Virat Kohli and other four cricketers birthday on November 5 : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहली आज (५ नोव्हेंबर) ३६ वर्षांचा झाला आहे. या खास दिवशी विराट कोहलीवर चाहत्यांसह आजी-माजी क्रिकेटपटू शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. त्याचबरोबर तो फॉर्ममध्ये परतावा यासाठी चाहते देवाकडे प्रार्थना करत आहेत. कारण भारताला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये पोहोचण्यासाठी विराटला सूर गवसायला हवा आहे. विशेष म्हणजे विराट कोहलीसह आज इतर चार क्रिकेपटूंचाही वाढदिवस आहे, ते कोण आहेत? जाणून घेऊया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

१. जेसन होल्डर

जेसन होल्डर हा वेस्ट इंडिज संघातील बलाढ्य खेळाडूंपैकी एक आहे. तो आपल्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर संघाला सामने जिंकून देण्यासाठी ओळखला जातो. त्याचाही आज वाढदिवस आहे. त्याचा जन्म ५ नोव्हेंबर १९९१ साली झाला होता. तो विराट कोहलीपेक्षा तीन वर्षांनी लहान आहे. जेसनच्या नावावर कसोटीत ३०७३ धावा आणि १६२ विकेट्स आणि वनडेमध्ये २२३७ धावा आणि १५९ विकेट्स आहेत. याशिवाय त्याने आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये ४९१ धावाव्यतिरिक्त ६६ विकेट्स घेतल्या आहेत.

२. अँडी लॉईड

१७२११ प्रथम श्रेणी धावा करणारा अँडी लॉईड इंग्लंडकडून फक्त एकच कसोटी खेळला आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये भरपूर धावा करणाऱ्या लॉयडला १९८४ मध्ये इंग्लंड कसोटीत पदार्पण करण्याची संधी मिळाली होती, परंतु केवळ १० धावांच्या स्कोअरवर तत्कालीन धोकादायक वेगवान गोलंदाज माल्कम मार्शलच्या बाऊन्सरने त्याची पहिली कसोटी शेवटची ठरवली. कारण तो चेंडू लागल्याने आठवडाभर रुग्णालयात होता आणि यानंतर त्याची दृष्टी कमी झाल्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परतता आले नाही. त्यांचा जन्म १९५६ मध्ये झाला होता.

हेही वाचा – Mohammad Kaif : ‘एजाज पटेलसारखे गोलंदाज प्रत्येक क्लबमध्ये सापडतील…’, मुंबईतील पराभवानंतर मोहम्मद कैफ टीम इंडियावर संतापला

३. शिव सुंदर दास

टीम इंडियासाठी खेळणारा शिव सुंदर दास हा ओडिशाचा दुसरा खेळाडू होता. त्याने २००० मध्ये बांगलादेशविरुद्ध कसोटी पदार्पण आणि २००१ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडे पदार्पण केले होते. तथापि, त्याची आंतरराष्ट्रीय कारकीर्द (२३ कसोटी आणि ४ एकदिवसीय) खूपच लहान होती. मात्र, ५ नोव्हेंबर १९७७ रोजी जन्मलेल्या या खेळाडूच्या नावावर प्रथम श्रेणीत त्रिशतकासह १०९०८ धावा आहेत.

हेही वाचा – Virat Kohli : ‘आता असं वाटतं की विराटला कोणत्याही अडचणीशिवाय…’, भारताच्या रनमशीनबद्दल आकाश चोप्राचे मोठे वक्तव्य

४. जेसिका जॅन्सेन

ऑस्ट्रेलियाची धडाकेबाज अष्टपैलू खेळाडू जेसिका जॅन्सेनचाही आज वाढदिवस आहे. तिचा जन्म ५ नोव्हेंबर १९९२ रोजी झाला होता. या खेळाडूने २०१२ च्या कोलंबोमध्ये इंग्लंड विरुद्धच्या टी-२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात २५ धावांत ३ विकेट्स घेत ऑस्ट्रेलियाला जेतेपद पटकावून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.