scorecardresearch

“मी अनुष्कावर अन्याय केला..”, ‘त्या’ ३ वर्षाच्या रफ पॅचबद्दल विराट कोहलीचा मोठा खुलासा, म्हणाला, ‘चिडून मी..”

Virat Kohli Confession: विराट कोहलीने आपल्या लग्नातील एका रफ पॅच बद्दल खुलासा केला आहे. आपल्याकडून अनुष्कावर अन्याय झाल्याचे स्वतः कोहलीने कबुल केले आहे.

“मी अनुष्कावर अन्याय केला..”, ‘त्या’ ३ वर्षाच्या रफ पॅचबद्दल विराट कोहलीचा मोठा खुलासा, म्हणाला, ‘चिडून मी..”
"मी अनुष्कावर अन्याय केला..", 'त्या' ३ वर्षाच्या रफ पॅचबद्दल विराट कोहलीने केला मोठा खुलासा (फोटो: इंस्टाग्राम)

Virat Kohli Confession About Anushka Sharma: अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीरोमँटिक लव्हस्टोरी बरीच गाजली होती. रिलेशन, ब्रेक अप, पुन्हा एकत्र येणं, कोणालाही कल्पना नसताना इटलीत केलेलं लग्न हा सगळा प्रवास फॅन्सनी पाहिला आहे. अनुष्का- विराटची लेक वामिकाचा जन्म झाल्यापासून हे कोहली कुटुंब खरोखरच गोंडस फॅमिली गोल्स देत आहे. पण अशातच आता विराट कोहलीने आपल्या लग्नातील एका रफ पॅच बद्दल खुलासा केला आहे. आपल्याकडून अनुष्कावर अन्याय झाल्याचे स्वतः कोहलीने कबुल केले आहे.

आपण सगळ्यांनीच पाहिले की, ३४ वर्षीय विराटने २०२२ च्या शेवटच्या एकदिवसीय सामन्यात बांगलादेशविरुद्ध ११३ धावा केल्या होत्या. अवघ्या चार महिन्यात आशिया चषक, विश्वचषक आणि टेस्ट मध्ये विराटने शेवटची तीन शतक झळकावली होती. पण यापूर्वी २०१९ ते २०२२ हा काळ विराटसाठी खडतर होता.

२०१९ -२२ मध्ये विराटच्या आयुष्यात काय घडलं?

बीसीसीआय टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत सहकारी सूर्यकुमार यादवशी बोलताना विराट म्हणाला की, “निराशा, नकारत्मकता यामुळे मी अगदीच विक्षिप्त वागू लागलो होतो. माझ्या वागणुकीचा अनुष्कावर परिणाम झाला हे एका अर्थी तिच्यासाठी अन्यायकारक आहे. जे तुमच्या पाठीशी उभे असतात त्यांना असे वागवणे योग्य नाही आणि मी त्या वागणुकीची जबाबदारी स्वीकारतो.

विराटने पुढे आपल्याच कमतरतेवरही भाष्य करत सांगितले की “मी माझ्या क्रिकेटपासून दूर होतो. माझी जवळची गोष्ट, माझी इच्छा सगळं काही माझ्या हातून निसटत होतं. तेव्हाच मला कळले की मी स्वतःपासून दूर राहू शकत नाही. मला स्वतःशी खरे असले पाहिजे. मी असुरक्षित असतानाही, मी चांगले खेळत नसतानाही, मी अगदी सर्वात वाईट खेळाडू ठरलो तरी मला ते स्वीकारावे लागेल. मी नाकारू शकत नाही,”

पुढे कोहली म्हणाला, “मी आता आनंदी आहे… गेल्या दोन वर्षांत माझी अशी सुरुवात झाली नव्हती. जेव्हा मी आशिया चषकात खेळलो, तेव्हा मी पुन्हा सरावाचा आनंद घेऊ लागलो, म्हणून मी म्हणेन की जर तुम्हाला थोडी निराशा वाटत असेल तर दोन पावले मागे जा, पण दुःख अमान्य करत राहिलात तर तुम्ही स्वतःपासून दूर जाल”

विराटने सूर्याला दिला मोठा सल्ला

या चर्चेत विराटने सूर्यकुमार यादवसाठीही खास सल्ला दिला, कोहली म्हणाला, “सूर्या कधीतरी तू पण हे अनुभवशील. तू चांगला खेळताना लोक तुझ्याकडे वेगळ्या नजरेने पाहतात.सूर्या बाहेर खेळायला गेला की लोक म्हणतील की सूर्या करणार. पण हा विश्वास आणि खेळ टिकवून ठेवणं कठीण असतं”

दरम्यान, विराटने ८७ चेंडूत ११३ धावांचे ४५ वे एकदिवसीय शतक झळकावून मंगळवारी सलामीच्या सामन्यात भारताला श्रीलंकेवर ६७ धावांनी विजय मिळवून दिला होता.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 15-01-2023 at 17:40 IST

संबंधित बातम्या