भारताचा रनमशीन म्हणून ओळखला जाणारा विराट कोहली कायमचं चर्चेचा विषय असतो. आयपीएल २०२४ मध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज असला तरी त्याच्या स्ट्राईक रेटवरून चर्चेला उधाण आले होते. त्याच दरम्यान टी-२० विश्वचषक २०२४ साठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. यानंतर प्लेईंग इलेव्हनमध्ये कोणते खेळाडू खेळणार आणि संघातील खेळाडू कोणत्या क्रमांकावर खेळणार, यावर चर्चा सुरू आहे. यातील सर्वात मोठा विषय म्हणजे विराट कोहली कोणत्या क्रमांकावर फलंदाजी करणार. क्रिकेट दिग्गजांच्या मते विराटने सलामीला उतरावे तर काहींच्या मते विराटने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करावी.

विराट कोहली कोणत्या क्रमांकावर फलंदाजी उतरणार याचा निर्णय कर्णधार रोहित शर्मा, प्रशिक्षक राहुल द्रविड आणि स्वत: कोहलीने आधीच केलेला असणार. रोहित शर्मा संघ संयोजनाबाबत पहिल्या टी-२० वर्ल्डकपमधील आयर्लंडच्या पहिल्या सामन्यापूर्वी माहिती देईल.

Smriti Mandhana first Indian woman to hit consecutive ODI hundreds
INDW vs SAW: स्मृती मानधनाने शतकी खेळीसह रचला इतिहास, वनडेमध्ये ‘ही’ कामगिरी करणारी पहिली भारतीय महिला फलंदाज
Akash Chopra Gives Stern Warning to Gautam Gambhir
रोहित-विराटचा संदर्भ देत भारताचा कोच होणाऱ्या गंभीरला माजी खेळाडूने दिला इशारा, म्हणाले; “संघातले बरेचसे खेळाडू…”
Former Sri Lankan cricketer
श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू मुथय्या मुरलीधरन कर्नाटकमध्ये करतोय १४०० कोटींची गुंतवणूक
Wasim Jaffer Statement on Michael Vaughan video
“माझा भाऊ थोडा चांगला असता…” वासिम जाफर मायकल वॉनला उद्देशून पाहा काय बोलून गेला? VIDEO व्हायरल
ICC Fined Tanzim Hasan Sakib
T20 WC 2024: बांगलादेशच्या खेळाडूवर ICC ची कारवाई, नेपाळविरूद्धच्या सामन्यात कर्णधारासह घातलेला वाद
Kane Williamson Steps Down as New Zealand Captain After T20 World Cup 2024
न्यूझीलंडच्या वर्ल्डकपमधून घरवापसीचा पहिला दणका; केन विल्यमसनने सोडले कर्णधारपद
Neeraj Chopra wins the Paavo Nurmi Games 2024
नीरज चोप्राचा पुन्हा ‘सुवर्णवेध’, पावो नूरमी गेम्समध्ये गोल्ड मेडलवर कोरलं नाव
France is worried about captain Kylian Mbappe injury
फ्रान्सला एम्बापेच्या दुखापतीची चिंता; सलामीच्या लढतीत ऑस्ट्रियावरील विजयात नाकाला दुखापत
Rohit sharma statement that Indian players are eager for a special performance in match sport news
वेळापत्रक धकाधकीचे… पण कारण देणे अयोग्य! खास कामगिरीसाठी भारतीय खेळाडू उत्सुक असल्याचे रोहितचे वक्तव्य

विराटने वर्ल्डकपमध्ये तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करावी

विराटच्या फलंदाजी क्रमाच्या चर्चेत अनेक क्रिकेट दिग्गजांनी आपले मत मांडले आहे. यात भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने कोहली सलामीला उतरावा असे म्हटले होते. तर गांगुलीच्या मताचे समर्थन करताना एका पोडकास्टमध्ये ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार टिम पेनने वक्तव्य केले, मी नक्कीच सांगेन की विराटने सलामीला उतरावे. विराटला त्याला हव्या त्या क्रमांकावर फलंदाजीला उतरण्याचे स्वातंत्र्य मिळवले आहे, विशेषत जेव्हा तो फॉर्ममध्ये असतो. जर मी व्यवस्थापनाचा भाग असतो, तर माझा विचार एकच असता की माझ्या सर्वाेत्कृष्ट खेळाडूने जास्तीत जास्त चेंडूंचा सामना केला पाहिजे. विराट हा एक अनुभवी खेळाडू आहे आणि त्याने जास्तीत जास्त चेंडूंचा सामना करावा, असे मला वाटते.

हेही वाचा – IPL 2024: १८ धावा किंवा १८.१ षटके… आरसीबी की चेन्नई कोण गाठणार प्लेऑफ, वाचा कसं आहे समीकरण?

तर यापलीकडे भारताचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैनाच्या मते विराटने तिसऱ्या क्रमांकावरच फलंदाजी केली पाहिजे, जे तो पूर्वीपासून करत आला आहे. ऑसी संघाचा दुसरा कर्णधार अ‍ॅरोन फिंचनेही विराटने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करावी, असे म्हटले.

विराटच्या स्ट्राईक रेटकडे लक्ष केंद्रित करत अ‍ॅरोन फिंच म्हणाला, विराट कोहली विश्वचषक संघात असे का, या मुद्द्यावर टूर्नामेंटच्या सुरूवातीला खूप चर्चा झाली. १५५ च्या स्ट्राईक रेटसह खेळणं ही मोठी गोष्ट आहे. विराटच्या कारकीर्दीतील हा सर्वात चांगला स्ट्राईक रेट आहे, जो एक चांगला मुद्दा आहे. मी अजूनही म्हणेन विराटने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करावी. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना तो संघाला एक स्थिरता देतो, जेणेकरून इतर खेळाडू त्यांचा नैसर्गिक खेळ खेळू शकतात.

हेही वाचा – IPL 2024: एका जागेसाठी कसं असणार CSK आणि RCB साठी प्लेऑफचं समीकरण? चेन्नईला तर टॉप-२ मध्ये येण्याची संधी

यशस्वी जैस्वालने त्याच्या आक्रमक शैलीने रोहितसोबत सलामीला उतरावे असेही फिंचने सुचवले. संघात यशस्वी जैस्वालसारखा तुफान फटकेबाजी करणारा फलंदाज आहे. पण वेस्ट इंडिजमध्ये सलामी देताना विराट आणि रोहितची जोडी संघाला आवश्यक असलेली वेगवान सुरूवात करून देतील, असे मला वाटतं नाही. त्यामुळे यशस्वी आणि रोहितने सलामीला उतरलं पाहिजे, असे फिंच म्हणाला.

टी-२० विश्वचषकाच्या तारखा जशाजशा जवळ येत आहेत, तसे विराटच्या फलंदाजी क्रमांकावरील चर्चा अधिक होत आहे. चाहते आणि क्रिकेट दिग्गज अंतिम निर्णयाच्या अपेक्षेत आहेत. हा अंतिम निर्णय संघासाठी योग्यच असेल अशी आशा आहे.