IND vs AUS Test Series: कसोटी मालिकेसाठी विराट कोहली आणि केएल राहुल स्टायलिश शैलीत नागपुरात दाखल, पाहा VIDEO Virat Kohli and KL Rahul arrive in Nagpur in style for Test series against Australia WATCH VIDEO | Loksatta

IND vs AUS Test Series: कसोटी मालिकेसाठी विराट कोहली आणि केएल राहुल स्टायलिश शैलीत नागपुरात दाखल, पाहा VIDEO

Border Gavaskar Series: भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात चार सामन्यांची बॉर्डर गावसकर मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेली ९ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. या मालिकेपूर्वी विराट कोहली आणि केएल नागपूरला पोहोचले आहेत.

for Test series against Australia
केएल राहुल आणि विराट कोहली (फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळली जाणारी कसोटी मालिका ९ फेब्रुवारी पासून भारतात होणार आहे. ही मालिका ४ सामन्यांची आहे. या मालिकेतील पहिला सामना नागपुरात होणार असून त्यासाठी दोन्ही संघांनी तयारी सुरू केली आहे. या मालिकेत केएल राहुल आणि विराट कोहलीसह अनेक खेळाडू भारतीय संघातून विश्रांती घेतल्यानंतर परतत आहेत. कोहली आणि राहुल रात्री उशिरा नागपूरला रवाना झाले असून ते संघात दाखल झाले आहेत. या दोघांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियन संघ आधीच भारतात पोहोचला आहे. कांगारू संघाने बेंगळुरू येथे पाच दिवसीय शिबिर सुरू केले आहे. हे शिबिर ६ फेब्रुवारीला संपणार आहे. यानंतर पाहुणा संघ नागपूरला रवाना होईल. २०२०-२१ मध्ये बॉर्डर गावसकर ट्रॉफीमध्ये भारताने ऑस्ट्रेलियाचा २-१ ने पराभव केला. टीम इंडिया बॉर्डर गावसकर ट्रॉफी (BGT) ची सध्याची चॅम्पियन आहे.

भारतासाठी मालिका अत्यंत महत्त्वाची –

ही कसोटी मालिका भारतीय संघासाठी खूप महत्त्वाची आहे. यामुळे संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल खेळणार की नाही हे ठरवले जाईल. ऑस्ट्रेलिया आणि भारत कसोटी चॅम्पियनशिपच्या यादीत १ आणि २ क्रमांकावर आहेत, अशा परिस्थितीत भारताला अंतिम सामना खेळायचा असेल तर आपले स्थान कायम राखावे लागेल. त्यासाठी या मालिकेत ऑस्ट्रेलियाला पराभूत करावे लागेल.

ऑस्ट्रेलिया मालिकेसाठी भारतीय संघ –

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मो. शमी, मोहम्मद. सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट, सूर्यकुमार यादव.

हेही वाचा – IND vs AUS: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी इरफान पठाणचा कोहलीला महत्त्वाचा सल्ला; म्हणाला, विराटने ‘ही’ गोष्ट लक्षात ठेवावी

भारत दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलिया संघ –

पॅट कमिन्स (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, जोश हेझलवूड, उस्मान ख्वाजा, स्टीव्हन स्मिथ, मार्नस लाबुशेन, ट्रॅव्हिस हेड, कॅमेरॉन ग्रीन, अॅलेक्स कॅरी (यष्टीरक्षक), मिचेल स्टार्क, टॉड मर्फी, मॅट रेनशॉ, पीटर हँड्सकॉम्ब, लान्स मॉरिस, अॅश्टन अगर, मिचेल स्वीपसन, नॅथन लायन, जोश हेझलवूड, स्कॉट बोलँड.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-02-2023 at 10:04 IST
Next Story
विश्लेषण: शुभमन गिल भारतीय फलंदाजीचा तारणहार ठरणार का?