Rohit Sharma Breaks Virat Kohli Record: आयपीएल २०२६ स्पर्धेला दमदार सुरुवात झाली आहे. स्पर्धेतील सुरुवातीच्या दोन्ही दिवशी २ स्टार खेळाडूंचा टॉप क्लास खेळ पाहायला मिळाला आहे. स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा स्टार फलंदाज विराट कोहलीने दमदार अर्धशतकी खेळी केली. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात रोहित शर्माची तुफान फटकेबाजी पाहायला मिळाली. आपल्या होम ग्राऊंडवर खेळताना रोहितने कोलकाता नाईट रायडर्स संघाच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. रोहितने ७८ धावांची दमदार खेळी केली. या खेळीच्या बळावर त्याने रोहित शर्माचा एक मोठा रेकॉर्ड उद्ध्वस्त केला आहे.
असा पराक्रम करणारा ठरला पहिलाच फलंदाज
कोलकाता नाईट रायडर्स संघाविरुद्ध खेळताना रोहित शर्माची बॅट चांगलीच तळपते. या सामन्यातही असच काहीसं चित्र पाहायला मिळालं. धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या रोहितने मुंबई इंडियन्सला वेगवान सुरुवात करून दिली. रोहितने कोलकाता नाईट रायडर्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात ७८ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान रोहितने ६ चौकार आणि ६ गगनचुंबी षटकार खेचले.
या अर्धशतकी खेळीसह रोहित शर्मा हा आयपीएलमध्ये एकाच संघाविरुद्ध सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत अव्वल स्थानी पोहोचला आहे. या रेकॉर्डमध्ये त्याने विराट कोहलीला मागे टाकलं आहे. रोहितने कोलकाता नाईट रायडर्स संघाविरुद्ध खेळताना एकूण ११६१ धावा केल्या आहेत. तर विराट कोहली या यादीत दुसऱ्या स्थानी घसरला आहे. विराटच्या नावे कोलकाता नाईट रायडर्स संघाविरुद्ध खेळताना ११५९ धावा करण्याची नोंद आहे.
आयपीएलमध्ये एका संघाविरुद्ध खेळताना सर्वाधिक धावा करणारे फलंदाज
रोहित शर्मा – ११६१ धावा विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स
विराट कोहली – ११५९ धावा विरुद्ध पंजाब किंग्ज</p>
विराट कोहली -११४६ धावा विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज</p>
डेव्हिड वॉर्नर – ११३४ धावा विरुद्ध पंजाब किंग्ज
विराट कोहली – ११३० धावा विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स</p>
डेव्हिड वॉर्नर – १०९३ धावा विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स
या सामन्यात ५० धावांचा पल्ला गाठताच रोहित शर्माच्या नावे आणखी एका माोठ्या रेकॉर्डची नोंद झाली आहे. रोहित आयपीएलमध्ये ५० अर्धशतकं झळकावणारा चौथा फलंदाज ठरला आहे. या यादीत विराट कोहली अव्वल स्थानी आहे. विराटने आतापर्यंत ७२ वेळा ५० पेक्षा अधिक धावांची खेळी केली आहे.
