ताज्या आयसीसी वनडे क्रमवारीत विराट कोहली आणि रोहित शर्मा टॉप-१० मध्ये कायम आहेत. फलंदाजांच्या क्रमवारीत विराट दुसऱ्या तर रोहित तिसऱ्या स्थानावर आहे. दुसरीकडे, जसप्रीत बुमराह गोलंदाजांमध्ये सातव्या, तर अष्टपैलू खेळाडूंमध्ये रवींद्र जडेजा नवव्या स्थानावर आहे. रोहित आणि जडेजा दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेत खेळले नव्हते. या दोघांच्या क्रमवारीत कोणताही बदल झालेला नाही. भारताच्या कोणत्याही खेळाडूने या मालिकेत चांगली कामगिरी केली नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारताविरुद्धच्या वनडे मालिकेत चांगली कामगिरी करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंनाही आयसीसी क्रमवारीत फायदा झाला आहे. क्विंटन डी कॉक आणि रूसी व्हॅन डर डुसेन यांनी फलंदाजांच्या टॉप-१० क्रमवारीत प्रवेश केला आहे. २०१९च्या विश्वचषकानंतर प्रथमच डी कॉकने पहिल्या पाच फलंदाजांमध्ये प्रवेश केला आहे. दुसरीकडे, डुसेनने कारकिर्दीत प्रथमच टॉप-१० मध्ये स्थान मिळवले आहे.

भारताकडून सलामीवीर शिखर धवनने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सर्वाधिक १६९ धावा केल्या. धवन फलंदाजांच्या क्रमवारीत १५व्या स्थानावर पोहोचला आहे. दुसऱ्या सामन्यात शानदार अर्धशतक झळकावणाऱ्या ऋषभ पंतला पाच स्थानांचा फायदा झाला असून तो ८२व्या स्थानावर आहे. या यादीत बाबर आझम पहिल्या स्थानावर कायम आहे.

हेही वाचा – VIDEO : वडिलांनी जोरात वाजवली कानाखाली..! शिखर धवनसोबत घडली ‘मोठी’ घटना; पाहा नक्की झालं काय

गोलंदाजांच्या क्रमवारीत भारताचा फक्त जसप्रीत बुमराह टॉप-१० मध्ये स्थान मिळवू शकला आहे. तो ६८९ गुणांसह सातव्या क्रमांकावर आहे. न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट ७३७ गुणांसह अव्वल स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियाचा जोस हेझलवूड दुसऱ्या, इंग्लंडचा ख्रिस वोक्स तिसऱ्या, अफगाणिस्तानचा ऑफस्पिनर मुजीब उर रहमान चौथ्या आणि बांगलादेशचा मेहदी हसन पाचव्या क्रमांकावर आहे.

More Stories onआयसीसीICC
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Virat kohli and rohit sharma in latest icc odi rankings adn
First published on: 26-01-2022 at 15:51 IST