Virat Kohli Runs Againts Australia : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने भारताला ४४४ धावांचं लक्ष्य दिलं आहे. या धावांचा पाठलाग करण्यासाठी भारतीय फलंदाज शर्थीचे प्रयत्न करत आहेत. शुबमन गिल, कर्णधार रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजारा बाद झाल्यानंतर भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली मैदानात उतरला. पहिल्या डावात विराट स्वस्तात माघारी परतल्याने चाहत्यांनी त्याला ट्रोल केलं. परंतु, विराट ७ धावांवर पोहोचताच ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये विराटच्या २००० धावा पूर्ण झाल्या आहेत. विराटने ऑस्ट्रेलियाविरोधात २५ सामन्यांमध्ये ४७.६२ च्या सरासरीनं २००० धावा केल्या आहेत. यामध्ये ८ शतक आणि ५ अर्धशतकांचा समावेश आहे. १८६ धावा हा विराट कोहलीचा ऑस्ट्रेलियाविरोधात बेस्ट स्कोअर आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा फायनलचा सामना लंडनच्या ओव्हल मैदानात रंगत आहे. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने सर्वबाद ४६९ धावा कुटल्या होत्या. त्यानंतर प्रत्युत्तरात भारताने सर्वबाद २९६ धावा केल्या होत्या. त्यानंतर आज चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियाने त्यांची इनिंग घोषीत केलीय. ऑस्ट्रेलियाने ८४.३ षटकांमध्ये ८ विकेट्स गमावात २७० धावांपर्यंत मजल मारली.

IPL 2024 Mumbai Indians vs Chennai Super Kings Match Updates in Marathi
MI vs CSK: आयपीएल २०२४ मध्ये ऋतु’राज’, मुंबईविरूद्ध विस्फोटक फलंदाजीसह ‘हा’ विक्रम करणारा पहिला भारतीय खेळाडू
Abhishek Sharma Breaks Chris Gayle and Sunil Narine's Record in SRH vs CSK Match
SRH vs CSK : अभिषेकने वादळी खेळीच्या जोरावर मोडला गेल-नरेनचा विक्रम, IPL मध्ये ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
riyan parag
वेदनाशामक औषधे घेऊन रियान परागची निर्णायक खेळी!
Sunil Narine's 500th T20 Match
RCB vs KKR : सुनील नरेनने आरसीबीविरुद्ध रचला इतिहास, टी-२०मध्ये ‘हा’ पराक्रम करणारा ठरला जगातील चौथा खेळाडू

नक्की वाचा – ओव्हलच्या मैदानात दिसली जडेजाच्या फिरकीची जादू, ‘ही’ रणनिती आखली अन् ट्रेविस हेडला केलं बाद, Video एकदा पाहाच

त्यामुळे ऑस्ट्रेलियाने ४४३ धावांची आघाडी घेतली असून भारताल वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल जिंकण्यासाठी ४४४ धावांचं तगडं लक्ष्य गाठावं लागणार आहे. या धावांचा पाठलाग करताना भारताची सुरुवात चांगली झाली होती. शुबमन गिल १८ धावांवर बाद झाल्यानंतर कर्णधार रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजाराने कमान सांभाळली होती. मात्र, नेथन लायनने कर्णधार रोहित शर्माला ४३ धावांवर आणि पॅट कमिन्सने चेतेश्वर पुजाराला २७ धावांवर बाद करून भारताला तिसरा धक्का दिला.