Viral Cricket Video: सध्या जगभरात अनेक क्रिकेट लीग स्पर्धा सुरु आहेत. आधी ५ सामन्यांच्या वनडे मालिका खेळवल्या जायच्या. पण आता वनडे कमी आणि टी-२० मालिका जास्त खेळवल्या जातात. यासह जगभरात अनेक टी-२० लीग स्पर्धा देखील खेळवल्या जातात. आता क्रिकेट खेळणाऱ्या प्रत्येक देशाची स्वत:ची क्रिकेट लीग स्पर्धा आहे. यासह भारतातील प्रत्येक स्टेट क्रिकेट असोसिएशनकडून क्रिकेट लीग स्पर्धेचे आयोजन केले जाते. कमी षटकांचा खेळ आणि छोटी बाऊंड्री, त्यामुळे फलंदाजाकडे बॅट फिरवण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो. कधीकधी फलंदाज आगळ्यावेगळ्या स्टाईलने फटका मारतात. भारताचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव आपल्या ३६० स्टाईल फलंदाजीसाठी ओळखला जातो. दरम्यान सोशल मीडियावर एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे, ज्यात फलंदाज आगळावेगळा फटका मारताना दिसून येत आहे.
सोशल मीडियावर असंख्य व्हिडीओ व्हायरल होत असतात. या व्हिडीओमध्ये क्रिकेटच्या व्हिडीओचा देखील समावेश असतो. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टी-२० लीग स्पर्धांचे आयोजन केले जाते, तसेच स्थानिक क्रिकेटमध्ये टेनिस क्रिकेट स्पर्धांचे आयोजन केले जाते. हे सामने ५ किंवा ६ षटकांचे असतात. त्यामुळे येणारा प्रत्येक फलंदाज हा मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात असतो. पण काही फलंदाज असे असतात, जे जोर न लावता अचूक टायमिंगने चेंडूला दिशा देतात आणि चौकार- षटकार मारतात.
काकांचा भन्नाट शॉट
सूर्यकुमार यादव हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मिस्टर ३६० फलंदाज म्हणून ओळखला जातो. मैदानाचा एकही कोपरा नसतो, जिथे सूर्या मारलेला चेंडू जात नसतो. त्यामुळे सूर्याविरुद्ध गोलंदाजी करताना चेंडू टाकायचा तरी कुठं? असा प्रश्न गोलंदाजांना पडतो. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एका फलंदाजाने सूर्यकुमार यादव स्टाईल फटका मारला आहे. जो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, टेनिस क्रिकेट स्पर्धेतील सामना सुरु आहे. यादरम्यान उजव्या हाताचा गोलंदाज ओव्हर द विकेटचा मारा करताना चेंडू स्टंप लाईनवर टाकतो. त्यावेळी फलंदाज समोर फटका मारण्याऐवजी फिरतो आणि यष्टीरक्षकाच्या वरुन चेंडूला ढकलून देतो. यष्टीरक्षक आणि खेळाडू चेंडू अडवण्यासाठी चेंडूच्या मागे धावतात पण चेंडू वेगाने सीमारेषेबाहेर निघून जातो. नेटकऱ्यांनी मजेशीर प्रतिक्रिया देत या काकांना “सूर्यकुमार यादवचा काका” असं म्हटलं आहे.
