Virat Kohli Celebration: अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडलेल्या सामन्यात गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा डाव अवघ्या १५५ धावांवर आटोपला. या धावांचा पाठलाग करताना गुजरात टायटन्सने ४ गडी राखून विजय मिळवला. यादरम्यान शुबमन गिलने ४३ धावांची खेळी केली. दरम्यान शुबमन गिल बाद होताच विराटने दिलेली प्रतिक्रिया सध्या तुफान चर्चेत आहे.

गुजरात टायटन्सला हा सामना जिंकण्यासाठी १५६ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना शुबमन गिलने दमदार खेळी केली. एका बाजूने विकेट्स जात होते, तर गिलने एका बाजूने धावा करणं सुरु ठेवलं. त्याने १८ चेंडूत ४३ धावांची दमदार खेळी केली. तर झाले असे की, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाची गोलंदाजी सुरु असताना पाचवे षटक टाकण्यासाठी भुवनेश्वर कुमार गोलंदाजीला आला. या षटकातील शेवटच्या चेंडूवर शुबमन गिलने स्टेपआऊट होऊन कव्हरच्या दिशेने जोरात फटका मारला. पण चेंडू सरळ विराट कोहलीच्या हातात गेला. विराटने कुठलीही चूक न करता सोपा झेल घेतला. पण झेल घेताच विराटने गिलकडे रागात पाहिलं. त्यानंतर चेंडू जोरात खेळपट्टीवर आपटला आणि आपला संताप व्यक्त केला. विराटच्या प्रतिक्रियेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

गुजरातचा ४ गडी राखून विजय

या सामन्यात गुजरात टायटन्सला विजयासाठी १५६ धावांची गरज होती. या धावांचा पाठलाग करताना सलामीला आलेला साई सुदर्शन अवघ्या ६ धावा करून माघारी परतला. तर शुबमन गिलने ४३ धावांची खेळी केली. त्यानंतर जोस बटलरने ३९ धावांची खेळी केली. वॉशिंग्टन सुंदरने १२, शाहरुख खानने ८ धावांची खेळी केली. शेवटी राहुल तेवतियाने २७ धावांची खेळी केली. गुजरात टायटन्सने हा सामना ४ गडी राखून आपल्या नावावर केला.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा डाव १५५ धावांवर आटोपला

गुजरातने नाणेफेक जिंकून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं होतं. प्रथम फलंदाजी करताना विराट कोहलीने सर्वाधिक २८ धावांची खेळी केली. देवदत्त पडिक्कलने सर्वाधिक ४० धावांची खेळी केली. तर कर्णधार रजत पाटीदारने १९ धावांची खेळी केली. शेवटी रोमारियो शेफर्डने १७ धावा केल्या. तर भुवनेश्वर कुमारने नाबाद १५ धावा केल्या. यासह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संपूर्ण डाव अवघ्या १५५ धावांवर आटोपला.