Virat Kohli Anushka Sharma Dance Video: आरसीबीने आयपीएल २०२६ चं विजेतेपद पटकावलं आहे. ३१ मे रोजी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात गुजरात टायटन्सला ५ गडी राखून पराभूत करून त्यांनी सलग दुसऱ्यांदा ट्रॉफी उंचावली. आरसीबीने मोठ्या उत्साहात आपल्या आयपीएल २०२६ च्या विजेतेपदाचा जल्लोष साजरा केला. विराट कोहली आरसीबीच्या या विजयाचा हिरो ठरला. सलामीला उतरलेला विराट नाबाद ७५ धावांची खेळी करत संघाला विजय मिळवून देत माघारी परतला. या विजयानंतर त्याचा डान्स करतानाचा व्हीडिओ व्हायरल होत आहे.

ट्रॉफी जिंकल्यानंतर विराटने सुरूवातीला हॉटेलबाहेर कृणाल पंड्यासह थिरकला. यानंतर सेलिब्रेशन पार्टीमधील व्हिडिओमध्ये विराट कोहली त्याची पत्नी अनुष्का शर्मासोबत डान्स फ्लोअरवर नाचताना दिसत आहे. आरसीबीचा विजय साजरा करताना दोघेही नाचत होते. तर यादरम्यानच्या विराटच्या एकेका स्टेपने सर्वांचं लक्ष वेधलं.

रॉयल चॅलेंजर्स बंगळूरने टीम हॉटेलमध्ये विराट आणि अनुष्का डान्स करत असल्याचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. विराटने डान्स फ्लोअरवर केवळ अनुष्कासोबतच नाही, तर आरसीबीचे मार्गदर्शक आणि फलंदाजी प्रशिक्षक दिनेश कार्तिक यांच्यासोबतही डान्स केला. खांद्यावर हाट ठेवत दोघांनी जणू आपल्या स्टाईलने नाटू नाटू डान्स केला. सामन्यादरम्यान खेळताना विराटच्या पायात सातत्याने क्रॅम्पमुळे त्रास होत होता. यादरम्यान विराटने पाय धरत त्यासंबंधित डान्सही केला.

विराट कोहली-अनुष्का शर्माचा डान्स पाहिला का?

विराट व कार्तिक नाचत असताना अनुष्का शर्माने फोटो, व्हीडिओ काढले. संपूर्ण संघाने खास चॅम्पियन्स लिहिलेली जर्सी घातली होती. शिवाय या जर्सीच्या मागच्या बाजूला one felt nice, we did it twice असा मेसेज लिहिला होता. विराटला मनसोक्त नाचताना पाहताना सर्व जण व्हीडिओ काढत होते, तर विराटसह अनेक जण डान्सही करत होते.

टीम हॉटेलबाहेर विराट कोहलीचा डान्स आधीच सुरू झाला होता. ट्रॉफी जिंकल्यानंतर, आरसीबीचे खेळाडू ढोलांच्या गजरात टीम हॉटेलमध्ये पोहोचले, तेव्हा त्यांचे स्वागत करण्यात आलं. विराट कोहलीसह सर्व खेळाडू ढोलांच्या तालावर नाचताना दिसले. आरसीबीने या घटनेचा एक व्हिडिओदेखील शेअर केला आहे. आरसीबीने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये कृणाल पंड्या नाचायला सुरुवात करणारा पहिला होता. तो ट्रॉफीसोबत नाचू लागला. विराट कोहली लगेचच कृणाल पंड्यासोबत सामील झाला आणि ते दोघे ढोलांच्या तालावर नाचू लागले.