Vinesh Phogat Disqualified : भारताची कुस्तीपटू विनेश फोगट ऑलिम्पिकमध्ये अंतिम फेरीसाठी अपात्र ठरली आहे. १०० ते १५० ग्रॅमच्या अतिरिक्त वजनामुळे तिला अपात्र ठरवण्यात आलं. अंतिम फेरीत धडक मारल्यानंतर भारतीयांकडून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला. परंतु, २४ तासांच्या आतच भारतीयांच्या सर्व अपेक्षा धुळीस मिळाल्या. विनेश फोगट अपात्र ठरल्याने ती कोणत्याच पदकासाठी आता खेळू शकणार नाही. दरम्यान, भारतीय ऑलिम्पिक महासंघाच्या अध्यक्षा पी. टी. उषा यांनी विनेश फोगटची भेट घेऊन निवेदन सादल केलं आहे. टाईम्स नाऊने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. पी. टी. उषा काय म्हणाल्या? "विनेशची अपात्रता अत्यंत धक्कादायक आहे. मी तिला ऑलिम्पिक व्हिलेज क्लिनिकमध्ये भेटले आणि तिला भारतीय ऑलिम्पिक संघटना (IOA), भारत सरकार आणि संपूर्ण देशाकडून पूर्ण पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले. आम्ही विनेशला सर्व प्रकारचे वैद्यकीय आणि भावनिक समर्थन देत आहोत", असं पी. टी. उषा म्हणाल्या. हेही वाचा >> Vinesh Phogat : “वजन कमी केलं तरी तोंडावर कंट्रोल…”, अपात्र ठरल्यानंतर विनेश फोगटबाबत हिंदकेसरी दीनानाथ सिंग काय म्हणाले? "भारतीय कुस्ती महासंघाने विनेशला अपात्र ठरवण्याच्या निर्णयावर पुनर्विचार करण्यासाठी UWW ला अर्ज केला आहे. IOA शक्य तितक्या पद्धतीने याचा पाठवपुरावा करणार आहे. डॉ. दिनशॉ पारदीवाला यांच्या नेतृत्त्वाखालील वैद्यकीय पथक आणि शेफ-डी-मिशन गगन नारंग यांच्याकडून तिच्यावर लक्ष ठेवण्यात आलं होतं", असं या निवेदनात म्हटलं आहे. #WATCH On Vinesh Phogat's disqualification, President of the Indian Olympic Association (IOA) PT Usha says, "I am disappointed with the news. I met Vinesh. She is fine. She is a little bit disappointed. Her support staff and all our staff were with her to reduce her weight. They… pic.twitter.com/Emr4wgZDiA— ANI (@ANI) August 7, 2024 वजन कमी करताना कमकुवतपणा येतो "दलाचे मनोबल वाढवण्याकरता भारतीय ऑलिम्पिक संघटना प्रत्येक पाऊल उचलत आहे. आम्हाला खात्री आहे की सर्व भारतीय विनेश आणि दलाच्या पाठीशी आहे. कुस्तीगीर सहसा त्यांच्या नैसर्गिक वजनापेक्षा कमी वजनाच्या गटात भाग घेतात. कमी बलवान असलेल्या विरोधकांशी लढायला यामुळे सोपं जातं. वजन कमी करण्याच्या प्रक्रियेमध्ये सकाळचे वजन होईपर्यंत व्यायाम, अन्न-पाणी घेण्यास वर्ज्य असतं. वजन कमी करताना कमकुवतपणा येतो आणि ऊर्जा कमी होते. त्यामुळे पुन्हा ऊर्जा मिळवण्याकरता मर्यादित पाणी, सकस आहार दिला जातो", असं स्पष्टीकरणही यात दिलं होतं. President of the Indian Olympic Association (IOA) PT Usha met Indian wrestler Vinesh Phogat, in Paris, France She was disqualified today from the Women’s Wrestling 50kg for being overweight.(Pic source: IOA) pic.twitter.com/eKRCilr2lG— ANI (@ANI) August 7, 2024 "डिहायड्रेशन टाळण्यासाठी विनेशला थोडंसं पाणी दिलं होतं. त्यामुळे तिचं वजन वाढलं. याच काळात तिचं वजन कमी होण्याकरताही प्रशिक्षकाने प्रयत्न केले. परंतु, तरीही विनेशचे वजन ५० किलो वजनाच्या श्रेणीपेक्षा १०० ग्रॅम जास्त असल्याचे आढळून आले आणि त्यामुळे तिला अपात्र घोषित करण्यात आले. केस कापण्यापासून इतर सर्व पर्यायी उपाय करण्यात आले होते. तरीही तिचं वजन ५० किलोपेक्षा जास्तीचे भरले", असंही या निवेदनात आहे.