Vinesh Phogat News : भारताची महिला मल्ल विनेश फोगटला पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कुस्तीच्या ५० किलो वजनी गटात नियमापेक्षा जास्त वजन असल्याने अपात्र ठरवण्यात आलं. विनेशने ( Vinesh Phogat ) तीन सामने जिंकून अंतिम फेरी गाठली होती. मात्र सुवर्ण पदक मिळवण्याचं तिचं स्वप्न अपुरं राहिलं. यानंतर निराश झालेल्या विनेशने दुसऱ्याच दिवशी कुस्ती सोडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर क्रीडा लवादापुढे ही मागणी करण्यात आली की विनेशला रौप्य पदक देण्यात यावं. मात्र ही आशा मावळली आहे. त्यामुळे विनेशने ( Vinesh Phogat ) तिच्या इन्स्टाग्रामवर केला आहे. ज्यानंतर नेटकऱ्यांनी तिला तू चॅम्पियन आहे असं म्हटलं आहे. नेमकं काय घडलं? भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगटला ( Vinesh Phogat ) पॅरिस ऑलिम्पिकच्या महिला फ्रीस्टाइल कुस्ती प्रकारातील ५० किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीपूर्वी अपात्र ठरवण्यात आले होते. विशेनचं वजन १०० ग्रॅम जास्त असल्याने हा ऑलिम्पिक प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आला होता. यानिर्णयानंतर आपल्याला रौप्य पदक मिळावं, अशी मागणी करणारी याचिका विनेशने क्रीडा लवादाकडे केली होती. दरम्यान, क्रीडा लवादाने ही याचिका फेटाळून लावली आहे. भारतासाठी हा मोठा धक्का मानला जातो आहे. हे पण वाचा- Vinesh Phogat : तीनवेळा मोडलेलं पदकाचं स्वप्न, विनेशचं कुस्ती सोडणं आणि तिच्या मनातली अश्वत्थाम्याची जखम विनेशची याचिका फेटाळली इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, क्रीडा लवादाचे अध्यक्ष डॉ. ॲनाबेले बेनेट यांनी विनेशची रौप्य पदक देण्याची मागणी करणारी याचिका फेटाळली आहे. भारतीय कुस्तीपटू विनेश फोगटने ( Vinesh Phogat ) ७ ऑगस्ट रोजी केलेली याचिका फेटाळण्यात आली असून यासंदर्भात सविस्तर आदेश लवकरच जारी करण्यात येईल, असं क्रीडा लावादाने म्हटलं आहे. विनेश फोगाटला वजन जास्त भरल्याने ऑलिम्पिकमधून अपात्र ठरवण्यात आलं होतं. आज तिने कुस्ती विश्वातून संन्यास घेतला आहे. (फोटो सौजन्य-PTI ) विनेश फोगटने केलेली पोस्ट काय? विनेश फोगटने ( Vinesh Phogat ) एक फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. त्या फोटोला तिने काहीही कॅप्शन दिलेली नाही. मैदानावर पडून विनेश फोगटने दोन्ही हात तिच्या डोळ्यांवर ठेवले आहेत असा हा फोटो आहे. या फोटोवर नेटकऱ्यांनी कमेंट केल्या आहेत. "तू आमच्यासाठी कायम चॅम्पियन आहेस," असं एका युजरने लिहिलं आहे. "तू गोल्डन गर्ल आहेस" असं एकाने लिहिलं आहे. "आमच्या आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत तुझ्या पाठिशी आहोत." "आम्हाला तुझा गर्व आहे, तू माघार घेऊ नकोस. तू चॅम्प होतीस, आहेस आणि कायमच राहशील." अशा कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत. विनेशच्या वकिलांनी काय सांगितलं? विनेश फोगटच्या ( Vinesh Phogat ) वकिलांनी कुस्ती स्पर्धेचे ठिकाण चॅम्प डी मार्स एरिना आणि ऑलिम्पिक क्रीडा नगरी यातील अंतर तिचे वजन कमी न होण्यामागचे कारण असल्याचे त्यांनी सांगितले होतं. अंतिम सामन्यापूर्वी वजन चाचणी करण्याची एक निश्चित वेळ असते, या वेळेत खेळाडूंनी कुस्ती स्पर्धा होणाऱ्या ठिकाणी हजर राहणे आवश्यक आहे. ऑलिम्पिक क्रीडा नगरीपासून कुस्ती स्पर्धेचे ठिकाण चॅम्प डी मार्स एरिना यात १९ किलोमीटर इतके अंतर आहे, ज्यामुळे कारने चॅम्प डी मार्स एरिनाला पोहोचायला अर्धा तासाहून अधिक वेळ लागतो, तर मार्गावर ट्रॅफिकही असते, या अंतरामुळे तिला वजन कमी करण्यास फार वेळ मिळाला नसल्याचेही त्यांनी सांगितलं होतं. मात्र तिची याचिका फेटाळली आहे. त्यानंतर एक फोटो विनेशने पोस्ट केला आहे.