भारताच्या विकास गौडा याने आंतरराष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाने आयोजित केलेल्या डायमंड लीग अ‍ॅथलेटिक्स मालिकेतील थाळीफेकीत एकंदर चौथे स्थान मिळविले. त्याने तीन हजार डॉलर्स (एक लाख ८० हजार रुपये)चे पारितोषिक कमाविले. मूळचा भारतीय असलेला, परंतु सध्या अमेरिकेत सराव करणाऱ्या विकासने ग्लासगो येथे नुकत्याच झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत सोनेरी कामगिरी केली होती. त्याने डायमंड लीग मालिकांपैकी दोहा येथील स्पर्धेत दुसरे स्थान (६३.२३ मीटर) मिळविले. त्याने बर्मिगहॅम येथील स्पर्धेत पाचवा क्रमांक (६२.७८ मीटर) मिळविला.
जागतिक स्पर्धेत रौप्यपदक मिळविणाऱ्या पिओत्र मालाचोवस्की (पोलंड) याने डायमंड लीगमध्ये विजेतेपद मिळविले.