Vijay Hazare Trophy 2025-26 Virat Kohli broke sachin tendulkar record: विराट कोहली १५ वर्षांनी विजय हजारे ट्रॉफीमध्ये खेळण्यासाठी उतरला. विराटने दिल्ली आणि आंध्रप्रदेशच्या यांच्यातील सामन्यात इतिहास घडवला. विराटने या सामन्यात १३१ धावांची खेळी करत संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यापूर्वी विराटने सामन्यात १ धाव घेत इतिहास घडवला. यासह त्याने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला आणि मोठा वर्ल्ड रेकॉर्डही नावे केला आहे.
विराट कोहलीने दिल्लीकडून खेळताना २९९ धावांचा पाठलाग करताना ८३ चेंडूत शतक झळकावलं. यानंतर विराटने १०१ चेंडूत १४ चौकार व ३ षटकारांच्या मदतीने १३१ धावांची खेळी केली. यासह त्याने संघाला विजयाच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवलं. विराटच्या या कामगिरीसह दिल्लीने ४ विकेट्सने सामना जिंकला. विराट कोहली या सामन्याचा सामनावीर खेळाडू ठरला.
विराट कोहलीने लिस्ट ए क्रिकेटमध्ये पूर्ण केल्या १६ हजार धावा
शतकी खेळीपूर्वी विराट कोहलीने दिल्लीकडून या सामन्यात खेळताना १ धाव करताच त्याने लिस्ट ए क्रिकेटमध्ये १६ हजार धावा पूर्ण केल्या. लिस्ट ए क्रिकेटमध्ये १६ धावांचा टप्पा गाठणारा विराट कोहली दुसरा खेळाडू ठरला. यासह विराट कोहलीने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मोठा विक्रम मोडला आहे. ३७ वर्षीय कोहली हा पराक्रम करणारा ९वा आणि आशियातील चौथा खेळाडू ठरला आहे.
किंग कोहलीने लिस्ट-ए क्रिकेटमध्ये सर्वात जलद १६ हजार धावा करण्याचा मास्टर ब्लास्टरचा विक्रम मोडला आहे आणि लिस्ट-ए क्रिकेट इतिहासात सर्वात जलद १६ हजार धावा करणारा जगातील पहिला खेळाडू बनला आहे. विराट कोहलीने ३३० डावांमध्ये १६ हजार धावा करण्याचा विक्रम केला. त्याआधी सचिन तेंडुलकरने ३९१ धावांमध्ये ही कामगिरी केली होती.
अशाप्रकारे, दिल्लीचा हा स्टार खेळाडू १६,००० धावा पूर्ण करणारा सर्वात जलद खेळाडू ठरला. याआधी, कोहली १०,०००, ११,०००, १२,०००, १३,०००, १४,००० आणि १५,००० धावा सर्वात जलद पूर्ण करणारा खेळाडू होता. त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये ८,०००, ९,०००, १०,०००, ११,०००, १२,०००, १३,००० आणि १४,००० धावा पूर्ण केल्या आहेत.
लिस्ट ए क्रिकेटमध्ये १६ हजार धावा काढणाऱ्या आणि ५० पेक्षा जास्त सरासरी असलेला कोहली हा फक्त नऊ खेळाडूंपैकी एक आहे. कोहलीची सरासरी ५७.३४ आहे, त्यानंतर सचिन तेंडुलकरची सरासरी ४५.५४ आहे. लिस्ट ए क्रिकेटमध्ये किंग कोहलीपेक्षा जास्त सरासरी फक्त तीन खेळाडूंची आहे, ज्यामध्ये मायकेल बेवनने ५७.८६ च्या सरासरीने १५,१०३ धावा केल्या आहेत. त्याच्यानंतर सॅम हेन (३,००४ धावा, ५७.७६ सरासरी) आणि ऋतुराज गायकवाड (४,६४७ धावा, ५७.३७ सरासरी) यांचा क्रमांक लागतो.
लिस्ट ए क्रिकेटमध्ये सर्वात जलद १६ हजार धावा करणारे खेळाडू
विराट कोहली (भारत) – ३३० डाव
सचिन तेंडुलकर (भारत) – ३९१ डाव
गॉर्डन ग्रिनीज (वेस्ट इंडिज) – ४२२ डाव
रिकी पॉन्टिंग (ऑस्ट्रेलिया) -४३० डाव
ग्राहम गूच (इंग्लंड) – ४३५ डाव
विव रिचर्ड्स (वेस्ट इंडिज) – ४३५ डाव
