Paris Olympic 2024 Yusneylis Guzman Lopez vs USA’s Sarah Hildebrandt : पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये सुवर्णपदकाचा अंतिम सामन्यात पोहोचलेली विनेश फोगट हिला अपात्र ठरवण्यात आले आहे. चार वेळा विश्वविजेती आणि ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या कुस्तीपटूचा पहिल्याच सामन्यात विनेशने पराभव केला. विनेशचा सामना करण्यापूर्वी जपानची युई सुसाकी सलग ८२ सामने जिंकली होती, पण तिने हा विजय रथ रोखला. त्यानंतर उपांत्यपूर्व फेरीतील रोमांचक क्षणांतही संयम न गमावता उपांत्य फेरीत धडक मारली. विनेशने या उपांत्य फेरीत अप्रतिम खेळ केला आणि क्युबाच्या कुस्तीपटूला कोणतीही संधी दिली नाही आणि विजय मिळवत अंतिम फेरीत धडक मारली. आता विनेश अपात्र ठरल्याने तिला कोणतंच पदक दिलं जाणार नाही.

विनेशकडून पराभूत झालेली खेळाडू खेळणार सुवर्णपदकाचा सामना

७ ऑगस्टला भारताला सुवर्ण किंवा रौप्य पदक मिळणार हे निश्चित होतं, पण तितक्यातच सकाळी विनेश फोगटबाबत एक मोठी बातमी येऊन धडकली. अतिरिक्त वजनामुळे विनेश फोगटला पॅरिस ऑलिम्पिकमधून अपात्र घोषित केले. तिचे वजन केवळ १०० ग्रॅमने जास्त असल्याने तिला अपात्र ठरवण्यात आले आहे. कुस्तीच्या नियमानुसार अपात्र ठरल्यानंतर विनेश फोगटला कोणतेही पदक मिळणार नाही.

आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेनुसार, विनेश फोगटचा उपांत्य फेरीत क्युबाच्या खेळाडूचा पराभव केला होता, आता तिलाच अंतिम फेरीत खेळण्याची संधी मिळणार आहे. विनेशने क्युबाच्या युस्नेलिस गुझमनचा पराभव केला होता. आता तिचा अंतिम फेरीत लढत अमेरिकेची कुस्तीपटू सारा हिल्डेब्रंटशी होणार आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेनुसार, विनेश फोगटने उपांत्य फेरीत जिचा पराभव केला होता, आता तिला अंतिम फेरीत खेळण्याची संधी मिळणार आहे.

पॅरिस ऑलिम्पिकच्या ५० किलो फ्री स्टाईल स्पर्धेत विनेश फोगटचा सामना अमेरिकन कुस्तीपटू सारा हिल्डब्रँडशी होणार होता. पण आता विनेशला अपात्र ठरवण्यात आल्याने सुवर्णपदकासाठीचा अंतिम सामना क्युबाच्या कुस्तीपटू वि अमेरिकेची कुस्तीपटू यांच्यात होईल.