Vinesh Phogat Disqualification Case UWW President Statement: आंतरराष्ट्रीय क्रीडा लवाद (CAS) आता कुस्तीपटू विनेश फोगट प्रकरणी १३ ऑगस्ट रोजी आपला निकाल देणार आहे. विनेश फोगटला अतिरिक्त वजनामुळे ५० किलो वजनी गटाच्या फ्रीस्टाईल कुस्तीच्या सुवर्णपदक स्पर्धेतून अपात्र ठरवले. याच निर्णयाला विनेशने आव्हान दिले आणि पॅरिस ऑलिम्पिकमध्ये तिने युस्नेलिस गुझमन लोपेझसह संयुक्त रौप्य पदक देण्यासाठी CAS कडे याचिका दाखल केली आहे. CAS मध्ये अपील केल्यानंतर विनेशला रौप्यपदक मिळण्याच्या आशा निर्माण झाल्या आहेत पण निर्णयाची प्रतीक्षा वाढली आहे. याचदरम्यान एनडीटीव्हीशी बोलताना युनायटेड वर्ल्ड रेसलिंगचे प्रमुख नेनाद लालोविच यांच्या विनेश फोगट प्रकरणावर वक्तव्य दिले आहे.

पॅरिस ऑलिम्पिकमधील या धक्कादायक घटनेनंतर विनेशने CAS मध्ये याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला, पण UWW प्रमुखांच्या मते कॅसच्या निकालातही फारसा बदल नसेल, कारण कुस्ती मंडळ केवळ घालून दिलेल्या नियमांचे पालन करत होते.

Piyush Goyal
Piyush Goyal : ‘…म्हणून मला माझ्याच घरात पाच वर्ष प्रवेश करता आला नव्हता’, मंत्री पीयूष गोयल यांनी सांगितला घर विकत घेतानाचा अनुभव
4th October Rashi Bhavishya in marathi
४ ऑक्टोबर पंचांग: मेष, वृषभसह ‘या’ राशींवर देवी…
EY Ex Employee Exposed
EY Exposed : “४०० इमेल्स पाठवले, पण तरीही प्रमाणपत्र दिले नाहीत”, EY च्या माजी कर्मचाऱ्याचा खुलासा; म्हणाले…
Fake blood donation by bjp leader
भाजपा नेत्याची चमकोगिरी; मोदींच्या वाढदिवसानिमित्त केलं बोगस रक्तदान, व्हिडीओ व्हायरल होताच म्हणाले…
Joe Biden maintains Donald Trumps India-policy and takes it to the heights
बायडेन यांनी ट्रम्प यांचे भारत-धोरण राखले आणि उंचीवर नेले…
young CA girl at Ernst & Young reportedly died from work stress
पुणे : सीए तरुणीच्या मृत्यूवर ईवाय इंडियाचे अध्यक्ष राजीव मेमानी मौन सोडून म्हणाले की,…
A case has also been filed by ED in the Religare case mumbai news
मुंबई: रेलिगेअर प्रकरणी ईडीकडूनही गुन्हा दाखल
PM Narendra Modi
PM Narendra Modi VIDEO : पंतप्रधानांच्या निवासस्थानी नव्या सदस्याचे आगमन; मोदींनी केलं नामकरण; म्हणाले, “आपल्या शास्त्रात…”

हेही वाचा – “ऑफर चांगली आहे पण…”ऑलिम्पिक पदक विजेता सरबज्योत सिंगने का नाकारली सरकारी नोकरीची ऑफर, पाहा काय म्हणाला?

विनेश फोगटला रौप्यपदक मिळणार की नाही? UWW प्रमुखांचं मोठं वक्तव्य

युनाइटेड वर्ल्ड रेसलिंगचे प्रमुख नेनाद लालोविक (UWW president Nenad Lalovic on Vinesh Phogat) यांनी एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, “जे काही घडलं त्याबद्दल वाईट वाटतंय, पण तुम्ही कोणत्या देशाचे आहात, तुमचा देश किती मोठा आहे याचा काही संबंध नाही, खेळाडू हे खेळाडू असतात. वजनाची चाचणी सर्वांसमोर केली जाते आणि तिथे काय घडलं हे सर्वांनीच पाहिलं आहे. एखाद्या खेळाडूचं वजन जास्त असेल हे दिसत असतानाही त्याला स्पर्धेत सहभागी होण्याची परवानगी कशी देणार. नियमांचे पालन करण्यापलीकडे आमच्याकडे काही पर्याय नव्हता.”

लालोविक पुढे म्हणाले, “आम्ही खेळाडूंचा विचार करतच हा नियम आणला आहे. स्पर्धेसाठी खेळाडूंना वजनाच्या नियमांचे बंधन घालण्यात आले आहे. पुढे कदाचित नियमांमध्ये काही फेरबदल करता येतील, पण आम्ही नियम बदलत नाही आहोत. आमच्या वैद्यकीय आयोगाद्वारे आम्हाला सल्ला दिला जातो. ते कोणत्याही बदलाच्या पूर्णपणे विरोधात आहेत.”

हेही वाचा – Neeraj Chopra House : बाईक आणि कारचं भन्नाट कलेक्शन, घरावर तिरंगा अन् गणपतीचं मंदिर… नीरजच्या अलिशान घराचा VIDEO व्हायरल

५० किलो महिलांच्या फ्रीस्टाइल कुस्तीमध्ये सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदकाचे सामने झाले असून पदके वितरित देखील करण्यात आली, तर विनेशने दुसऱ्या दिवशी वजन चाचणी करण्यापूर्वीच अंतिम फेरी गाठल्यामुळे तिला संयुक्त-रौप्यपदक मिळावे असे आवाहन केले आहे. दुसरे रौप्य पदक देण्याची तरतूद नसली तरी विनेशने आशा सोडलेली नाही.

विनेश फोगट प्रकरणाचा निकाल कधी?

सीएएस ही एक स्वतंत्र संस्था आहे, जी खेळांशी संबंधित वाद मिटवते. विनेशच्या प्रकरणाचा निर्णय सीएएस देणार आहे. CAS युक्तिवाद ऐकल्यानंतर अंतिम निर्णय घेईल. सीएएस आपला निर्णय स्वतंत्रपणे घेते, आता निर्णय यायला वेळ लागत असल्याने सीएएस विनेशच्या प्रकरणाबाबत अतिशय गंभीर असून प्रत्येक युक्तिवादाकडे लक्ष देत असल्याची शक्यता आहे. विनेशच्या प्रकरणाबाबतचा निर्णय क्रीडा लवादाने दोन वेळा पुढे ढकलला आहे. आता या प्रकरणाचा निर्णय १३ ऑगस्टला होणार आहे. विनेशबाबत काय निर्णय घेतला जातो, यावर सर्वांच्य नजरा आहेत.