Virat Kohli Broke Sachin Tendulkar Record vs NZ: वनडेचा किंग विराट कोहली सध्या वादळी फॉर्मात आहे. न्यूझीलंडविरूद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात विराट भले लवकर बाद झाला, पण याखेळीदरम्यानही त्याने सचिन तेंडुलकरचा अजून एक विक्रम मोडला आहे. महत्त्वाचं म्हणजे गेल्या १७ वर्षांमध्ये असा विक्रम कोणत्याच खेळाडूने केलेला नाही. विराट कोहलीने आता सचिनचा कोणता विक्रम मोडला आहे, पाहूया.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात विराट कोहलीचं शतक हुकलं. त्याने ९३ धावांची शानदार खेळी करत बाद झाला. पहिल्या वनडेदरम्यान विराट कोहली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा दुसरा खेळाडू ठरला, त्याच्यापुढे आता फक्त मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आहे. पहिल्या वनडे सामन्यात तो सचिन तेंडुलकरचा आणखी एक विक्रम मोडू शकला असता, पण विराटने आता दुसऱ्या वनडे सामन्यात हा विक्रम मोडला आहे.
विराट कोहलीने सचिन तेंडुलकरचा कोणता विक्रम मोडला?
विराट कोहली तिसऱ्या वनडे सामन्यात २९ चेंडूत २ चौकारांसह २३ धावा करत बाद झाला. विराट गेल्या ५ सामन्यात ५० पेक्षा अधिक धावांच्या खेळी केल्या होत्या, पण या सामन्यात पदार्पणवीर क्रिस्टियन क्लार्कने त्याला क्लीन बोल्ड केलं. पण यापूर्वी विराटने सचिन तेंडुलकरला मागे टाकत न्यूझीलंडविरूद्ध वनडेमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. न्यूझीलंडविरूद्ध सर्वाधिक धावा करणारा जगातील तो दुसरा फलंदाज आहे, त्याच्यापुढे ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू रिकी पॉन्टिंग आहे.
रिकी पॉन्टिंग हा न्यूझीलंडविरुद्ध सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे, त्याने ५१ सामने खेळून १९७१ धावा केल्या आहेत. पॉन्टिंगने न्यूझीलंडविरुद्ध सहा शतकं आणि १२ अर्धशतकं झळकावली आहेत. विराट कोहलीने आतापर्यंत न्यूझीलंडविरुद्ध ३५ सामने खेळले आहेत आणि १७६० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत, ज्यात सहा शतकं आणि १० अर्धशतकांचा समावेश आहे. तर सचिन तेंडुलकरने त्याच्या कारकिर्दीत न्यूझीलंडविरुद्ध ४२ सामने खेळले आणि १७५० धावा केल्या.
सचिन तेंडुलकरने १९९० मध्ये न्यूझीलंडविरुद्ध पहिला एकदिवसीय सामना खेळला होता आणि २००९ मध्ये अखेरचा सामना खेळला होता. यादरम्यान त्याने संघाविरुद्ध पाच शतकं आणि आठ अर्धशतकं झळकावली. याचा अर्थ सचिनने २००९ पासून न्यूझीलंडविरुद्ध एकही एकदिवसीय सामना खेळलेला नाही. याचा अर्थ सचिनचा विक्रम जवळजवळ १७ वर्षांनंतर मोडला गेला आहे. आता विराटकडे रिकी पॉन्टिंगला मागे टाकून या यादीत अव्वल स्थानावर पोहोचण्याची संधी आहे.
विराट कोहली यादरम्यान आयसीसी वनडे क्रमवारीत रोहित शर्माला मागे टाकत वर्ल्ड नंबर वन खेळाडू ठरला आहे. विराट कोहलीच्या गेल्या ५ सामन्यांमधील वादळी कामगिरीमुळे तो पहिल्या स्थानी पोहोचला आहे. तर रोहित शर्मा तिसऱ्या स्थानी घसरला आहे.
