी एक शतक ठोकलं.

हरियाणाचा ५१ धावांनी विजय

मुंबई आणि उत्तराखंड यांच्यात झालेल्या सामन्यात मुंबईने उत्तराखंड संघासमोर विजयासाठी ३३२ धावांचे आव्हान ठेवले होते. हे या आव्हानाचा पाठलाग करताना उत्तराखंडला २८० धावा करता आल्या.

हरियाणाचा ६ गडी राखून विजय

हरियाणा आणि सौराष्ट्र यांच्यात झालेल्या सामन्यात सौराष्ट्रने हरियाणासमोर विजयासाठी २५४ धावांचे आव्हान ठेवले होते. हे आव्हान हरियाणाने ३९ व्या षटकात पूर्ण करून ६ गडी राखून विजय मिळवला.

रिंकू सिंगचं महत्त्वपूर्ण शतक

रिंकू सिंहची बॅट तळपली! फक्त इतक्या चेंडूत झळकावलं शतक; विजय हजारे ट्रॉफीत चौकार-षटकारांचा पाडला पाऊस

मुंबईची धावसंख्या ३०० पार

रोहित शर्मा लवकर बाद झाल्यानंतर संपूर्ण संघाने जबाबदारी घेत चांगली धावसंख्या उभारली. मुशीर व सर्फराझ खान या भावांनी प्रत्येकी ५५ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. तर सिद्धेश लाड २१ धावा व शार्दुल ठाकूर २९ धावा करत बाद झाले. याशिवाय शम्स मुलानीने ३ चेंडूत ४८ धावांची खेळी केली. तर हार्दिक तामोरे ९३ धावा करत नाबाद परतला. हार्दिक तामोरेने ८२ चेंडूत ७ चौकार व २ षटकारांसह ९३ धावांची खेळी केली. यासह संघाने ५० षटकांत ७ बाद ३३१ धावा केल्या.

दिल्लीने गुजरातला विजयासाठी किती धावांचं लक्ष्य दिलं?

दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत ९ बाद २४ धावा केल्या आहेत. विराट कोहलीने ६१ चेंडूत १३ चौकार व एका षटकारासह ७७ धावांची खेळी केली. तर कर्णधार ऋषभ पंतने ७९ चेंडूत ८ चौकार व २ षटकारांसह ७० धावांची खेळी केली. तर हर्ष त्यागीने ४० धावांंचं योगदान दिलं.

सर्फराझ-मुशीरने सावरला मुंबईचा डाव

सर्फराझ खान व मुशीर खान या दोन्ही सख्ख्या भावांनी मुंबई संघाचा उत्तराखंडविरूद्ध सामन्यात डाव सावरला. रोहित शर्मा गोल्डन डकवर बाद झाला तर अंगक्रिश रघुवंशी ११ धावांवर बाद झाला, यानंतर मुशीर खान व सर्फराझ खान दोघांनी अर्धशतकी खेळी करत मुंबईला १५० पार नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. सर्फराझ व मुशीर दोघांनीही १०७ धावांची भागीदारी रचली. मुशीर खान ५६ चेंडूत ७ चौकारांसह अर्धशतक करत बाद झाला. तर सर्फराझ खान ४९ चेंडूत ५ चौकार व एका षटकारासह ५५ धावा करत बाद झाला.

विराट कोहली झेलबाद

विराट कोहलीने आपला वादळी फॉर्म कायम ठेवत गुजरातविरूद्ध शानदार खेळी केली. विराट ६१ चेंडूत १३ चौकार आणि एका षटकारासह ७७ धावा करत झेलबाद झाला. यासह विराटचं अजून एक शतक हुकलं. विराटने गेल्या सलग ६ सामन्यांमध्ये अर्धशतकी खेळी केल्या आहेत.

विराट कोहलीचं वादळी अर्धशतक

विराट कोहलीने गुजरातविरूद्ध विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेतील दुसऱ्या सामन्यातही आपला वादळी फॉर्म कायम ठेवला आहे. विराटने २९ चेंडूत ११ चौकार आणि एका षटकारासह ५३ धावा करत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. यासह दिल्लीचा संघ आता १ विकेट गमावत ६२ धावांवर खेळत आहे.

विराट कोहली फलंदाजीला उतरला

गुजरातविरूद्ध प्रथम फलंदाजीला उतरलेल्या दिल्लीनेही पहिली विकेट लवकर गमावली आणि त्यामुळे विराट कोहली फलंदाजीला उतरला आहे. विराटने मैदानावर उतरताच चौकार-षटकारांची आतिषबाजी सुरू केली आहे.

