Paris Olympics 2024 Updates Day 11: भारताची विनेश फोगट पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये अप्रतिम कामगिरी करत आहे. अवघ्या पाऊण तासात दोन सामने जिंकत तिने उपांत्य फेरीत धडक मारली आहे. युक्रेनची ओक्साना लिवाच हिचा उपांत्यपूर्व फेरीत पराभव केला. लिवाचने खूप प्रयत्न केले पण शेवटी विनेशने (Vinesh Phogat) आपली पकड मजबूत ठेवत विजय मिळवला. विनेशने उपांत्यपूर्व सामना ७-५ च्या फरकाने जिंकला. आता तिचा उपांत्य सामना आज रात्री १०.१५ वाजता क्युबाची कुस्तीपटू गुझमन लोपेझशी होईल.

हेही वाचा – Paris Olympic 2024 Live, Day 11: विनेश फोगाटची सेमीफायनलमध्ये धडक, सलग दोन सामन्यात दणदणीत विजय

Lakhat Ek Amcha Dada Upcoming Episode tulja entry in surya dada house
Video: तुळजा झाली जगतापांची सून, गृहप्रवेश करत असताना डॅडींनी घेतला टोकाचा निर्णय, पाहा ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेचा नवा प्रोमो
how does suiceide pod work
इच्छामरणासाठी तयार करण्यात आलेले ‘सुसाईड पॉड’ काय आहेत? हे मशीन कसे कार्य करते? याची चर्चा का होत आहे?
Sangram Chaugule And Nikki Tamboli
Video : संग्राम चौगुलेने निवडलेत ‘हे’ टॉप पाच स्पर्धक; निक्कीच्या गेमची केली पोलखोल, म्हणाला, “कोणी वंदा, कोणी निंदा; कॅमेऱ्यासमोर…”
Mumbai police hero saved a man from local train accident at Goregaon station viral video
खाकीतला हिरो! चालत्या लोकल ट्रेनखाली अडकला माणूस अन्.., जीवघेण्या अपघातातून मुंबई पोलिसाने कसा वाचवाला जीव, पाहा VIDEO
New Twist in Lakhat Ek Amcha Dada serial Daddy got Tulja married to Surya
Video: डॅडींनी तुळजाचं लग्न लावलं सूर्याशी अन्…, ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेत आला मोठा ट्विस्ट, पाहा प्रोमो
Chicken Biryani Contest Video marathi
बिर्याणी खा, एक लाख जिंका; या ठिकाणी भरलीय अनोखी स्पर्धा, खाण्यासाठी लोकांची तुफान गर्दी, पाहा VIDEO
uttar pradesh Bahraich wolf terror viral video
दिसला माणूस की तोड लचका! लांडग्यांमुळे ३५ गावं भयभीत; आठ जणांचा घेतला बळी; रेस्क्यू ऑपरेशनचा थरारक Video पाहाच
bigg boss marathi forms new pairs in house
‘बिग बॉस’ने तयार केल्या एकूण ६ जोड्या! सदस्यांसाठी अनोखा टास्क; निक्की-अभिजीत तर, अरबाजच्या जोडीला आहे…

महिला कुस्तीपटूंचा लैंगिक छळ केल्याचा आरोप असलेले आणि भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग यांच्याविरोधात आंदोलनाचे नेतृत्व करणारी विनेश फोगटने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नवा इतिहास रचण्याच्या मार्गावर आहे. या चळवळीत संपूर्ण यंत्रणेविरूद्धा आवाज उठवत रस्त्यावर रात्र काढणाऱ्या कुस्तीपटूंमधील एक असलेल्या विनेश फोगटने टोकियो ऑलिम्पिकची सुवर्णपदक विजेती कुस्तीपटू युई सुसाकी हिचा पराभव करत उपांत्यपूर्व फेरी गाठली.

हेही वाचा – Neeraj Chopra Men’s Javelin Throw: भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्रा अंतिम फेरीत; ८९.३४ अंतरावर खणखणीत थ्रो, पाहा VIDEO

Paris Olympics 2024: वर्ल्ड चॅम्पियन सुसाकीला शेवटच्या ५ सेकंदात विनेशने असा दिला धोबीपछाड

विनेश फोगटने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिलांच्या ५० किलो वजनी गटातील कुस्तीच्या राऊंड ऑफ १६ च्या सामन्यात जपानच्या युई सुसाकीचा ३-२ असा पराभव करून मोठा धक्का दिला. चार वेळा विश्वविजेत्या सुसाकीने टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकले होते. आंतरराष्ट्रीय कुस्तीतील जपानी कुस्तीपटूचा हा पहिलाच पराभव आहे, ज्यामुळे विनेशचे यश आणखीनच खास झाले आहे. संपूर्ण सामन्यात विनेश फोगट २-० ने पिछाडीवर सामना अवघ्या काही सेकंदांवर येऊन पोहोचला होता. विनेश पराभूत होणार असंच दिसत होतं, पण शेवटची १० सेकंदापेक्षा कमी वेळ बाकी असताना विनेशने सामना पलटला आणि ३-२ फरकाने दणदणीत विजय मिळवला.

हेही वाचा – Bangladesh Protest: बांगलादेशातील परिस्थिती नियंत्रणाबाहेर, आंदोलकांनी माजी कर्णधार मुर्तझाचं घर पेटवलं

तिसरे ऑलिम्पिक खेळत असलेल्या विनेशने तिच्या अनुभवाचा पुरेपूर वापर केला आणि शेवटच्या पाच सेकंदात जपानच्या चॅम्पियन कुस्तीपटूला नमवून दोन गुण मिळवण्यात यश मिळवले. जपान संघानेही या विरोधात अपील केले पण रेफ्रींनी व्हिडिओ रिप्ले पाहिल्यानंतर तो फेटाळला, त्यामुळे विनेशला आणखी एक गुण मिळाला आणि तिने ३-२ असा विजय मिळवला.