आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक मिळवीन -विक्रमकुमार

दक्षिण कोरियात १८ ते २४ ऑक्टोबर दरम्यान होणाऱ्या आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक मिळवीन, असा आत्मविश्वास भारताचा पॅरा खेळाडू विक्रमकुमार याने येथे व्यक्त केला.

दक्षिण कोरियात १८ ते २४ ऑक्टोबर दरम्यान होणाऱ्या आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक मिळवीन, असा आत्मविश्वास भारताचा पॅरा खेळाडू विक्रमकुमार याने येथे व्यक्त केला. विक्रमकुमार याने नुकत्याच झालेल्या पॅरा बॅडमिंटन स्पर्धेत दोन कांस्यपदके मिळविली. तो बिहारमधील पुपरी या छोटय़ा शहरात राहतो. त्याने लॉफबोरोघ (इंग्लंड) येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील पुरुष एकेरी व दुहेरीत कांस्यपदक पटकाविले.
हैदराबाद येथे आगामी आशियाई स्पर्धेसाठी निवड चाचणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. तेथील चाचणीद्वारे विक्रमची आशियाई स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तो म्हणाला,की या स्पर्धेप्रमाणेच अन्य आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्येही पदके मिळविण्याचे माझे ध्येय आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पदक मिळविणाऱ्या खेळाडूमुळे देशाचा नावलौकिक उंचावत असतो आणि माझेही प्रयत्न त्याच दिशेने सुरू आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Vikram kumar eyeing gold at asian para games

ताज्या बातम्या