Vinesh Phogat Case Update: पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मधील विनेश फोगटच्या प्रकरणाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. विनेश फोगटला अतिरिक्त वजनामुळे पॅरिस ऑलिम्पिकच्या ५० किलो वजनी गटातील अंतिम सामन्यात खेळण्यापूर्वीच अपात्र ठरवले होते. याप्रकरणी तिने आंतरराष्ट्रीय क्रीडा लवादामध्ये धाव घेत तिला संयुक्त रौप्यपदक मिळावं अशी मागणी केली. याबाबत समोर आलेल्या नव्या अपडेटनुसार विनेश फोगटच्या पदकाबाबत आजही निर्णय घेतला जाणार नाही. आंतरराष्ट्रीय क्रीडा कोर्टाने यासंदर्भात एक निवेदन जारी केले आहे. या निवेदनांतर्गत विनेश फोगट प्रकरणावर कधी निर्णय होणार याची माहिती देण्यात आली आहे.

हेही वाचा – Paris Olympic 2024 Live, Day 14: मनू भाकेर आणि पीआर श्रीजेश ऑलिम्पिक समारोप समारंभात भारताचे ध्वजवाहक

Akola connection in murder case of Baba Siddiqui leader of NCP Ajit Pawar group
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणाचे अकोला ‘कनेक्शन’? जबाबदारी स्वीकारणाऱ्या पोस्टमुळे…
ankita walawalkar aka kokan hearted girl first told to raj thackeray about her marriage
“लग्नाची बातमी सर्वात आधी राज ठाकरेंना…”, प्रेमाची जाहीर…
Despite no obstruction to Sadhu Vaswani Bridge construction Municipal Corporation cut down trees
झाडे तोडण्याबाबत पुन्हा चूक झाल्यास दंडात्मक कारवाई, ‘राष्ट्रीय हरित न्यायाधीकरणा’ने महापालिकेस फटकारले
Jitendra Awhad Shivneri Bus
Jitendra Awhad : “भरत गोगावलेंचे पाय धरून नमस्कार केला पाहिजे”, ‘शिवनेरी सुंदरी’च्या निर्णयावरून जितेंद्र आव्हाडांची टीका
Devendra Fadnavis on nitin gadkari
“अनुदानाची शाश्वती नाही, लाडकी बहीणसाठी पैसे द्यावे लागतात”, नितीन गडकरींच्या विधानावर फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले…
PM Narendra Modi US visit, Narendra Modi US,
अमेरिकेने भारताला ‘गिऱ्हाईक’ समजू नये…
rashtriya swayamsevak sangh, ideology
‘राष्ट्र निर्माण’ हे संघाचे ध्येय आहे… पण कसे राष्ट्र?
UPSC Preparation International Association
upsc ची तयारी: आंतरराष्ट्रीय संघटना

भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगट कुस्तीच्या ५० किलो वजनी गटाच्या अंतिम सामन्यासाठी पात्र ठरली होती, परंतु अंतिम सामन्यापूर्वीच तिचे वजन १०० ग्रॅम जास्त असल्याचे आढळून आले, त्यानंतर तिला स्पर्धेसाठी अपात्र घोषित करण्यात आले. या निर्णयाविरोधात विनेश फोगटने याचिका दाखल केली आहे. आंतरराष्ट्रीय क्रीडा कोर्टात विनेशचे अपील स्वीकारण्यात आले. तेव्हापासून भारतीय कुस्तीपटूच्या ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक मिळवण्याच्या आशा वाढल्या आहेत.

हेही वाचा – Neeraj Chopra: भालाफेकीच्या अंतिम फेरीत नीरज चोप्राकडून वारंवार फाऊल थ्रो का होत होता? स्पर्धेनंतर स्वत: सांगितले कारण

Vinesh Phogatच्या याचिकेबाबत कधी होणार सुनावणी? क्रीडा कोर्टाने दिलं उत्तर

CAS ने शुक्रवारी एक निवेदन जारी केले. निवेदनात म्हटले आहे की ‘भारतीय कुस्तीपटू विनेश फोगटने सीईएसटीवरील सीएएस आणि हॉक विभागात अर्ज दाखल केला होता. या अर्जात तिने ऑलिम्पिक स्पर्धेतील महिलांच्या फ्रीस्टाइल ५० किलो वजनी गटाच्या अंतिम सामन्यापूर्वी तिच्याविरुद्ध घेतलेल्या निर्णयावर सुनावणी घेण्याची मागणी केली होती. वजन कमी करण्यात अयशस्वी झाल्यामुळे विनेश फोगटला युनायटेड वर्ल्ड रेसलिंग (UWW) चॅम्पियनशिपकडून अपात्र घोषित करण्यात आले.

विनेश फोगटने या निर्णयाला आव्हान देत हा निर्णय रद्द करावा आणि अंतिम सामन्यापूर्वी तिचे वजन पुन्हा मोजावे, जेणेकरून ती अंतिम सामन्यासाठी आपली पात्रता सिद्ध करू शकेल, अशी मागणी केली होती. सीएएस आणि हॉक विभागाची प्रक्रिया वेगवान आहे, परंतु तासाभरात या याचिकेवर निर्णय देणे शक्य नव्हते. या प्रकरणी UWW चेही म्हणणे ऐकावे लागणार आहे. या प्रकरणाची प्रक्रिया सुरू आहे. अर्जदाराच्या वतीने संयुक्त (रौप्य) पदक प्रदान करण्याची विनंती करण्यात आली आहे.

हेही वाचा – Neeraj Chopra Won Silver: नीरज चोप्राची रौप्यपदकाला गवसणी, ऐतिहासिक थ्रो करत पॅरिसमध्ये भारताला मिळवून दिलं पाचवं पदक

सीएएसच्या या निवेदनात असे म्हटले आहे की, विनेश आणि यूडब्ल्यूडब्ल्यू या दोघांच्या सुनावणीसाठी नियुक्ती करण्यात आली आहे. पॅरिस ऑलिम्पिक संपण्यापूर्वी याबाबत निर्णय दिला जाणार आहे. निवेदनात म्हटले आहे की हे प्रकरण डॉ ॲनाबेले बेनेट एसी एससी (AUS) यांच्याकडे पाठवण्यात आले आहे. या दोन्ही पक्षांचं म्हणणं ऐकून ऑलिम्पिक स्पर्धा संपण्यापूर्वी निर्णय घेतला जाणार आहे.

अंतिम सामन्यापूर्वी विनेशचे वजन केवळ १०० ग्रॅमने जास्त असल्याचे आढळल्याने तिला स्पर्धेतून अपात्र ठरवण्यात आले. त्यामुळे विनेश फोगटची सुवर्ण, रौप्य किंवा कांस्यपदक जिंकण्याची संधी गेली. कारण, अपात्र ठरलेले खेळाडू सहसा पदकांसाठीही अपात्र मानले जातात.