भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगटला पॅरिस ऑलिम्पिकच्या महिला फ्रीस्टाइल कुस्ती प्रकारातील ५० किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीपूर्वी अपात्र ठरवण्यात आले होते. विशेनचं वजन १०० ग्रॅम जास्त असल्याने हा ऑलिम्पिक प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आला होता. यानिर्णयानंतर आपल्याला रौप्य पदक मिळावं, अशी मागणी करणारी याचिका विनेशने क्रीडा लवादाकडे केली होती. दरम्यान, क्रीडा लवादाने ही याचिका फेटाळून लावली आहे. भारतासाठी हा मोठा धक्का मानला जातो आहे.

इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, क्रीडा लवादाचे अध्यक्ष डॉ. ॲनाबेले बेनेट यांनी विनेशची रौप्य पदक देण्याची मागणी करणारी याचिका फेटाळली आहे. भारतीय कुस्तीपटू विनेश फोगटने ७ ऑगस्ट रोजी केलेली याचिका फेटाळण्यात आली असून यासंदर्भात सविस्तर आदेश लवकरच जारी करण्यात येईल, असं क्रीडा लावादाने म्हटलं आहे.

Rohit Sharma share funny reel on instagram
Rohit Sharma : रोहित शर्माने वर्कआउट करत असतानाचा शेअर केला ‘फनी’ VIDEO, चाहते म्हणाले…
Vinesh Phogat slams PT Usha
Vinesh Phogat on PT Usha: “पीटी उषा यांनी गुपचूप फोटो घेतला आणि त्यानंतर राजकारण…”, विनेश फोगटचा मोठा आरोप
Jasprit Bumrah Video gone viral in which he is angrily telling Mumbai Indians that he is a fast bowler
Jasprit Bumrah : ‘मी मीडियम पेसर नाही, फास्ट बॉलर’; मुंबई इंडियन्सच्या पोस्टने बुमराह भडकला, VIDEO व्हायरल
AFG vs NZ Test Day 3 play Updates in marathi
AFG vs NZ Test : ग्रेटर नोएडा स्टेडियममध्ये पावसाचा कहर, अफगाणिस्तान-न्यूझीलंड कसोटीचा तिसरा दिवसही रद्द
Sourav Ganguly says Rishabh Pant to become All Time Great in Test Cricket
IND vs BAN : गिल-जैस्वाल नव्हे तर ‘हा’ २६ वर्षीय खेळाडू भारताचा सर्वोत्तम कसोटी फलंदाज, सौरव गांगुलीचा दावा
chess olympiad india strongest team in budapest to win gold medal
सुवर्णयशाचे ध्येय! बुद्धिबळ ऑलिम्पियाडमधील भारताच्या मोहिमेस आजपासून प्रारंभ
greater noida stadium for new zealand afghanistan test match
Afg vs New test at Greater Noida Stadium: नोएडातलं मैदान बीसीसीआयसाठी नामुष्की का ठरलं?
AFG vs NZ Test Match at Greater Noida Stadium Catering Using Washroom Water For Food
AFG vs NZ: टॉयलेटमध्ये धुतली भांडी; नोएडात आदरातिथ्याची लक्तरं; AFG vs NZ सामना होत असलेल्या स्टेडियमधील संतापजनक घटना
Ajit Agarkar to Sent Musheer Khan on Australia Tour with India A Squad Just After 7 Matches Impressed by His Innings
Musheer Khan: मुशीर खानच्या खेळीवर अजित आगरकर फिदा; फक्त ७ सामने खेळूनही जाणार ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर

हेही वाचा – Manu Bhaker Neeraj Chopra : ‘माझ्यात आणि नीरजमध्ये…’, मनू लग्नाबाबतच्या चर्चेवर सोडले मौन; म्हणाली, तो मला…

पीटी उषा यांनीही दिली प्रतिक्रिया

दरम्यान, क्रीडा लवादाच्या या निर्णयानंतर भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षा पीटी उषा यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. हा निर्णय धक्कादायक आणि निराशाजनक असल्याचे त्यांनी म्हटलं आहे.

विनेश फोगटच्या वकिलांनी नेमका काय युक्तिवाद केला होता?

