Vinesh Phogat : भारताची महिला कुस्तीपटू विनेश फोगटने ( Vinesh Phogat ) कुस्तीतून निवृत्ती जाहीर केली आहे. मी आज कुस्ती आईशी हरले, आता माझ्यामध्ये परिस्थितीचा सामना कऱण्याचं बळ नाही या आशयाची पोस्ट लिहून विनेशने ( Vinesh Phogat ) निवृत्ती जाहीर केली आहे. यानंतर तिची मैत्रीण आणि भारताची महिला मल्ल साक्षी मलिकने तिच्यासाठी पोस्ट केली आहे आणि तिला सगळा देश तुझ्या बरोबर आहे विनेश असं म्हटलं आहे.

विनेश फोगटची पोस्ट काय?

“माँ कुश्ती मेरे से जीत गई मैं हार गई माफ़ करना आपका सपना मेरी हिम्मत सब टूट चुके इससे ज़्यादा ताक़त नहीं रही अब। अलविदा कुश्ती २००१-२०२४ आप सबकी हमेशा ऋणी रहूँगी माफी” आई कुस्ती आज तू जिंकलीस आणि मी हरले. मला माफ कर आई, तुझं स्वप्न पूर्ण करण्याची हिंमत आता माझ्यात नाही. माझ्यात आता तितकं बळच उरलं नाही. अलविदा कुस्ती २००१-२०२४ मी तुझी कायमच ऋणी राहिन मला माफ कर. असं म्हणत कुस्तीला आई समान मानत विनेश फोगटने ( Vinesh Phogat ) कुस्तीतून संन्यास घेतला आहे.

vijender singh on vinesh phogat disqualified
Vinesh Phogat Disqualification: “सरळ बॅगा उचला आणि…”, विनेश फोगटच्या अपात्रतेवर विजेंदर सिंग संतापला; म्हणाला, “१०० ग्रॅमसाठी…”
Ramdas Kadam On Uddhav Thackeray
Ramdas Kadam : “उद्धव ठाकरेंना म्हटलं होतं दोन तासांत आमदार परत आणतो; पण…”, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान
antim panghal sent back to india
Paris Olympic 2024: ऑलिम्पिक व्हिलेजमध्ये बहिणीची ‘तस्करी’ करणाऱ्या अंतिम पांघालची भारतात रवानगी
Vinesh Phogat News
Vinesh Phogat : विनेश फोगटचा कुस्तीला अलविदा! पोस्ट करत म्हणाली, “मी हरले आणि…”
Vinesh Phogat Disqualified From Paris Olympics Gold Medal Match in Olympic Games 2024
Vinesh Phogat : “विनेशविरोधात ब्रिजभूषण सिंह यांचा सर्वात मोठा कट, त्यामुळेच…”; सासऱ्यांचा गंभीर आरोप
Vinesh Phogat Uncle
Vinesh Phogat Retirement : “…म्हणून विनेशने निवृत्तीची घोषणा केली”, काका महावीर फोगट यांची प्रतिक्रिया; म्हणाले, “यंदाचं सुवर्णपदक…”
mirabai chanu paris olympic
Mirabai Chanu in Paris Olympic: एक किलोच्या फरकानं मीराबाई चानूनं पदक गमावलं; आणखी एक स्वप्न भंगलं!
Vinesh Phogat Disqualified From Paris Olympics Gold Medal Match in Olympic Games 2024
Vinesh Phogat Disqualified: विनेश फोगट पॅरिस ऑलिम्पिकमधून अपात्र, भारताला सर्वात मोठा धक्का

हे पण वाचा- Vinesh Phogat: विनेश फोगटची ऑलिम्पिकमधून अपात्र ठरवल्यानंतर क्रीडा कोर्टात धाव, रौप्यपदक मिळावं अशी केली विनंती

ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीत जाऊनही वजनामुळे अपात्र ठरली विनेश

ऑलिम्पिकच्या स्पर्धेत विनेश फोगटनं ( Vinesh Phogat ) तिच्या प्रतिस्पर्ध्याविरुद्ध उपांत्य फेरीचा सामना ५-० च्या फरकानं जिंकला. प्रतिस्पर्ध्यासाठी तिनं साधा एक गुणही सोडला नव्हता. त्यावेळी विनेशची (Vinesh Phogat) देहबोली प्रत्येक भारतीयाला जणू सांगत होती की, तयारी करा मी सुवर्ण पदक आणते आहे. त्यामुळे विनेश गोल्ड आणणारच ही खात्री जवळपास प्रत्येक भारतीयाला वाटलीच. ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरणारी विनेश पहिली भारतीय महिला कुस्तीपटू ठरली. पण, १५० ग्रॅम वजन पात्र ठरलं आणि विनेशला सुवर्ण पदकाच्या सामन्यासाठी अपात्र ठरवण्यात आलं. तिला लढायचं होतं, पण मैदानात येण्यापूर्वीच ती अपात्र ठरली. ज्यानंतर विनेश प्रचंड निराश झाली. आता महिला कुस्तीपटू साक्षी मलिकने तिच्यासाठी पोस्ट लिहिली आहे.

Sakshi Malik Emotional Post For Vinesh Phogat
साक्षी मलिकची विनेश फोगटसाठी भावनिक पोस्ट (फोटो-इंडियन एक्स्प्रेस)

काय आहे साक्षी मलिकची पोस्ट?

विनेश तू एकटी हरली नाहीस भारताची ती प्रत्येक मुलगी हरली आहे ज्यांच्यासाठी तू लढलीस आणि जिंकलीस. तू निवृत्तीचा निर्णय घेणं ही भारताची हार आहे. आज सगळा देश तुझ्या पाठिशी आहे. कुस्तीपटू म्हणून तू केलेल्या संघर्षाला सलाम. या आशयाची पोस्ट साक्षी मलिकने विनेशसाठी केली आहे.

साक्षी मलिकने जेव्हा विनेश अपात्र ठरली तेव्हाही खूप दुःख व्यक्त केलं होतं. तेव्हाही तिने विनेशसाठी भावनिक पोस्ट लिहिली होती. एका कुस्तीपटूसाठी वजन कमी करणं हे मेडल मिळण्यासारखंच असतं. तसंच मेडल हिरावलं गेल्याचं दुःख काय असतंं? विनेशला काय वाटत असेल हे मी समजू शकते असंही तिने म्हटलं होतं. एवढंच नाही तर विनेशला रौप्य पदक तरी दिलं जावं अशीही मागणी तिने केली होती. मात्र हे सगळं घडल्याच्या दुसऱ्याच दिवशी विनेशने कुस्तीतून संन्यास जाहीर केला आहे.