Vinesh Phogat Appeal Rejects by CAS IOA Criticises: भारतीय कुस्तीपटू विनेश फोगटने ऑलिम्पिक फायनलपूर्वी अपात्र ठरविण्याविरुद्ध केलेले अपील आंतरराष्ट्रीय क्रीडा लवादने (CAS) फेटाळले आहे. भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनने (IOA) बुधवारी ही माहिती दिली आणि खेळाडूंचे ‘मानसिक आणि शारीरिक ताण’ समजून घेण्यात अपयशी ठरणाऱ्या ‘अमानवीय नियमां’वर टीका केली. २९ वर्षीय विनेशला गेल्या आठवड्यात महिलांच्या ५० किलो वजनी गटातील फ्रीस्टाइल कुस्तीच्या अंतिम सामन्यापूर्वी अतिरिक्त वजनामुळे अपात्र ठरवण्यात आले होते. सर्वच भारतीयांना विनेशला क्रीडा कोर्टाच्या सुनावणीनंतर रौप्य पदक मिळेल, अशी आशा होती. पण क्रीडा कोर्टाने याचिका फेटाळल्यानंतर अनेक प्रतिक्रिया समोर येत आहेत. यावर भारताचा कुस्तीपटू बजरंग पुनिया याच्या पोस्टने लक्ष वेधलं आहे. तर भारतीय ऑलिम्पिक संघटना आणि पीटी उषा यांनीही या निर्णयावर टीका केली आहे.

हेही वाचा – Vinesh Phogat: “तुमचा देश किती…”, विनेश फोगट प्रकरणावरून युनायटेड वर्ल्ड रेसलिंग प्रमुखांनी भारताला दाखवला आरसा? नेमकं काय म्हणाले?

बजरंग पुनियाची पोस्ट
माना पदक छीना गया तुम्हारा इस अंधकार में,
हीरे की तरह चमक रही हो आज पूरे संसार में।

विश्व विजेता हिंदुस्तान की आन बान शान
रूस्तम ए हिंद विनेश फौगाट आप देश के कोहिनूर हैं।
पूरे विश्व में विनेश फौगाट विनेश फौगाट हो रही हैं।

हेही वाचा – Manu Bhaker Neeraj Chopra: मनू भाकेर-नीरज चोप्राची सोयरीक जुळली? मनूच्या वडिलांनी केले मोठे वक्तव्य; म्हणाले, “नीरजला आम्ही…”

या अंधकारात तुझं पदक जरी हिसकावलं असलं तरी हिऱ्याप्रमाणे साऱ्या जगात तू चमकत आहेस. विश्वविजेत्या भारताची आन बान शान असलेली विनेश तू देशाचा कोहिनूर आहेस, संपूर्ण जगात आज तुझ्या नावाचा डंका आहे, असं बजरंग पुनियाने या पोस्टमध्ये म्हटलं आहे. यासोबत बजरंगने विनेशचे काही पोस्ट शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती तिच्या पदकांसह उभी आहे. या पोस्टचा शेवट करताना बजरंग म्हणाला, ज्यांना मेडल हवेत त्यांनी १५-१५ रूपयांमध्ये खरेदी करून न्या. बजरंगच्या या पोस्टने सर्वांचं लक्ष वेधलं आहे.

विनेश फोगटची याचिका फेटाळल्यानंतर भारतीय ऑलिम्पिक संघटनेने केली टीका

कुस्तीपटू विनेश फोगटने युनायटेड वर्ल्ड रेसलिंग आणि आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या विरोधात दाखल केलेल्या अपीलवर क्रीडा लवादाच्या एकमेव निर्णयामुळे मी हैराण आणि निराश असल्याचे भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षा पीटी उषा यांनी सांगितले, त्या म्हणाल्या, “पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत महिलांच्या ५० किलो वजनी गटात संयुक्त रौप्य पदक मिळवून देण्यासाठी विनेशचा अर्ज नाकारण्याच्या १४ ऑगस्ट रोजी आलेल्या निर्णय हा तिच्यासाठी आणि विशेषत: क्रीडा समुदायासाठी महत्त्वपूर्ण आहे.

हेही वाचा – Sreejesh on Vinesh : ‘ती रौप्यपदकासाठी पात्र आहे पण खेळात नियम…’, विनेशबद्दल श्रीजेशचे मोठे वक्तव्य

आंतरराष्ट्रीय कुस्तीमधील अस्पष्ट नियम आणि त्यांच्या व्याख्यांवर आयओएने जोरदार टीका केली आहे. “१०० ग्रॅमची ही किरकोळ विसंगती आणि त्याचा परिणाम केवळ विनेशच्या कारकिर्दीच्या संदर्भातच नाही तर अस्पष्ट नियम आणि त्यांच्या व्याख्याबद्दल गंभीर प्रश्न निर्माण करतो,” असे IOA ने एका निवेदनात म्हटले आहे. दोन दिवसांच्या खेळातील दुसऱ्या दिवशी वजनात इतक्या किरकोळ विसंगतीसाठी खेळाडूला पूर्णपणे अपात्र ठरवण्याच्या प्रकरणाचा सखोल आढावा घेणे आवश्यक आहे, असे आयओएचे मत आहे.

आयओने पुढे म्हटले आहे, “विनेशच्या प्रकरणावरून असे दिसून येते की कठोर आणि अमानवीय नियम खेळाडूंवर, विशेषत: महिला खेळाडूंवरील शारीरिक आणि मानसिक ताण समजून घेण्यात अपयशी ठरतात.”