इन्स्टाग्रामच्या एका पोस्टमागे विराट कमावतो तब्बल XXX लाख रुपये

Instagram ने जाहीर केलेल्या यादीत विराट १७ वा

विराट कोहली (संग्रहीत छायाचित्र)

सोशल नेटवर्किंग साईट इन्स्टाग्रामवर सर्वाधिक चाहते असलेल्यांच्या यादीत जागतिक स्तरावर भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीला १७ वं स्थान मिळालं आहे. कोहलीचे सध्या इन्स्टाग्रामवर २३.२ कोटी फॉलोअर्स आहेत. सेलिब्रिटिंच्या फॉलोअर्सची संख्या, त्यांच्या पोस्टची एंगेजमेंट आणि त्यांच्या पोस्टची संख्या यावरून सेलिब्रिटी इन्स्टाग्रामवर किती श्रीमंत आहे हे ठरतं. या प्रकारे तुलना केली असता विराट चाहत्यांच्या कमाईच्या बाबतीत जागतिक स्तरावर १७ व्या स्थानावर असून केवळ भारतीयांचा विचार केला तर तो या जाही झालेल्या ७५ इन्स्टाग्राम सेलीब्रिटीजमध्ये एकमेव भारतीय आहे.

याचा थेट फायदा त्याच्या आर्थिक कमाईमध्ये दिसून येतो. त्याची पोस्ट तब्बल २३.२ कोटी चाहत्यांपर्यंत पोचत असल्याने तसेच त्याची प्रतिमा तरूणांमध्ये प्रेरणादायी असल्याने त्याला जाहिरातीच्या एकेका पोस्टसाठी तब्बल ८४ लाख रुपये इतके प्रचंड मानधन दिले जाते. इन्स्टाग्रामवर एखाद्या खेळाडूने केलेली पोस्ट, त्याला लोकांचा मिळणारा प्रतिसाद आणि ती पोस्ट किती लोकापर्यंत पोहचली या निकषावर HopperHQ.com ही यंत्रणा ही यादी ठरवत असते.

७५ जणांच्या यादीत खेळाडूंचा निकष लावला असता, फुटबॉलपटू ख्रिस्तीआनो रोनाल्डो हा अग्रस्थानी आहे. यानंतर ब्राझीलचा फुटबॉलपटू नेमार याने दुसरं स्थान पटकावलं आहे. यानंतर तिसरं स्थान हे अर्जेंटीनाच्या लायनोल मेसीने पटकावलं आहे. हॉलिवूड अभिनेत्री केली जेनरने ७५ जणांच्या यादीत पहिलं स्थान पटकावलं असून, जेनर एका प्रायोजित पोस्टसाठी तब्बल १ कोटी अमेरिकन डॉलर इतकं मानधन घेते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Virat kohli at no17 on instagram rich list earns 120 000 per post

ताज्या बातम्या