Virat Kohli Completed 15000 Runs In ODI Cricket: वेस्ट इंडिजचा संघ सध्या भारत दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना तिरूवनंतपुरमच्या मैदानावर सुरू आहे. या सामन्यात पहिल्या डावात फलंदाजी करताना वेस्ट इंडिजने ५० षटकांअखेर २९५ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाकडून ६१ धावा करताच विराट कोहलीने वनडे क्रिकेटमध्ये १५ हजार धावांचा पल्ला गाठला आहे. यासह एक खास रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे.

भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने वनडे आणि कसोटी क्रिकेटमध्ये अनेक मोठे रेकॉर्ड मोडून काढले आहेत. हे रेकॉर्ड मोडून काढण्यासाठी विराट कोहलीला प्रबळ दावेदार मानलं जात आहे.विराटने बरेचशे रेकॉर्ड मोडले देखील आहेत. आता वनडे क्रिकेटमध्ये सर्वधिक धावा करण्याच्या रेकॉर्डमध्ये विराट कोहली हा सचिन तेंडुलकरच्या आणखी जवळ पोहोचला आहे. विराट कोहलीने वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात ६१ धाव करताच वनडे क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड मोडून काढला आहे.

विराट कोहलीने मोडला सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड

वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा रेकॉर्ड हा अजूनही सचिन तेंडुलकरच्या नावे आहे. सचिनच्या नावे १८४२६ धावा करण्याची नोंद आहे. तर विराट कोहली हा वनडे क्रिकेटमध्ये १५ हजार धावा करणारा केवळ दुसराच फलंदाज आहे. दरम्यान विराट कोहली हा सचिनला मागे टाकत वनडे क्रिकेटमध्ये सर्वात जलद १५ हजार धावा करणारा फलंदाज ठरला आहे. विराट कोहलीने वनडे क्रिकेटमधील ३०३ व्या डावात हा खास रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. तर सचिन तेंडुलकरने ३७७ व्या डावात १५ हजार धावांचा पल्ला गाठला होता.

सचिनचा रेकॉर्ड मोडण्यासाठी आणखी किती धावांची गरज?

विराट कोहलीला सचिन तेंडुकरचा सर्वाधिक शतकं झळकावण्याचा रेकॉर्ड मोडण्यासाठी प्रबळ दावेदार मानलं जात आहे. पण केवळ वनडे फॉरमॅट खेळत असल्याने हा रेकॉर्ड मोडणं जर कठीण आहे. यासह वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा रेकॉर्ड मोडण्याच्या अगदी जवळ पोहोचला असला तरीदेखील हा रेकॉर्ड मोडणं जरा कठीण आहे. कारण सचिनच्या नावे १८४२६ धावा करण्याची नोंद आहे.जर विराटला या रेकॉर्डमध्ये सचिनला मागे टाकायचं असेल, तर आणखी ३४२६ धावा कराव्या लागतील. त्यासाठी विराटला कमीत कमी २-३ वर्ष सातत्याने धावा कराव्या लागतील, जे जरा कठीण आहे. कारण विराट वनडे वर्ल्डकप २०२७ स्पर्धेनंतर निवृत्तीची घोषणा करू शकतो.