Vinesh Phogat Statement to Court on Reason Behind Her Increased Weight : सध्या सर्वांचे लक्ष विनेश फोगटला रौप्यपदक मिळणार की नाही, यावर आंतरराष्ट्रीय क्रीडा लवादाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष आहे. महिला फ्रीस्टाइल ५० किलो वजनी गटाच्या कुस्ती स्पर्धेत अंतिम फेरीपूर्वी अपात्र ठरलेल्या विनेशचे वजन ५० किलोच्या मर्यादेपेक्षा १०० ग्रॅम जास्त होते. याप्रकरणी सीएएससमोर युक्तिवाद सुरू असताना, विनेशने वजन कमी करण्यात अयशस्वी होण्यामागील तिचे पहिल्या दिवशीचे लागोपाठ झालेले सामने तसेच ऑलिम्पिक क्रीडा नगरी आणि स्पर्धेचे मैदान यामधील अंतर पाहिले आहे. ऑलिम्पिकच्या अंतिम सामन्यापूर्वी विनेश फोगटचे वजन अचानक कसे वाढले, याचे कारण तिने कोर्टात सांगितले आहे. यावर विनेश नेमकं काय म्हणाली, जाणून घ्या.
इंडियन एक्स्प्रेसमधील वृत्तानुसार, फोगटच्या वकिलांनी कुस्ती स्पर्धेचे ठिकाण चॅम्प डी मार्स एरिना आणि ऑलिम्पिक क्रीडा नगरी यातील अंतर तिचे वजन कमी न होण्यामागचे कारण असल्याचे त्यांनी सांगितले. अंतिम सामन्यापूर्वी वजन चाचणी करण्याची एक निश्चित वेळ असते, या वेळेत खेळाडूंनी कुस्ती स्पर्धा होणाऱ्या ठिकाणी हजर राहणे आवश्यक आहे. ऑलिम्पिक क्रीडा नगरीपासून कुस्ती स्पर्धेचे ठिकाण चॅम्प डी मार्स एरिना यात १९ किलोमीटर इतके अंतर आहे, ज्यामुळे कारने चॅम्प डी मार्स एरिनाला पोहोचायला अर्धा तासाहून अधिक वेळ लागतो, तर मार्गावर ट्रॅफिकही असते, या अंतरामुळे तिला वजन कमी करण्यास फार वेळ मिळाला नसल्याचेही त्यांनी सांगितले. याचसोबत वकिलांनी असेही सांगितले की, विनेशच्या सामन्यांचे वेळापत्रक (पहिल्या दिवशी झालेले तीन सामने) फारच व्यस्त असल्याने तिला वजन कमी करण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला नाही. त्यामुळे तिचे वजन ५२.७ किलोने वाढले.
हेही वाचा – Olympics : विनेश फोगटचं रौप्य पदक निश्चित? पराभवानंतरही ‘या’ खेळाडूला मिळालं पदक, क्रीडा लवादाचा निर्णय
वकिलांनी पुढे असा युक्तिवाद केला की विनेशने दुसऱ्या दिवशी केलेल्या वजन चाचणीनंतर तिचे वजन १०० ग्रॅम जास्त आले पण तेव्हा तिला यासंबंधी कोणताही स्पर्धात्मक फायदा मिळाला नाही. यासोबतच या निर्णयामुळे विनेशने पहिले तिन्ही सामने प्रामाणिकपणे खेळून आणि कष्टाने अंतिम फेरी गाठली असली तरीही तिला रौप्य पदकही मिळाले नाही.
हेही वाचा – Virat Kohli in Olympics : ऑलिम्पिक २०२४ संपण्यापूर्वी विराटची का होतेय चर्चा? ‘या’ व्हायरल व्हिडीओने वेधले सर्वांचे लक्षहेही वाचा –
‘१०० ग्रॅम जास्त वजन हे अत्यंत नगण्य आहे आणि उन्हाळ्याच्या हवामानात मानवी शरीरात सूज येण्यामुळे सहज वजन वाढू शकते, कारण उष्णतेमुळे मानवी शरीर अधिक पाणी टिकवून ठेवते, म्हणजेच वैज्ञानिकदृष्ट्या उष्ण वातावरणात टिकून राहण्यासाठी मदत करण्यासाठी शरीर हे कार्य करते. स्नायूंच्या वस्तुमान वाढल्यामुळे देखील वजन वाढू शकते कारण खेळाडूने एकाच दिवशी तीन सामने खेळले होते. प्रत्येक सामन्यानंतर पुढील सामन्यात चांगली कामगिरी करण्यासाठी तिचे शरीर तितकेच मजबूत राहण्यासाठी आवश्यक आहार घेतल्यानेही तिचे वजन वाढू शकते,” असे फोगटच्या वकिलांनी सांगितले. विनेशच्या वकिलांनी इतर सर्व गोष्टींपेक्षा खेळाडूचे स्वास्थ्य चांगले असणे अधिक गरजेचे असल्याचेही सांगितले.
© IE Online Media Services (P) Ltd