रोहित शर्मा गोल्डन डकवर आऊट

पहिल्याच सामन्यात दीडशतकी खेळी केलेला रोहित शर्मा दुसऱ्या फेरीत मात्र लवकर बाद होत माघारी परतला. रोहित शर्मा पहिल्याच चेंडूवर पिक अप पूल शॉट खेळण्याच्या प्रयत्नात झेलबाद झाला आणि मुंबईने पहिल्याच चेंडूवर विकेट गमावली. रोहित शर्माची फलंदाजी पाहण्यासाठी चाहते पहाटेपासून जयपूरच्या स्टेडियममध्ये पोहोचले होते. रोहित बाद झाल्यानंतर हळूहळू चाहते माघारी परतत आहेत.

दिल्ली प्लेईंग इलेव्हन

प्रियांश आर्य, अर्पित राणा, विराट कोहली, नितीश राणा, ऋषभ पंत (विकेटकिपर/कर्णधार), आयुष बडोनी, हर्ष त्यागी, सिमरजीत सिंग, प्रिन्स यादव, नवदीप सैनी, इशांत शर्मा

गुजरात प्लेइंग इलेव्हन

आर्या देसाई, उर्विल पटेल (विकेटकिपर), अभिषेक देसाई, जयमीत पटेल, चिंतन गजा (कर्णधार), सौरव चौहान, हेमांग पटेल, विशाल जयस्वाल, रवी बिश्नोई, अरझान नागवासवाला, अमित देसाई

गुजरात आणि दिल्ली नाणेफेक

गुजरात आणि दिल्ली यांच्यातील सामन्याची नाणेफेक गुजरातने जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे रोहितसह विराट कोहलीदेखील फलंदाजी करताना दिसणार आहे.

मुंबई संघाची उत्तराखंडविरूद्ध सामन्यासाठी प्लेईंग इलेव्हन

अंगक्रिश रघुवंशी, रोहित शर्मा, मुशीर खान, सर्फराझ खान, सिद्धेश लाड, हार्दिक तामोरे (विकेटकिपर), शम्स मुलाणी, तनुष कोटियन, शार्दुल ठाकूर (कर्णधार), ओंकार तुकाराम तरमळे, तुषार देशपांडे

मुंबई आणि उत्तराखंड नाणेफेक

दिल्ली आणि उत्तराखंड यांच्यातील सामन्याची नाणेफेक उत्तराखंड संघाने जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. यासह रोहित शर्मा सामन्यात प्रथम फलंदाजी करताना दिसणार आहे.

विजय हजारे ट्रॉफी दुसऱ्या फेरीला सुरूवात

विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेची दुसरी फेरी आज २६ डिसेंबरला असणार आहे. यामध्ये मुंबईचा संघ उत्तराखंडविरूद्ध खेळताना दिसेल. तर दिल्लीचा संघ गुजरातविरूद्ध भिडताना दिसणार आहे.

विजय हजारे ट्रॉफी दुसरी फेरीचं वेळापत्रक
अ गट

मध्य प्रदेश विरुद्ध तामिळनाडू – सकाळी ९:००, अहमदाबाद
झारखंड विरुद्ध राजस्थान – सकाळी ९.००, अहमदाबाद
पुद्दुचेरी वि त्रिपुरा – सकाळी ९:००, अहमदाबाद
कर्नाटक वि केरळ – सकाळी ९.००, अहमदाबाद

ब गट

चंदीगड विरुद्ध उत्तर प्रदेश – सकाळी ९:००, राजकोट
आसाम विरुद्ध जम्मू आणि काश्मीर – सकाळी ९:००, राजकोट
बडोदा विरुद्ध बंगाल – सकाळी ९:००, राजकोट
हैदराबाद विरुद्ध विदर्भ – सकाळी ९:००, राजकोट

क गट

गोवा विरुद्ध हिमाचल प्रदेश – सकाळी ९.००, जयपूर
मुंबई विरुद्ध उत्तराखंड – सकाळी ९.००, जयपूर
छत्तीसगड विरुद्ध पंजाब – सकाळी ९.००, जयपूर
महाराष्ट्र विरुद्ध सिक्कीम – सकाळी ९.००, जयपूर

ड गट

हरियाणा विरुद्ध सौराष्ट्र – सकाळी ९:००, अलूर
आंध्र विरुद्ध रेल्वे – सकाळी ९:००, अलूर
ओडिशा विरुद्ध सर्व्हिसेस – सकाळी ९:००, अलूर
दिल्ली विरुद्ध गुजरात – सकाळी ९:००, बेंगळुरू

प्लेट ग्रुप
बिहार विरुद्ध मणिपूर – सकाळी ९:००, रांची
अरुणाचल प्रदेश विरुद्ध मिझोरम – सकाळी ९:००, रांची
मेघालय विरुद्ध नागालँड – सकाळी ९:००, रांची