Vinesh Phogat Case Advocate Vidushpat Singhania: आंतरराष्ट्रीय क्रीडा लवादाने १६ ऑगस्ट ही विनेश फोगट खटल्याच्या निकालाची तारीख निश्चित केली होती. पण क्रीडा लवादाच्या न्यायालयाने १४ ऑगस्टलाच भारतीय कुस्तीपटूची याचिका फेटाळली आहे. अचानक आलेल्या या निर्णयाचा विनेश, भारतीयांसहित तिच्या वकिलांनाही धक्का बसला आहे. आता विनेशला पाठिंबा देण्यासाठी पॅरिसला गेलेले वकील विदुषपत सिंघानिया यांनी या विषयावर आपले वक्तव्य मांडले आहे. विदुषपत यांनी पुढील पाऊल काय उचलणार, याबाबतही माहिती दिली. हेही वाचा - Vinesh Phogat: ‘१५-१५ रूपयांत मेडल खरेदी करा…’ विनेश फोगटची याचिका फेटाळल्यानंतर बजरंग पुनियाची धक्कादायक पोस्ट, पीटी उषानेही सुनावलं विनेश फोगटचे वकील विदुषपत सिंघानिया यांनी एएनआयशी बोलताना सांगितले की, विनेशचा खटला रद्द करण्याबाबत अद्याप कोणतीही माहिती जाहीर करण्यात आलेली नाही. "आत्तापर्यंत, CAS कडून केवळ एक ओळीचे निवेदन जारी करण्यात आले आहे, ज्यामध्ये विनेशचे अपील का फेटाळण्यात आले याचे कारण सांगण्यात आले नाही. या निर्णयाला एवढा वेळ का लागला आणि खटला का निकाली काढण्यात आला, हे अद्याप सांगण्यात आलेले नाही." वकिल विदुषपत पुढे म्हणाले, " १६ ऑगस्टला निकाल जाहीर होईल ही तारीख निश्चित करण्यात आली होती आणि त्याआधी कधीही निर्णय येऊ शकतो हे आम्हाला माहीत होते. या निर्णयाचे आम्हाला आश्चर्य वाटले आणि निराशही झालो आहोत." हेही वाचा - Shakib Al Hasan: “बांगलादेशातील लोकांच्या हत्येला शकीबही जबाबदार…”, पाकिस्तानविरूद्ध मालिकेसाठी निवड होताच शकीब अल हसनवर कठोर शब्दात टीका येत्या १०-१५ दिवसांत या निर्णयाची संपूर्ण माहिती समोर येईल, ज्यामध्ये न्यायाधीशांनी कोणत्या आधारावर हा निर्णय दिला हेही लिहिले जाईल. विनेशला रौप्य पदक मिळेल, अशी आशा लोकांना होती, पण सीएएसने केस फेटाळून लावल्यानंतरही भारतीय कुस्तीपटूच्या पदक मिळविण्याच्या आशा मावळल्या नाहीत. विनेशच्या वकिलाने सांगितले की, विनेशची याचिका का फेटाळण्यात आली याबाबत सर्व तपशील मिळाल्यानंतर ३० दिवसांच्या आत पुन्हा अपील करता येईल." आंतरराष्ट्री क्रीडा लवाद (CAS) खेळांशी संबंधित प्रकरणांमध्ये मध्यस्थी म्हणून कार्य करते. विनेशला इथून न्याय मिळू शकला नसल्यामुळे ती आता CAS च्या निर्णयाला स्वित्झर्लंड येथील 'स्विस फेडरल ट्रिब्युनल' न्यायालयात आव्हान देऊ शकते. विदुषपत सिंघानिया म्हणाले की, "हरीश साळवे हे ज्येष्ठ वकील म्हणून आमच्यासोबत आहेत आणि या निर्णयाला आव्हान देणारे अपील व त्यासंबंधित बाबींवर त्यांच्यासोबत काम केले जाईल."