विनेश फोगटच्या वकिलांनी कुस्ती स्पर्धेचे ठिकाण चॅम्प डी मार्स एरिना आणि ऑलिम्पिक क्रीडा नगरी यातील अंतर तिचे वजन कमी न होण्यामागचे कारण असल्याचे त्यांनी सांगितले होतं. अंतिम सामन्यापूर्वी वजन चाचणी करण्याची एक निश्चित वेळ असते, या वेळेत खेळाडूंनी कुस्ती स्पर्धा होणाऱ्या ठिकाणी हजर राहणे आवश्यक आहे. ऑलिम्पिक क्रीडा नगरीपासून कुस्ती स्पर्धेचे ठिकाण चॅम्प डी मार्स एरिना यात १९ किलोमीटर इतके अंतर आहे, ज्यामुळे कारने चॅम्प डी मार्स एरिनाला पोहोचायला अर्धा तासाहून अधिक वेळ लागतो, तर मार्गावर ट्रॅफिकही असते, या अंतरामुळे तिला वजन कमी करण्यास फार वेळ मिळाला नसल्याचेही त्यांनी सांगितले. याबरोबरच विनेशच्या सामन्यांचे वेळापत्रक (पहिल्या दिवशी झालेले तीन सामने) फारच व्यग्र असल्याने तिला वजन कमी करण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला नाही. त्यामुळे तिचे वजन ५२ किलोपेक्षा जास्त झाले असा युक्तिवादही त्यांनी केला होता.

१०० ग्रॅम जास्त वजन हे अत्यंत नगण्य आहे आणि उन्हाळ्याच्या हवामानात मानवी शरीरात सूज येण्यामुळे सहज वजन वाढू शकते, कारण उष्णतेमुळे मानवी शरीर अधिक पाणी टिकवून ठेवते, म्हणजेच वैज्ञानिकदृष्ट्या उष्ण वातावरणात टिकून राहण्यासाठी मदत करण्यासाठी शरीर हे कार्य करते. स्नायूंचे वस्तूमान वाढल्यामुळे देखील वजन वाढू शकते कारण खेळाडूने एकाच दिवशी तीन सामने खेळले होते. प्रत्येक सामन्यानंतर पुढील सामन्यात चांगली कामगिरी करण्यासाठी तिचे शरीर तितकेच मजबूत राहण्यासाठी आवश्यक आहार घेतल्यानेही तिचे वजन वाढू शकते, असेही त्यांनी म्हटलं होतं.

हेही वाचा – Sreejesh on Vinesh : ‘ती रौप्यपदकासाठी पात्र आहे पण खेळात नियम…’, विनेशबद्दल श्रीजेशचे मोठे वक्तव्य

नेमकं प्रकरण काय?

पॅरिस ऑलिम्पिकदरम्यान विनेश फोगटने सलग ३ सामने जिंकून ५० किलो फ्रीस्टाइल कुस्तीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता. अंतिम सामना हा ७ ऑगस्टच्या रात्री होणार होता, पण त्याच दिवशी सकाळी वजन वाढल्यामुळे विनेशला अपात्र ठरवण्यात आले होतं. यानंतर विनेशने क्रीडा लवादाकडे याचिका दाखल केली होती. आपल्याला सुवर्णपदकाचा सामना खेळण्याची परवानगी द्यावी, ही तिची पहिली मागणी होती. मात्र नियमांचा हवाला देत तिची मागणी तात्काळ फेटाळण्यात आली होती.

ही मागणी फेटाळल्यानंतर विनेशने तिला या रौप्यपदक मिळावे, अशी मागणी केली होती. यावर क्रीडा लवादाकडून १० ऑगस्ट रोजी निर्णय येणार होता. मात्र, तो ११ ऑगस्टवर ढकण्यात आला. यानंतर हा निर्णय १३ ऑगस्ट रोजी सुनावण्यात येईल, असं सांगण्यात आलं. त्यानंतर परत हा निर्णय १६ ऑगस्ट रोजी जाहीर करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं. मात्र, क्रीडा लवादाने आज त्यापूर्वीच निर्णय दिला.