Vinesh Phogat Retirement : आशियाई आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेती खेळाडू विनेश फोगट पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत अपात्र ठरल्यानंतर तिने निवृत्तीची घोषणा केली आहे. पहिल्याच फेरीत जागतिक विजेत्या आणि ऑलिम्पिकमधील गतविजेत्या जपानच्या युई सुसाकीला हरवून तिने सुवर्णपदकासाठीची दावेदारी भक्कम केली होती. आपली दमदार कामगिरी सुरू ठेवत विनेशने अंतिम फेरी गाठून इतिहास रचला. मात्र, अखेर तिला रिकाम्या हातीच मायदेशी परतावे लागणार आहे. दरम्यान, तिच्या निवृत्तीच्या घोषणेवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. प्रत्येकाने तिचं कौतुक करून तिला प्रेरणा देण्याचं काम केलंय. विनेश ५० किलो वजनी गटात खेळत होती. पहिल्या दिवशी विनेशचे वजन ४९.५ इतके भरले. मात्र, उपांत्य फेरीची लढत संपली, तेव्हा बाहेर पडल्यावर विनेशचे वजन ५२ किलोपर्यंत वाढले होते. या वाढलेल्या वजनाने घात केला आणि तिची ऑलिम्पिक पदकाची कहाणी पुन्हा अधुरी राहिली. त्यामुळे तिने आज पहाटेच निवृत्ती जाहीर केली. परंतु, तिच्या निवृत्तीवर अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. तर, अनेकांनी तिला प्रेरणा दिली आहे. हेही वाचा >> Vinesh Phogat : जंतर-मंतर ते पॅरीस ऑलिम्पिक! प्रतिस्पर्ध्यांना चितपट करणारी अपात्र ठरली, पण…! "निराशा ना हो आप बहादूर है विनेश| कुश्ती नहीं आपने जग जीता है| आपके संघर्ष की कहाणी दुनिया अपने बच्चो को सुनाया करेगी|" अशी काव्यात्मक रचना एका नेटिझनने केली आहे. तर एकाने जेव्हा कुस्तीने हरवू शकले नाहीत तेव्हा षडयंत्र रचून हरवलं, अशीही प्रतिक्रिया दिली आहे. "अहंकारी लोकांचा अहंकार तोडला आहेस तू, आजच्या जगात कोणीतरी आहे जिच्यात पाठीचा कणा आहे", असं म्हणत तिच्या चिकाटी वृत्तीचं कौतुक केलं आहे. अहंकारियों का अहंकार तोड़ा है तुमने बहन, आज के दौर में कोई तो है जिसमे रीढ़ की हड्डी है pic.twitter.com/5Qx7drxiVk— Sandeep Khasa (@SamKhasa_) August 8, 2024 "गिरते हैं शहसवार ही मैदान-ए-जंग में, वो तिफ्ल क्या गिरे जो घुटनों के बल चले हम सबको आप पर गर्व है आपका प्रयास ही किसी मेडल से कम नहीं है!" असंही नेटिझन्स म्हणत आहेत. तर, तर दबदबा था, दबदबा है आणि दबदबा यापुढेही कायम राहील, असं एकाने म्हटलं आहे. गिरते हैं शहसवार ही मैदान-ए-जंग में, वो तिफ्ल क्या गिरे जो घुटनों के बल चलेहम सबको आप पर गर्व हैआपका प्रयास ही किसी मेडल से कम नहीं है?— सरल व्यंग्य (@SaralVyangya) August 8, 2024 "तुम्ही हे दोन्ही फोटो पाहा. बहीण विनेश तेव्हाही हरली नव्हती आणि आजही हरली नाही. संपूर्ण देश विनेशच्या सोबत उभा आहे", असंही एकाने म्हटलं आहे. आप दोनों तस्वीरों को देख लीजिए बहन विनेश तब भी नहीं हारी थी और आज भी नहीं हारी है पूरा देश विनेश के साथ हैएक आवाज में repost करके बता दीजिए हम सब बहन के साथ खड़े हैं और आगे भी खड़े रहेंगे।जय हिन्द pic.twitter.com/QQix8pXWd0— Manoj Meghwal? (@manojkarela666) August 8, 2024 दरम्यान, विनेश सर्वप्रथम २०१६ मध्ये रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत ४८ किलो वजनी गटातून सहभागी झाली होती. तिची आगेकूच सुरू असतानाच गुडघ्याच्या दुखापतीमुळे तिचे आव्हान संपुष्टात आले. रिओमध्ये अर्धवट राहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी विनेश टोक्योत वजन वाढवून ५३ किलो गटातून सहभागी झाली. त्यावेळी ती जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी होती. मात्र, निराशाजनक कामगिरीमुळे तिला नवव्या स्थानावर राहावे लागले. हा सहभाग तिच्यासाठी वादग्रस्त ठरला. बेशिस्त वर्तनाचा ठपका ठेवत भारतीय कुस्ती संघटनेने तिच्यावर बंदीही आणली. आपण काहीशा मानसिक तणावाखाली होतो असे तिने सांगितले.