Vinesh Phogat How much net worth : कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्ट्स किंवा सीएएस, ज्याला क्रीडा लवाद असेही म्हणतात, आता रविवार, ११ ऑगस्ट रोजी विनेश फोगटच्या खटल्याचा निकाल देणार आहे. वजन वाढल्यामुळे विनेश फोगटला अंतिम फेरीपूर्वी अपात्र घोषित करण्यात आले होते. अशा परिस्थितीत विनेशने रौप्यपदकासाठी आवाहन केले आहे. अशात आज आपण विनेश फोगटची एकूण संपत्ती किती आहे, जाणून घेऊया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मात्र, निकाल का जाहीर झाला नाही, याचे कारण नंतर समजेल. विनेश फोगटने ऑलिम्पिक स्पर्धेच्या महिलांच्या ५० किलो फ्रीस्टाइल फायनलमधून अपात्रतेच्या विरोधात सीएएसकडे अपील केले होते. तिचे वजन निर्धारित मर्यादेपेक्षा १०० ग्रॅम जास्त होते. भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनने एका निवेदनात म्हटले आहे की, ‘सीएएसच्या तात्पुरत्या समितीने विनेश फोगट विरुद्ध युनायटेड वर्ल्ड रेसलिंग आणि आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती या प्रकरणी एकमेव मध्यस्थ डॉ. ॲनाबेले बेनेट यांना निकाल देण्यासाठी ११ ऑगस्ट २०२४ रोजीपर्यंत वेळ वाढवली आहे. निर्णयाचे संपूर्ण कारण नंतर स्पष्ट केले जाईल.

विनेश फोगटची कारकीर्द आणि यश –

विनेश फोगटचा जन्म २५ ऑगस्ट १९९४ रोजी हरियाणातील चरखी दादरी येथे झाला. वडील राजपाल फोगट यांच्या निधनानंतर, तिला तिचे काका महावीर सिंग फोगट यांनी दत्तक घेतले आणि प्रशिक्षण दिले. विनेशने २०१८ मध्ये कॉमनवेल्थ गेम्स आणि आशियाई गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकले आणि भारतीय कुस्तीमध्ये सुवर्ण अक्षरात तिचे नाव कोरले. तिच्या या योगदानाबद्दल तिला २०२० मध्ये मेजर ध्यानचंद खेलरत्न, २०१६ मध्ये अर्जुन पुरस्कार आणि २०१८ मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

हेही वाचा – Imane Khelif : स्त्री की पुरूष खेळाडू या वादामुळे चर्चेत आलेल्या इमेन खलिफने सुवर्णपदक जिंकल्यानंतर उचलले मोठे पाऊल, जाणून घ्या काय केलं?

विनेश फोगटची एकूण संपत्ती –

मीडिया रिपोर्ट्सनुसार, विनेश फोगटची अंदाजे एकूण संपत्ती ३६.५ कोटी रुपये आहे, जी तिच्या यशस्वी कारकिर्दी आणि उत्पन्नाच्या विविध स्त्रोतांचा परिणाम आहे. तिच्या मासिक पगाराचा एक मोठा भाग युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाकडून येतो, जो वार्षिक सुमारे ६ लाख रुपये आहे. याशिवाय, बेसलाइन व्हेंचर्स आणि कॉर्नरस्टोन स्पोर्ट्स सारख्या कंपन्यांची ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून ती चांगली कमाई करते.

हेही वाचा – Virat Kohli Bihar Fan : किंग कोहलीच्या फॅनने केला कहर! बिहारी चाहत्याने असं काही केलं की विराटही जोडेल हात, मार्कशीट व्हायरल

विनेश फोगटचे आलिशान घर आणि कार कलेक्शन –

विनेश फोगटच्या जीवनशैलीत आलिशान वस्तूला विशेष स्थान आहे. रिपोर्टनुसार, हरियाणात तिचा करोडो रुपयांचा आलिशान व्हिला आहे. अहवालात असेही म्हटले आहे की तिच्याकडे तीन महागड्या कार आहेत. टोयोटा फॉर्च्युनर ज्याची किंमत सुमारे ३५ लाख रुपये आहे. टोयोटा इनोव्हाची किंमत सुमारे २८ लाख रुपये आहे. त्याचबरोबर मर्सिडीज-बेंझ जीएलईची किंमत सुमारे १.८ कोटी आहे. ही सर्व संपत्ती आणि आरामदायी जीवनशैली हे तिच्या मेहनतीचे आणि समर्पणाचे फळ आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vinesh phogat net worth monthly salary car collection and luxury home career success and achievement vbm
Show comments