Video : विराट कोहलीवरून उतरेना पुष्पा ‘फिव्हर’; सोशल मीडियावर नवीन व्हिडीओ व्हायरल

विविध क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तींनी पुष्पाच्या सिग्नेचर स्टेपची नक्कल केली आहे. यामध्ये भारताचा दिग्गज फलंदाज विराट कोहलीचाही समावेश होतो.

Virat Kohli Pushpa Action
फोटो सौजन्य – ट्वीटर

आजपासून (१ जुलै) भारत आणि इंग्लंड यांच्यात पाचवा कसोटी सामना खेळवला जात आहे. या सामन्यात फलंदाजीचा विचार केला तर भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीकडे सर्वांच्या नजरा असणार आहेत. त्यापूर्वीच विराट कोहली सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विराट कोहलीवर अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’ भूमिकेचा मोठा प्रभाव झाल्याचे दिसत आहे. विराट कोहलीने पुन्हा एकदा पुष्पाच्या सिग्नेचर स्टेपची नक्कल करताना दिसला आहे.

अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा: द राइज’ हा चित्रपट एका रात्रीत ट्रेंडसेटर बनला. विविध क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तींनी पुष्पाच्या सिग्नेचर स्टेपची नक्कल केली आहे. यामध्ये भारताचा दिग्गज फलंदाज विराट कोहलीचाही समावेश होतो. अलीकडेच, कोहली पुन्हा एकदा पुष्पाच्या सिग्नेचर स्टेपची नक्कल करताना दिसला आहे. एजबस्टन येथे होत असलेल्या इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यापूर्वी सराव करताना त्याने ही नक्कल केली. विराट कोहलीला असे करताना बघून तिथे उपस्थित असलेल्या शुभमन गिललाही हसू आवरता आले नाही. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

दरम्यान, भारताचा नियमित कर्णधार रोहित शर्माच्या अनुपस्थितीत वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहकडे भारतीय संघाचे नेतृत्व देण्यात आले आहे. सध्या सुरू असलेल्या कसोटीमध्ये विराट कोहलीसह संपूर्ण संघ बुमराहच्या नेतृत्त्वाखाली खेळत आहे. फलंदाजीमध्ये विराट कोहलीकडे सर्वांचे लक्ष आहे. यावर्षी (२०२१) कसोटीत केवळ एक अर्धशतक झळकावले आहे. जवळपास गेल्या अडीच वर्षांपासून कोहलीला एकही शतकी खेळी करता आलेली नाही.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Virat kohli again imitates pushpa gesture ahead of ind vs eng edgbaston test vkk

Next Story
‘जोस’ असणार इंग्लंडच्या एकदिवसीय आणि टी २० संघाचा ‘बॉस’; चालवणार इयॉन मॉर्गनचा वारसा
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी