MS Dhoni Viral Video: भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी त्याच्या शानदार कारकिर्दीत जागतिक क्रिकेटमधील सर्वात मोठे नाव ठरला. निवृत्तीनंतरही धोनीचं क्रेझ काही कमी झालेलं नाही. धोनीच्या चाहत्यांचा उत्साह पाहता त्याची तुलना अनेकदा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरशी केली जाते. अनेकांनी आजवर त्याला सचिनच्या खेळावरूनही प्रश्न केले आहेत. अशाच एका विद्यार्थ्याच्या प्रश्नाला उत्तर देताना एम एस धोनीने लाखो मनं जिंकली आहेत.

धोनीने नुकत्याच एमएस धोनी ग्लोबल स्कूलमधील विद्यार्थ्यांशी संवाद साधला, यावेळी त्याने सांगितले की, “लहानपणी सचिन तेंडुलकरचा खेळ मी नेहमी पाहायचो. सचिन हा क्रिकेटमधील माझा आदर्श आहे. मी अगदी तुमच्यासारखाच होतो, मी सचिन तेंडुलकरला खेळताना पाहायचो आणि नेहमी वाटायचं की मला त्याच्यासारखं खेळायचं आहे. नंतर मला समजले की मी खेळू शकत नाही पण आजही माझ्या मनात सचिन सारखे खेळण्याची इच्छा आहे”

IPL 2024 Lucknow Super Gitans vs Gurajat Titans Match Updates in Marathi
IPL 2024: चित्त्याच्या चपळाईने बिश्नोईने टिपला झेल, सारेच झाले अवाक; पाहा व्हीडिओ
Harsha Bhogle's reaction to Hardik Pandya
IPL 2024 : ‘त्याची चूक काय…’, हार्दिकवर होणाऱ्या टीकेवर दिग्गज समालोचक संतापला, टीकाकारांना दाखवला आरसा
friend request natak review
नाटयरंग : ‘फ्रेंड रिक्वेस्ट’ – घटस्फोटित बाप-मुलीच्या नात्यातील उत्कट तेढ
siddhu moosewala house video goes viral after his brother birth
वयाच्या ५८ व्या वर्षी सिद्धू मूसेवालाच्या आईने दिला बाळाला जन्म; घरातील जल्लोषाचा VIDEO व्हायरल

धोनीने २००४ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले, तेंडुलकरच्या कारकिर्दीतील शेवटच्या 10 वर्षांत अनेकदा धोनी व तेंडुलकर ही जोडी मैदानात उत्तम भागीदारी करताना दिसली. जेव्हा तेंडुलकर एकदिवसीय क्रिकेटमध्ये दुहेरी शतक झळकावणारा पहिला खेळाडू ठरला तेव्हा त्याच सामन्यात धोनीने ६८ धावा करत तेंडुलकरची साथ दिली होती.

सचिनच माझा आदर्श, पाहा काय म्हणाला धोनी?

दरम्यान, धोनीने २०११ च्या विश्वचषकात भारताला विजय मिळवून दिला होता, तेंडुलकरच्या कारकिर्दीतील हा शेवटचा विश्वचषक होता. तेंडुलकरला लक्षात राहणारा निरोप देण्याची जबाबदारी धोनीने आपल्या खांद्यावर पेलली होती.

T20 World Cup मराठी प्रक्षेपणाबाबत मोठा अपडेट; स्टार स्पोर्ट्सचे अधिकारी राज ठाकरे यांच्या भेटीला

सचिन म्हणाला, धोनी सर्वोत्तम..

भारताने २०११ चा विश्वचषक जिंकल्यावर तेंडुलकरने धोनीवर कौतुकाचा वर्षाव करत तो आपल्यासह खेळलेला सर्वोत्तम कर्णधार आहे असे म्हंटले होते. सचिन म्हणाला होता की “धोनी नेहमीच सतर्क असतो. त्याला प्रत्येक परिस्थितीची समज आहे. शिवाय टीमला एकत्र ठेवण्यातही त्याचा मोलाचा वाटा आहे, धोनी नेहमीच प्रत्येक गोलंदाज, फलंदाज व वरिष्ठ खेळाडूंशी आदराने बोलतो. नेहमीच शांत असतो. निराश होऊनही चिडचिड न करण्याचा त्याचा स्वभावच त्याला उत्तम कर्णधार बनवतो.